नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठय़ा प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठय़ा प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्य़ांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात. द्रवरूप दिलेल्या नसíगक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात. सी.एन.जी. जळत असताना कमी प्रमाणात बाष्पनिर्मिती होते व त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढीव असते व त्यामुळे वाहनाला वेग देण्याची क्षमता वाढते. वाहनाचा वेग घेण्याची क्षमता ठरविणारा ऑक्टेन क्रमांक पेट्रोलचा ९१ (स्कूटर कार, रिक्षासाठी) आणि ९७ (महागडय़ा कारगाडय़ांसाठी) असतो, तर सी.एन.जी.चा तोच ऑक्टेन क्रमांक १३० पर्यंत जातो. यावरून, त्याची इंधनक्षमता लक्षात येईल. आपल्या देशातील जमिनीच्या पोटात सुमारे १३,००० कोटी घनमीटर इतका नसíगक वायू साठलेला आहे. त्यातील ७,००० कोटी घनमीटर वायू आपण सहज बाहेर काढू शकतो व गरजेनुसार वापरू शकतो. इंधनाच्या दृष्टिकोनातून १००० घनफूट नसíगक वायू हा सुमारे नऊ दशांश टन तेलाच्या तोडीचा असतो. तेव्हा, हा वायू पद्धतशीरपणे बाहेर काढला तर आपण लाखो टन तेलाच्या क्षमतेचा सी.एन.जी. मिळवू शकतो. हा वायू पेट्रोल व डिझेल तेलाच्याऐवजी वापरता येतो हे सिद्ध झाल्याने जगभरात त्याचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे लोण पसरले आहे, कारण या वायूंवर धावणाऱ्या वाहनांची इंधनक्षमता, पेट्रोलवर धावणाऱ्या आजच्या घडीला उत्कृष्ट इंजिनापेक्षा २० ते २५ पटीने जास्त असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा