यास्मिन शेख
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१) ‘भूकंपात घरदार, कुटुंबे उध्वस्त होऊन जी माणसे जिवंत राहतात, ती दुर्दैवी, असहाय माणसे पाहिली की, विलक्षण क्लेश होतात.’ असेच आणखी एक वाक्य पाहा. २) ‘एखाद्या व्यक्तीला विपत्तीनंतर येणारे वैफल्य, त्याचे उध्दवस्त झालेले भावविश्व, त्याच्या वाटय़ाला आलेले नैराश्य- हे सारेच अत्यंत वेदनादायी असते.’
ही दोन्ही वाक्ये योग्य आशय व्यक्त करतात, हे खरे. फक्त एका शब्दाच्या स्वरूपात चूक झाल्यामुळे वाक्यरचना सदोष झाली आहे.
तो शब्द आहे- पहिल्या वाक्यात उध्वस्त आणि दुसऱ्या वाक्यात उध्दवस्त. योग्य शब्द आहे- उद्ध्वस्त (विशेषण) अर्थ आहे- नष्ट केलेला, अस्ताव्यस्त केलेला. या शब्दाची फोड करू या- उत् ध्वस्त- उद्ध्वस्त. ध्वंस या नामापासून सिद्ध झालेले विशेषण आहे. ध्वस्त (संस्कृत, विशेषण) ध्वस्त म्हणजे नष्ट केलेले किंवा झालेले, लुप्त. ध्वंस या नामाचा अर्थ आहे नाश, ध्वस्त या शब्दाला उत् हा उपसर्ग लागून उद्ध्वस्त (विशेषण) सिद्ध होते. उत् ध्वस्त-ध् हे मृदू व्यंजन आहे. त्यामुळे त् चा द् होतो. उत् या उपसर्गापुढे कठोर व्यंजन आल्यास त् च राहतो. जसे- उत् तीर्ण= उत्तीर्ण, उत्थापन, उत्पत्ती, उत्कर्ष, उत्फुल्ल इ. उत् मृदू व्यंजन – उद्गम, उद्धार, उद्घाटन, उद्धट, उद्धृत, उद्युक्त, उद्वेग इ.
आणखी एक वाक्य पाहू या- ‘ब्रिटिशांचे राज्य भारतात येण्यापूर्वी संस्कृत शिकण्याची परवानगी शुद्रातिशुद्रांना नव्हती.’ या वाक्यातील ‘शुद्रातिशुद्रांना’ या शब्दातील शु हे ऱ्हस्व अक्षर चुकीचे आहे.
चातुर्वण्र्य (सं.-नपुं.)= ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार वर्णाचा समुदाय. शूद्र हा चौथा वर्ण. अतिशूद्र- शूद्रांतील खालचा वर्ण. शूद्र हा मराठीने संस्कृतातून स्वीकारलेला तत्सम शब्द होय. हा शब्द अकारान्त आहे. अकारान्त तत्सम शब्दास विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी लागल्यास व त्या शब्दात उपान्त्य (शेवटून दुसरे) अक्षर दीर्घ असल्यास ते उपान्त्य अक्षर दीर्घच राहते. – शूद्र – अकारान्त, आधीचे अक्षर दीर्घ (शू) विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी लागल्यास- शूद्राला, शूद्रावर- (चुकीचे शुद्राला) शूद्रातिशूद्रांना (चुकीचे- शुद्रातिशुद्रांना). मराठी शब्दांना हा नियम लागू नाही.
मराठी अकारान्त शब्दांत उपान्त्य अक्षर दीर्घ असल्यास त्याला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी लागल्यास ते उपान्त्य अक्षर ऱ्हस्व होते. जसे- फूल- फुलात, फुलावर, गरीब- गरिबाला, गरिबासाठी इ.
मात्र तत्सम शब्दांतले उपान्त्य- रूप- रूपावर, शूर- शूराला, कीर्ती- कीर्तीमुळे इ. तसेच राहाते.