उपलब्ध आकडेवारीनुसार २००७ च्या मध्यापासून जगातील एकूण लोकसंख्येपकी निम्मी (५०%) लोकसंख्या नागरी/शहरी भागात राहू लागली आहे आणि २०३० मध्ये ते प्रमाण दोनतृतीयांश (६६.७%) असेल, असा अंदाज आहे. ही वाढ भारतासारख्या विकसनशील देशांतील नगरांत प्रामुख्याने होईल. साहाजिकच नगर नियोजन आणि व्यवस्थापन हे आपल्यासमोर एक मोठे आव्हान ठरणार आहे.

शहरीकरणाचा हा कल लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाचा मानव वसाहत (यू.एन. हॅबिटॅट) कार्यक्रम विभाग बरीच वष्रे शहरी विकासाचे काही सूचकांक प्रसिद्ध करीत आहे. त्या सूचकांकातील निवडक घटक घेऊन जगातील नगरांचा विकास मोजण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९९६ मध्ये एक शहर विकास निर्देशांक विकसित केला. तो पाच घटक निर्देशांकांच्या सरासरीने पुढीलप्रमाणे काढला जातो शहर विकास निर्देशांक = (पायाभूत सुविधा निर्देशांक + कचरा व्यवस्थापन निर्देशांक + आरोग्य निर्देशांक + शिक्षण निर्देशांक + शहर उत्पन्न निर्देशांक) म ५ या सूत्रातील पायाभूत सुविधा निर्देशांकासाठी पाणीपुरवठा जोडण्या, सांडपाणी निचरा जोडण्या, वीजपुरवठा जोडण्या आणि दूरध्वनी जोडण्या यांचा समावेश केला जातो. तर कचरा व्यवस्थापन निर्देशांकासाठी घनकचरा-  सांडपाणी विल्हेवाटीची व्यवस्था; आरोग्यासाठी अपेक्षित आयुष्यमान, बालमृत्यूदर आणि शिक्षण निर्देशांकासाठी साक्षरता, शाळेतील विद्यार्थाची संख्या असे घटक विचारात घेतले जातात. त्यांच्या आकडेवारीवर करण्याच्या गणिती प्रक्रियाही ठरवल्या आहेत.

विविध शहरांसाठी आवश्यक आणि खात्रीलायक आकडेवारी मिळवणे हे कठीण काम आहे. म्हणून ‘जागतिक नागरी वेधशाळा’ ही संकल्पना कार्यान्वित केली गेली असून संयुक्त राष्ट्र संघाचा मानव वसाहत कार्यक्रम विभागाचा एक विशेष सांख्यिकी कक्ष हे काम करतो. ही वेधशाळा २०१३ पासून एक वेगळा ‘नागरी उत्कर्ष निर्देशांक’ ० ते १०० यांमधील संख्यांत दर्शवते. मात्र भारतातील कुठलेही शहर २०१५ सालीही त्या यादीत नाही कारण ३५ हून कमी निर्देशांक असलेली शहरे त्या यादीत नसतात.

मुंबईसाठी नागरी वेधशाळा निर्माण करण्याबाबत ५-६ डिसेंबर २०१६ रोजी एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शासकीय तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि ब्रिटनमधील संस्थांनी भाग घेतला. भारतातील महानगरांत अशा नागरी वेधशाळा उभारणे त्यांच्या सर्वागीण विकासाला दिशा देण्यात उपयुक्त ठरू शकेल. नगरांच्या स्थितीबाबत ‘नागरी राज्य-कारभार निर्देशांक’, ‘कार्बनविरहित शहर विकास निर्देशांक’ आणि ‘तीर्थशहर विकास निर्देशांक’ असे  नवनवे निर्देशांक मांडले जाणे; हे निश्चितच स्वागतार्ह आहे.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

सुभाष मुखोपाध्याय- साहित्य

१९४० मध्ये कॉलेजमध्ये शिकत असतानाच सुभाष मुखोपाध्याय यांचा पहिला काव्यसंग्रह ‘पदातिक’ प्रकाशित झाला. पूर्वसुरींच्या कवितेपेक्षा वेगळ्या बाजातील त्यांच्या कवितांना खूप प्रसिद्धी मिळाली. जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या, प्रस्थापित पारंपरिक कवितांना धक्का देत वेगळ्या वाटेच्या या कवितेने त्या काळातील बंगाली समाजात खळबळ उडवून दिली. समीक्षकांच्या मते आधुनिक बंगाली कवितेच्या प्रवासातील हा कवितासंग्रह एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.

मुखोपाध्याय यांचे १४ काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, चार प्रवासवर्णने, १२ अनुवादित ग्रंथ, निबंधसंग्रह प्रकाशित झाले आहेत. लहान मुलांसाठी सात पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे बालसाहित्यही खूप प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे जवळजवळ ५० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९६० च्या सुरुवातीला ‘संदेश’ या मुलांसाठीच्या नियतकालिकाचे काही काळ त्यांनी सत्यजित रेंसह संपादनही केले होते.

‘जत दुरेई जाय’ (१९५९), ‘काल मधुमास’ (१९६५), ‘छेले गच्छे बने’ (१९७३)- इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, ‘जत दुरेई जाय’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९६४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

‘अग्निकोण’ (१९४८) या दुसऱ्या कवितासंग्रहात कवीने लाखो लोकांचे अग्नीच्या ज्वाळांचे, अंधकाराचे आवरण भेदण्याचे, जमीन सुजलाम् सुफलाम् बनण्यासाठी सूर्याला उखडून फेकण्याचे स्वप्न पाहिले. ‘चिरकुट’ (१९५०) मध्ये बंगाल दुष्काळाचे चित्रण आहे. या कविता त्यांनी तुरुंगात असताना लिहिल्या. १९५० नंतरची त्यांची कविता ही अधिक अंतर्मुख करणारी, व्यक्तिगत स्वरूपाची अशी हळूहळू विकसित होत गेलेली दिसते. या प्रकारच्या खास कविता आहेत. फूल फुटूक (फूल उमलू द्या), आज बंसतो, इ. यानंतरच्या कविता अधिक वर्णनात्मक, रूपकात्मक झालेल्या दिसतात.       ग्रामीण लोकांत मिळूनमिसळून वावरत असताना नकळत पुढील लिखाणासाठी मनात काहीतरी रुजत गेलं आणि मग राजकारण आणि कविता त्यांच्या जीवनात मिसळूनच गेली. कविता वाचल्यावर लोक म्हणायचे, ‘ त्यांच्यावर सर्वाधिक प्रभाव त्या काळात रवींद्रनाथांचाच होता; त्या खालोखाल डी.एच. लॉरेन्स, ह्य़ूम, टी.एस.इलियट, इ.चा होता. छ

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

Story img Loader