उत्तर इटालीतील लोम्बार्डी प्रांतातील मिलानो परगण्याची राजधानी असलेल्या मिलान शहराच्या महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या ६० लाखांहून अधिक आहे. शहराचे क्षेत्रफळ १८० चौ.कि.मी. असलेले मिलान लंडन, पॅरिसनंतर युरोपियन युनियनमधील मोठे आíथक उलाढाल होणारे तिसरे शहर आहे. मिलानचे सामथ्र्य कला, व्यापार, शिक्षण, मनोरंजन, फॅशन, अर्थकारण, वैद्यकीय सेवा, प्रसारमाध्यमे, वैज्ञानिक संशोधन, पर्यटन, उद्योग या सर्वच क्षेत्रांत आहे. इटालीचे स्टॉक एक्स्चेंज मुख्यालय, आंतरराष्ट्रीय बँक्स, कंपन्यांमुळे मिलान सदैव गजबजलेले असते. मिलान ही जगाची फॅशन राजधानी समजली जाते. ‘मिलान फॅशन वीक’ आणि ‘मिलान फíनचर वीक’ हे इथले प्रमुख औद्योगिक महोत्सव. इटालीचे एकीकरण झाल्यापासून मिलानचे औद्योगिक क्षेत्रातील आणि व्यापारातील वर्चस्व संपूर्ण इटालीत वाढले. त्यापूर्वी मिलान ऑस्ट्रियन अमलाखाली असताना तिथली रेल्वेसेवा प्रगत झाली होती. रेल्वेमुळे मिलानच्या औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळाली. मिलान शहराचे नगर प्रशासन, ४८ निर्वाचित नगरसेवक किंवा सिटी काऊन्सिल पाहते. दर पाच वर्षांनी त्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. या काऊन्सिलमधून १६ कार्यकारी कौन्सिलरची निवड होते. मेयरची नियुक्ती निवडणुकीने होते. त्यांना ‘असेसर्स’ म्हणतात. मिलान नगर प्रशासनासाठी शहराची नऊ बरोजमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक बरोचे स्वत:चे काऊन्सिल आणि बरो प्रेसिडेंट असतो. मिलान हे दक्षिण युरोपातील सर्वाधिक गर्दीचे वाहतूक केंद्र आहे. २००९ साली मिलानहून रोम, नेपल्स आणि तुरिन येथे जाण्यासाठी अतिवेगवान रेल्वेची सोय झाली आहे. ‘एटीएम’ ही सरकारी यंत्रणा सार्वजनिक वाहतुकीवर नियंत्रण ठेवते. यामध्ये भूमिगत रेल्वे, ट्रॉली बस, बससेवा, ट्रामसेवा इत्यादी सेवांचा समावेश आहे. मिलानच्या ट्रामसेवेचे १७ मार्ग आहेत. हवाई सेवेसाठी मिलान शहराचे लिनेट, मालपेन्सा इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मिलानो ब्रेसो एअरपोर्ट असे तीन विमानतळ कार्यरत आहेत.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
चंदन
झाडे जवळजवळ लावली तर नीट वाढत नाहीत असा एक सर्वसाधारण समज आहे. याला अपवाद आहे चंदनाचे झाड. चंदन नेहमी मोठय़ा वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते. त्याला कारण आहे त्याचे अंशिक परावलंबित्व. चंदन हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो. कारण हा वृक्ष स्वत:चे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. हा वृक्ष दुसऱ्या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या साहाय्याने अन्नशोषण करतो. चंदन ही एक थंड आणि सुगंधित वनस्पती म्हणून आपल्याला परिचित आहे. सँटॅलम अल्बम (Santalum album) हे त्याचे शास्त्रीय नाव. हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात.
चंदनाचा वृक्ष सुमारे १५ मी. उंच वाढतो अनुकूल परिस्थितीत सुमारे १८ ते २० मी. पर्यंतही वाढतो. पाने समोरासमोर, लांबट, पातळ, टोकदार असतात. चंदनाच्या फांद्यांना लहान, गंधहीन फुलांचे गुच्छ येतात. चंदनाचे खोड कठीण, तेलयुक्त असते. खोडाचा आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. चंदनाचे झाड जसे वाढत जाते तसे त्यातील सुगंधित तेलाचा अंशही वाढत जातो. चंदनाचे चारोळीसारखी असणारे फळ पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चंदनाच्या बियांपासून लवकर सुकणारे कोरडे तेल (ड्रॉइंग ऑईल) मिळते. हे तेल इन्सुलेशन टेप व वॉíनश बनविण्यासाठी वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. खोड आणि बियांप्रमाणेच चंदनाच्या मुळांमध्येही तेलाचा अंश असतो. चंदनाच्या तेलात असणाऱ्या सॅटॅलॉल या रसायनामुळे त्याला सुगंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त होतात.
कर्नाटक , तामिळनाडूत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो.
या वृक्षाला आग लगेच लागते. त्यामुळे वणव्यात ही झाडे पटकन पेट घेतात. पित्त आणि दाहशामक गुणांमुळे चंदनाचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. चंदनाला सर्वात जास्त नुकसानकारक असा ‘कणिश'(स्पाइक) रोग होतो. या रोगाशिवाय अमरवेलीमुळे झाडाचे नुकसान होते, तर काही कि टकांचे चंदनाच्या झाडांमुळे नुकसान होते.
– अनघा वक्टे (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org