एल्फिन्स्टन हे ब्रिटिश ईस्ट इंडियातील सामान्य नोकरीपासून अत्यंत उच्च पदापर्यंत म्हणजे मुंबई (तत्कालीन बॉम्बे) इलाख्याच्या गव्हर्नर पदापर्यंत पोहोचलेले ब्रिटिश आमदानीच्या काळातील एक महान अधिकारी होते. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे एक प्रशासक आणि राजकीय मुत्सद्दी म्हणून त्यांनी काही कठोर निर्णय घेऊन ब्रिटिश राज्यकत्रे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे हित साधले, तसेच प्रशासक म्हणून मराठी जनतेच्या सामाजिक कल्याणासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातले योगदान मोलाचे ठरले. त्यामुळे ब्रिटिश सरकारदरबारी एक निष्ठावंत सेवक, कर्तृत्ववान अधिकारी म्हणून जसे त्यांचे नाव झाले तसेच एक प्रजाहितवादी शासकीय अधिकारी म्हणून ते महाराष्ट्राच्या जनतेतही लोकप्रिय झाले. ते स्वत इतिहासाचा सखोल अभ्यासक आणि इतिहास लेखक होते. त्यांनी हिंदुस्थान (इंडिया) आणि अफगाणिस्तानवर इतिहासाची पुस्तके लिहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडच्या डुंबार्टनशायर परगण्यात १७७९ साली झाला. एडिनबरोच्या रॉयल हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर असलेल्या त्यांच्या चुलत्यांनी माऊंटना कंपनीच्या नागरी प्रशासन विभागात नोकरीला लावून घेतलं. कंपनीने त्यांची नियुक्ती भारतात कलकत्त्याला केली. १७९६ साली वयाच्या सतराव्या वर्षी भारतात येऊन कंपनी सरकारच्या सेवेत रुजू झालेले एल्फिन्स्टन भारतात एकूण ३२ वर्षे राहिले आणि त्यापैकी बहुतेक काळ त्यांनी मुंबई-पुण्याच्या परिसरात वास्तव्य केले.

पहिली चार वर्षे ते बनारसचे मॅजिस्ट्रेट डेव्हिसचा साहाय्यक म्हणून होते. कंपनी सरकारने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केल्यावर बनारसमध्ये दंगल उसळून ब्रिटिश लोकांची कत्तल झाली त्यातून एल्फिन्स्टन शिताफीनं वाचले. १८०१ साली एल्फिन्स्टन यांची नेमणूक पुण्याच्या रेसिडेन्सीमध्ये रेसिडेंट सर बॅरी क्लोजचा साहाय्यक म्हणून झाली. घोडा, उंट, हत्ती इत्यादी प्रवासी साधनांनी कलकत्त्याहून मजल दरमजल करीत निघालेले एल्फिन्स्टन एक वर्षांने पुण्यास पोहोचले. वाचनाचा नाद असलेल्या एल्फिन्स्टननी इंग्लंडहून येताना बरोबर पुस्तकांचे गठ्ठेही आणले होते.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com