यास्मिन शेख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुढील वाक्ये वाचा-

‘त्या संध्याकाळी माझे सर्व मित्र आमच्या घरी आले होते. अनेक विषयांवर चर्चा करून आपली मते आणि बढाई करण्यात सर्वजण अगदी रंगून गेले होते.’

या वाक्यांतील दुसऱ्या वाक्यात ‘आपली मते आणि बढाई करण्यात’ या वाक्यरचनेत चुका आहेत.

‘मत’ किंवा ‘मते’ यानंतर योग्य क्रियापदाचे रूप हवे होते. त्याऐवजी करण्यात हा सदोष प्रयोग होईल. मत किंवा मते मांडणे किंवा मत किंवा मते व्यक्त करणे, आपला अभिप्राय इतरांना पटवून देणे असा शब्दप्रयोग योग्य आहे. ‘बढाई करणे’ हा शब्दप्रयोग चुकीचाच आहे. ‘बढाई किंवा बढाया मारणे’ हा शब्दप्रयोग बरोबर आहे.

मत किंवा मते देणे, सांगणे किंवा त्या विशिष्ट विषयावर आपला विचार व्यक्त करणे. हेही वाक्प्रचार मान्य आहेत. बढाई किंवा बढाया मारणे हा योग्य शब्दांचा अर्थ आहे- ‘प्रौढी, फुशारकी, आत्मस्तुती’ हे बढाई या शब्दाचे अर्थ आहेत. बढाई किंवा बढाया मारणे याचाही अर्थ- स्वत:चा नसता मोठेपणा सांगणे, स्वत:ची पोकळ प्रशंसा करणे असा आहे. हे अर्थ लक्षात घेऊन या दोन्ही शब्दांच्या संदर्भात ‘करण्यात’ (करणे हा मूळ शब्द) हे रूप चुकीचे आहे.

आणखी एक शाब्दिक चूक याच वाक्यात आहे. ती ‘सर्वजण’ या शब्दाची. हा एक शब्द नसून हे दोन शब्द आहेत- सर्व जण. ‘जण’ या नामाचे सर्व हे विशेषण आहे. एक जण, सारे जण, प्रत्येक जण इ. स्त्रीलिंगी एकवचनी रूपे एकजण, प्रत्येक जण अशी होतील, पण अनेकवचनी स्त्रीलिंगी रूपे दोघी जणी, साऱ्या जणी, अनेक जणी अशी होतील. यासंबंधीचे स्पष्टीकरण ‘भाषासूत्र’ या सदरातील सुरुवातीच्या माझ्या लघुलेखात मी केले आहे. त्यात ‘जण’ हा मराठी भाषेने संस्कृतातून स्वीकारलेला तद्भव (थोडा बदल करून स्वीकारलेला) शब्द आहे. संस्कृत शब्द- जन (पु.) अर्थ – असामी, मनुष्य. सर्व सारे, दोघे इ. ‘जण’ या शब्दांची विशेषणे आहेत, हे वाचकांना आठवत असेल. वरील वाक्य असे हवे – ‘.. अनेक विषयांवर चर्चा करून आपली मते मांडण्यात (किंवा आपली मते इतरांना पटवून देण्यात) आणि बढाया मारण्यात सर्व जण अगदी रंगून गेले होते.’