श्रुती पानसे
टीव्ही आणि सोशल मीडिया हे मुलांचे गुरू आहेत. सहा महिन्यांच्या छोटय़ाशा बाळाचं रडणं थांबत नाही म्हणून त्याचा बाबा सहज मोबाइलची रिंगटोन चालू करतो आणि बाळ रडायचं थांबतं. तीन वर्षांचं बाळ लॅपटॉपवर यूटय़ूबवरील बडबडगीतं पाहतं; ते पाहिल्याशिवाय ते जेवत नाही! आठ वर्षांचं मूल घरी येतं, टीव्ही बघत बघत एकीकडे अभ्यास करतं, आणि आई-बाबांचं डोकंही मोबाइलमध्ये असतं.त्यात बघून मुलं अनेक प्रयोग करतात. त्यातून अधिक उग्र समस्या जन्माला येऊ शकतात. मुलांमध्ये वाढता हिंसाचार, नव्या पद्धतीनं चोऱ्या करणं, नवे गुन्हे करणं, व्यसनं करणं आणि हे सर्व करताना काहीही विशेष चूक नाही असं समजणं, या वृत्तीला पुढच्या काळात आवर घालणं हे आव्हान ठरणार आहे. शालेय वयातल्या मुली आणि मुलांपुढे अतिशय सवंग प्रकारची करमणूक ठेवली जाते. यापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम करत राहणं गरजेचं आहे. ‘काम’ आणि ‘टाइमपास’ यांतला फरक ज्यांना कळतो आणि त्यांचं प्रमाण किती असायला पाहिजे हे ज्यांना कळतं, त्यांना या व्यसनाचा काहीच धोका नाही. पण ज्यांच्या नकळत हे प्रमाण व्यस्त होतं, किती वेळ टाइमपास करायचा याचं भान सुटतं, ते धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन ठेपतात.मुलांना खेळू द्या, असं सांगायला लागणं हीच व्यवस्थेची हार आहे. खेळणं हा ‘टाइमपास’ नाही! अभ्यास टाळायचा म्हणून मुलं खेळतात, असं कित्येक पालकांना वाटतं. ते चूक आहे! खेळणं हा मुलांचा बौद्धिक-शारीरिक आविष्कार आहे. ती त्यांच्या मेंदूची गरज आहे. मुलांच्या अंगात जी प्रचंड ऊर्जा असते, ती ऊर्जा मैदानी खेळ न खेळल्यामुळे, घाम येईपर्यंत भरपूर हालचाल न झाल्यामुळे वापरली जात नाही. मग ही ऊर्जा काय करते? तर, नको तिथं बाहेर पडायचा प्रयत्न करते. याचा इतरांना त्रास होतो. कधी वस्तूंची जोरात फेकाफेकी, आदळआपट, कधी आरडाओरड, चिडचिड करणं यांद्वारे ऊर्जा बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो, तर कधी दुसऱ्याला चावणं, मारणं यांतूनही! ..आणि एक हसरं, खेळकर मूल समस्याग्रस्त होतं. थोडक्यात, न खेळल्यामुळे मुलांमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
contact@shrutipanse.com