साधारण १५०० वर्षांपूर्वी म्हणजे इसवीसन ५०० ते ६०० च्या दरम्यान भारतीय दशमान पद्धती भारतात पूर्णत्वास पोचली. त्यानंतर साधारण आठव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मगुप्ताच्या ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ या ग्रंथाचं भाषांतर अरबी भाषेत करण्यात आलं.
त्यावरून ८२५च्या दरम्यान अल ख्वारिज्मी या अरबी गणितीने भारतीय संख्यालेखन पद्धती आणि अंकगणिती क्रियांचा आपल्या पुस्तकात वर्णन करून त्यांचा अरबी जगात प्रसार केला.
अल ख्वारिज्मी (जन्म सु. इसवीसन ७८०- मृत्यू ८५०.) हा अरबी गणितज्ज्ञ व ज्योतिषशास्त्रज्ञ होता. अल-ख्वारिज्मीचं पूर्ण नाव महमद इब्न मुसा अल् ख्वारिज्मी. त्यांचा जन्म इसवीसन ७८० मध्ये ख्वारिज्म (आता रशियात असलेल्या) येथे झाला असावा; असा तर्क आहे. अल् मामुम व अल् मुतासिम या खलिफांच्या कारकीर्दीत ख्वारिज्मी यांनी बगदाद येथील वेधशाळेत काम केलं, तसंच विज्ञान व गणित विषयांवर त्यांनी ग्रंथ लिहिले. ‘किताब अल्-जाब्र वाल मुकाबला’ या नावाच्या बीजगणितावरील आपल्या ग्रंथात त्यांनी एकघाती आणि द्विघाती समीकरणांचे उकल शोधण्याचे नियम, प्राथमिक भूमिती इ. विषयांचं विवरण केलं होतं. या ग्रंथाच्या नावावरूनच ‘आल्जिब्रा’ हा शब्द पुढे रूढ झाला.
या ग्रंथाचं पुढे लॅटिनमध्ये भाषांतर झाल्यानंतर मध्ययुगीन युरोपात गणिताच्या अभ्यासाला मोठी चालना मिळाली. यामुळे भारतीय दशमान पद्धतीचा परिचय सर्व युरोपात झाला. िहदूंच्या दशमान पद्धतीवरील ख्वारिज्मी यांच्या ग्रंथाचा काही अवशेष लॅटिन भाषांतराच्या स्वरूपात अद्यापही सुरक्षित आहे. या ग्रंथामुळेच युरोपला दशमान पद्धतीच्या संख्यालेखनाचा व गणितक्रियांचा परिचय झाला. ब्रह्मस्फुट सिद्धांत या भारतीय ग्रंथावर आधारलेल्या ‘सिंद-िहद’ या अरबी ग्रंथावरून ख्वारिज्मी यांनी ज्योतिषीय कोष्टकं तयार केली होती.
पुढे इसवीसन १२०२मध्ये फीबोनातची (ा्रुल्लूं्रू) या इटालियन गणितीने ‘लिबेर अॅब्साय’ (छ्रुी१ अु२्रू) या पुस्तकातून भारतीय संख्या आणि अंकगणिती रीती विस्ताराने शिकवल्या आणि त्याचा पुरेपूर प्रचार केला. साधारण सोळाव्या शतकात भारतीय अंकगणित युरोपमध्ये मूळ धरू लागलं. गेल्या तीनशे वर्षांत गणिताची आणि पर्यायाने विज्ञानातील मोजमापनाची जी झपाटय़ाने वाढ झाली, ती भारतीय दशमान संख्यालेखन पद्धतीशिवाय अशक्य होती. ते अल-ख्वारिज्मी या गणितीमुळे शक्य झालं.
–चारुशीला सतीश जुईकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
माणूस निर्मळ, उदार बनवणे हा साहित्याचा धर्म!
१९७५ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या मनोगतात पी. व्ही. अकिलन म्हणाले-
‘‘तिरुवल्लुवर, कम्बर, आलवार्स, रामलिंग स्वामीगल, सुब्रह्मण्य भारती अशा महान कवींची आणि विचारवंतांची भूमी असलेल्या दूरवरच्या दक्षिण क्षेत्रातून मी आलेलो आहे. त्यामुळे मी दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्तराधिकारी आहे. असे असले तरी देशातील अन्य भागातील साहित्यिक, सांस्कृतिक परंपरेच्या प्रभावापासून मी स्वत:ला वेगळे ठेवू शकलेलो नाही.
स्वामी विवेकानंद आणि बंकीमचंद्र चटर्जी यांच्या साहित्यकृतीपासून ती खूप प्रेरणा घेतलेली आहे, पण माझ्या भावचेतनेवर महात्मा गांधींचा मोठा प्रभाव आहे. देशाप्रति आणि देशबांधवांप्रति माझं दायित्व मोठं आहे- याची जाणीव मात्र, महात्मा गांधींच्या सत्यनिष्ठेमुळे आणि न्यायभावनेमुळेच झालेली आहे. जाणीव होणं आणि प्रत्यक्ष आचरण करणं यात मोठं अंतर आहे. मी लेखनाच्या माध्यमातून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मी का लिहितो? किंवा आपल्या तरुणपणीच मी लिहायला का सुरुवात केली? मी लेखक बनावं अशी माझी काही महत्त्वाकांक्षा नव्हती. मात्र माझ्या परिस्थितीने आणि देशाच्या दुरवस्थेने मला विवश केलं. गुलामी आणि लाखो लोकांच्या दयनीय स्थिती- विरुद्ध विद्रोहाच्या भावनेला अभिव्यक्त कसं करावं हा माझ्यापुढचा प्रश्न होता.
‘कलेसाठी कला’ हा सिद्धान्त मला कधीच पटला नाही. प्रयोजन नसताना तोंडातून एक शब्दही काढू नकोस- या एका वाक्यातून मी घडलेलो आहे. माझा भाषेच्या सरळपणावर, साधेपणावर विश्वास आहे. कोणतीही गोष्ट साधेपणानं सांगणं मला आवडतं. यासाठी महात्मा गांधी हे माझे आदर्श आहेत. प्रत्येकाला समजेल असं कलेचं आणि साहित्याचं रूप असलं पाहिजे असं त्यांचं सांगणं होतं.
साहित्याचा धर्म हा मनुष्याचं मन निर्मळ आणि उदार बनवणं हा आहे. मी एक सामान्य माणूस आहे आणि आपल्यासारख्याच सामान्य माणसांसाठी लिहितो आहे.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com