केवळ हवामानाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र उपग्रह सोडण्याच्या मालिकेची सुरुवात भारताने ‘मेटसॅट’ (नंतर कल्पना-१ असे नामकरण) हा उपग्रह १२ सप्टेंबर २००२ रोजी अवकाशात सोडून केली. या मालिकेतील ‘इन्सॅट-३डीआर’ हा ९ सप्टेंबर २०१६ रोजी सोडलेला आपला अलीकडचा उपग्रह आहे.

त्यामध्ये एकूण हवामानासंबंधी बहुउद्देशीय माहिती सतत गोळा करणारी  इन्फ्रारेड साऊंडर्स, मायक्रोवेव्ह साऊंडर्स, मायक्रोवेव्ह इमेजर्स, स्कॅटरोमीटर्स आणि राडार अल्टिमीटर्स यांसारखी अतिप्रगत उपकरणे आहेत. मॉन्सूनच्या अंदाजासाठी प्रमुख घटकांबाबत योग्य एककांत माहिती प्राप्त केली जाते.

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
elon musk starlink
जिओ आणि एअरटेलला टक्कर देणार एलॉन मस्क यांचे स्टारलिंक; काय आहे सॅटेलाइट इंटरनेट? त्याचा भारतीयांना कसा फायदा होणार?
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

’  ढगांची उंची, व्याप्ती आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण  ’   ढग आणि त्यांच्यावरील वातावरणातील तापमान आणि  ’   समुद्रावरील तापमान   ’  खुल्या समुद्रावरील वाऱ्यांचा वेग  ’  बाष्पीकरणाची तीव्रता  ’   हिमालयातील हिमनगांची व्याप्ती आणि स्थित्यंतरे अशा घटकांच्या माहितीचा वापर हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग मोजणे, तिबेटच्या पश्चिम-मध्य व पूर्व पठारात वाढणारे तापमान आणि मध्य पाकिस्तानावरील कमी होणारे तापमान तपासणे; तसेच कमी दाबाचे पट्टे यांचा संख्यात्मक वेध घेणे यासाठी केला जातो. त्याआधारे गणिती पद्धतींनी मॉन्सूनचे आगमन आणि एकूण पर्जन्यवृष्टीबाबत अंदाज वर्तवला जातो.

मॉन्सूनदरम्यान घडणाऱ्या हवेतील काही विशिष्ट आंदोलनांमुळे मध्येच काही काळ पाऊस पडत नाही याचा मागोवाही उपग्रहाच्या छायाचित्रांनी आणि आकडेवारीने घेतला जातो. असा कोरडा काळ लांबला तर शेतात केलेली पेरणी फुकट जाते. म्हणून याबाबतचा अंदाज जास्तीत जास्त अचूक करून तो शेतकऱ्यांना वेळेवर कळवणे अतिशय महत्त्वाचे असते.

मॉन्सूनच्या अंदाजासाठी भारतात पूर्वी वापरल्या जाणाऱ्या १६ घटक आधारित प्रतिकृतीसाठीही उपग्रहाद्वारे मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जात असे. आता वापरात असलेल्या नव्या संख्यात्मक हवामान अंदाज प्रणालीसाठीदेखील उपग्रहाने दिलेली निरीक्षणे कळीची भूमिका बजावत आहेत.

पाऊस, हवामानाचा अंदाज अधिक अचूकतेने करण्यासाठी, उपग्रहाकडून मिळालेली  छायाचित्रे-आकडेवारी आणि पारंपरिक वेधशाळेने गोळा केलेली माहिती यांचा संयुक्त वापर केला जातो. आता प्रत्येक जिल्ह्य़ासाठी मॉन्सूनदरम्यान एकूण पाऊस, जवळच्या काळातील पाऊस (४८ ते ७२ तास) आणि अनौपचारिकरीत्या आगामी २० दिवसांतील पाऊस याबद्दल भारतीय हवामान खाते अंदाज पुरवते.

‘उपग्रह हवामानशास्त्र’ अशी एक नवी शाखा उदयास आली असून भारत त्यात भरीव योगदान करू शकतो; कारण आपले स्वत:चे उपग्रह आता उपलब्ध आहेत.

डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

तकळ्ळी शिवशंकर पिल्लै

भारतीय ज्ञानपीठाचा १९८४ चा ज्ञानपीठ पुरस्कार ख्यातनाम मल्याळम् लेखक तकळ्ळी शिवशंकर पिल्लै यांना त्यांच्या भारतीय साहित्यातील अमूल्य योगदानासाठी प्रदान करण्यात आला.

मेक्सिकोचे जगप्रसिद्ध कवी व लेखक ऑक्टोव्हियो पाझ यांच्या हस्ते १९८४ चा ज्ञानपीठ पुरस्कार (वाग्देवीची तांब्याची मूर्ती, दीड लाख रुपये व मानपत्र) देऊन तकळ्ळी यांचा गौरव करण्यात आला. ‘ज्ञानपीठ’ मिळविणारे तकळ्ळी शिवशंकर पिल्लै हे विसावे व मल्याळम् भाषेतील तिसरे मानकरी ठरले. यापूर्वी १९६५ चा पहिला पुरस्कार मल्याळम् कवी गोविंद शंकर कुरूप यांना आणि १९८० चा श्री. एस. के. पोट्टेक्कार यांना दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

केरळ राज्यातील तांदळाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुट्टनाड अलेप्पी जिल्हय़ातील तकळ्ळी या लहानशा गावात सरंजामशाही वातावरणात, एका नायर कुटुंबात १७ एप्रिल १९१२ मध्ये शिवशंकरांचा जन्म झाला. पुढे सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार म्हणून नावारूपास आल्यानंतर त्यांनी आपल्या नावाआधी तकळ्ळी हे आपल्या जन्मगावाचे नाव लावले. त्यावरून ते तकळ्ळी शिवशंकर पिल्लै या नावाने साहित्य-जगतात प्रसिद्ध झाले.

तकळ्ळींचे वडील शेतकरी होते. कथकली नृत्यप्रकाराचे जाणकार होते. दररोज संध्याकाळी त्यांचे वडील कुटुंबातील सर्वाना रामायण-महाभारत आणि अन्य पुराणांतील कथा ऐकवीत असत आणि तकळ्ळीही अतिशय लक्षपूर्वक ऐकत असत आणि हीच कथाकार बनण्याची एक प्रेरक शक्ती झाली. तकळ्ळी यांचे प्राथमिक शिक्षण तकळ्ळी या जन्मगावी झाले. नंतरचे शिक्षण अम्बारलापुष्प येथील माध्यमिक शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी ते कुरुवत इथे गेले. सुरुवातीला त्यांनी कवितालेखन केलं पण कुरुवत शाळेतील शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे ते गद्यलेखनाकडे वळले आणि कथा लिहायला लागले. या त्यांच्या कथा त्या वेळच्या केसरीच्या अंकात प्रसिद्ध होऊ लागल्या. पुढे त्रिवेंद्रममध्ये ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी मोपॉसा, चेकॉव्ह, हय़ुगो, टॉलस्टॉय, गॉर्की यांच्या साहित्याचे अध्ययन केले आणि याचा विलक्षण प्रभाव तकळ्ळींवर पडला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या लेखनाला त्रिवेंद्रममध्येच प्रोत्साहन मिळाले.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com