जॉर्ज रित्सो जर्व्हिस या जन्माने ब्रिटिश असलेल्या व्यक्तीने आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रॉयल मिलिटरी अ‍ॅकॅडमीत कॅडेटचे लष्करी शिक्षण घेतले आणि पुढे तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत रुजू झाला. १८११ मध्ये त्याची नियुक्ती भारतात झाली. प्रथम काही वर्षे ब्रिटिश लष्करातून युद्धांमध्ये भाग घेतल्यावर या हरहुन्नरी माणसाने कंपनी सरकारच्या विविध खात्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले.

मुंबई इलाख्याचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांनी भारतीय लोकांनी स्वभाषा आणि इंग्रजी भाषेचे परिपूर्ण ज्ञान मिळवून कंपनी सरकारच्या सेवेत सहभागी व्हावे तसेच इंग्रज कर्मचाऱ्यांनाही स्थानिक भाषांचे ज्ञान मिळावे म्हणून नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या नावाची संस्था स्थापन केली. या सोसायटीच्याही सेक्रेटरीपदी जर्व्हिसची नेमणूक केली. त्याने संस्थेतर्फे विविध विषयांवर नवीन ग्रंथनिर्मिती आणि भाषांतरासाठी प्रोत्साहन म्हणून लेखकांना शंभर रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत बक्षिसे जाहीर केली. या बक्षीस योजनेत मराठी आणि गुजराती भाषांमध्ये व्याकरण, राजकारण, ज्योतिष, शरीरशास्त्र, भूगोल, गणित, पदार्थ विज्ञान वगैरे विषयांवर पुस्तके मागवली होती. त्यापैकी गणित सोडून बाकी बहुतेक विषयांवरची पुस्तके आली. त्यामुळे जॉर्ज जर्व्हिसनेच स्वत: अंकसंख्या गणित, मूळ बीजगणित, मूळ भूमिती, मूळ त्रिकोणमिती इत्यादी पुस्तके मराठीत लिहिली. हे काम करीत असताना सरकारने पुस्तकछपाईसाठी काढलेल्या छापखान्यावर देखरेख करून पुस्तके छापून घेण्याचे कामही तो करीत होता.

Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Recognition of prize shares by Reliance Industries
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १:१ बक्षीस समभागास मान्यता
Reserve Bank Deputy Governor Swaminathan warns Fintech to avoid debt recovery in wrong way
कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा
Franklin Templeton India Asset Management Company Independent Director Pradeep Shah
बाजारातली माणसं – असा असावा स्वतंत्र संचालक! प्रदीप शहा
TISS Mumbai PSF students
TISS Banned PSF: डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेवर TISS मुंबईने बंदी का आणली?
Connecting trust, suicide, suicide idea,
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी…
Job Opportunities Opportunities through Staff Selection Commission
नोकरीची संधी:स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संधी

एज्युकेशन सोसायटीसाठी जर्व्हिसने लिहिलेल्या गणिताच्या पुस्तकांमध्ये लॉगॅरिदम, कर्तव्य भूमिती, आदिकरण भूमिती, बीजगणित, त्रिकोणमिती इत्यादी पुस्तकांचा समावेश होता. त्याचप्रमाणे डॉ. हटन यांच्या गणिताच्या इंग्रजी पुस्तकांची जर्व्हिसने, जगन्नाथ शास्त्री यांच्या मदतीने मराठीत भाषांतरे केली. या पुस्तकांमध्ये जर्व्हिसने अनेकदा मराठी प्रतिशब्द न मिळाल्याने संस्कृत शब्द वापरलेत! या पुस्तकांमध्ये ‘गणित मार्ग’, ‘गणित दुसरा भाग अपूर्णाक’, ‘कर्तव्य भूमिती’, ‘शिक्षामाला’ इत्यादी पुस्तके आहेत. यापैकी ‘शिक्षामाला’ या पुस्तकाचे सात भाग आहेत. ‘शिक्षामाला’ या पुस्तकात सुरुवातीला ‘श्री’ हा मांगल्यावाचक शब्द टाकल्याने अनेक युरोपियनांचा जर्व्हिसवर राग होता!

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com