मनुष्याच्या शरीरात ७० टक्केपाणी आहे. पृथ्वीवर ७० टक्केपाणी आहे. किलगडासारख्या फळात ९० टक्केपाणी आहे. असे सगळीकडे पाणी आहे. पाणी हे उत्तम वाहक आहे. समुद्र आणि नद्या एका ठिकाणची माती दुसरीकडे वाहून नेतात ती पाण्यामुळे. जंगलातील कापलेली लाकडे इतर मार्गाने वाहून नेण्याऐवजी जमेल तेथे पाण्यामार्फत त्यांची वाहतूक करतात. वाईट गोष्ट असली तरी अनेक नगरपालिका आणि कारखाने आपापले सांडपाणी नद्यात सोडून एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवतात. एखादी गोष्ट साफ करायची म्हणजे आपण ती पाण्याने धुऊन घेतो. गोष्ट पाण्याने धुऊन घेणे आíथकदृष्टय़ा सर्वात स्वस्त असते. घरातील धुणी-भांडी आणि कपडे आपण पाण्याने धुतो. संडास-बाथरूममधील घाण काढून टाकण्यासाठी पाण्याचाच वापर करतात. दुधाच्या बाटल्यातील दूध काढून टाकल्यावर परत भरण्यापूर्वी त्या पाण्याने धुऊन घेतात. अशा प्रकारे जेथे जेथे स्वच्छतेची गरज पडते तेथे पाणी वापरले जाते. पाण्याचा हा गुणधर्म जसा स्वच्छतेसाठी वापरला जातो, तसा उष्णता शोषून घेण्याचा पाण्याचा गुणधर्म शामक म्हणूनही उपयोगी पडतो. आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. रासायनिक कारखान्यात पदार्थाला उष्णता देण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी थंड किंवा गरम पाण्याचा वापर केला जातो. म्हणजे पाणी हे उष्णतेचे वाहक आहे. ते उष्णता शोषून घेते तसे ते उष्णता अथवा थंडपणा देते, त्याचे वहन करते.  औषध पातळ करायचे असेल तर जसे त्यात पाणी घालतात, तसेच अनेक पदार्थ पातळ करण्यासाठीही पाणी घालतात. पाण्याचा गुणधर्म जसा एखादी गोष्ट स्वच्छ करण्यासाठी होतो, त्याच गुणधर्मामुळे जे पाणी एखादी गोष्ट स्वच्छ करते ते खराब झालेले असते. ते माणसाच्या पिण्यासाठी अयोग्य झालेले असते. असे पाणी प्यायल्यामुळे माणसाला अनेक प्रकारची रोगराई होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणावर पडत असल्याने या दिवसात हा धोका मोठय़ा प्रमाणात संभवतो, म्हणून पिण्याचे पाणी अ‍ॅक्वागार्डमधून फिल्टर करून घेणे अथवा उकळून पिणे केव्हाही श्रेयस्कर.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. -फ्रेडरिक फोर्सिथचं जग
फ्रेडरिक फोर्सिथची अ‍ॅव्हेंजर ही जाडजूड कादंबरी वाचून संपली आणि मनापासून या आवडत्या लेखकाचे आभार मानले. त्याआधी ‘कोब्रा’ ही कादंबरी वाचूनही असेच धन्यवाद दिले होते. विमानतळ, लांब पल्ल्याचा आगगाडीचा प्रवास, कधी वाट पाहणे असा सर्व ‘टाइमपास’ काळासाठी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची कामं बाजूला सारून त्यांनी दिलेल्या बहुमोल माहिती, रंजन आणि जीवनदृष्टीबद्दल त्यांना थँक्यू म्हटलं.
फोर्सिथनी लिहिलेल्या जवळजवळ प्रत्येक शब्द गेली पस्तीस वर्षे मी वाचतोय. त्यांनी ‘द डे ऑफ जॅकल’ने सुरुवात करून दिली. आणि आता ही शेवटची असं म्हणून आणखी कादंबऱ्या ते लिहीत गेले. जगातल्या करोडो वाचकांनी उडय़ा मारून त्यांचं साहित्य वाचलं. त्यांच्या कादंबऱ्यांवरचे चित्रपट पाहिलेत. ‘डे ऑफ जॅकल’ ही कादंबरी आणि
‘एडवर्ड फॉक्स’चा त्याच नावाचा सिनेमा माझा सर्वात आवडता. ‘द फोर्थ प्रोटोकॉल’ ही कादंबरी आणि पिअर्स ब्रॉस्ननचा त्याच नावाचा सिनेमा तितकाच पसंत. डॉग्ज ऑफ वॉर, डेव्हिल्स आल्टरनेटिव्ह, डिसीव्हर (या लघुकथांवरले लघुचित्रपट) फिस्ट ऑफ गॉड, अफगान, अशा कादंबऱ्यांमधून वाचकांसमोर कोल्ड वॉरपूर्व युरोप, कोकेन या अमली पदार्थाचा व्यापार, बॉस्नियामधली सिव्हिल वॉर, चेचन्यामधले टेररिस्ट’ असे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संघर्ष फ्रेडरिक फोर्सिथ यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून मांडलेले आहेत. संघर्षांचा सांगोपांग अभ्यास, राजकीय लोकांचा अहंभाव, त्यांच्या पाशवी वृत्ती, विखारी सूड, लैंगिक विकृती व त्यात भरडलेले सामान्यजन यावर ते लिहितात. गंमत म्हणजे कादंबरीतील इतिहास त्या घटना घडविणाऱ्या माणसांच्या आयुष्यावरून आपल्याला सांगतात. अतिशय सूक्ष्म बारकावे, स्वभावाचे तपशील आणि मनात उमटणारी सूक्ष्म आंदोलनं ते अत्यंत तटस्थपणे टिपतात.
कादंबऱ्यांमधील ‘हिरो’ अर्थातच एखादा हेर. त्याला चालवणारा एखादा एजंट असतो. डबल एजंट असतात. हेड लेटर बॉक्स असतात. त्या हिरोची बुद्धी, चाणाक्षपणा आणि स्वभावनिष्ठ मर्यादा यांचा चढता-उतरता आलेख कादंबऱ्यांत असतो. इतक्या बारीकसारीक गोष्टी सांगून ते एखाद्या शब्दानेदेखील पाल्हाळ लावत नाहीत. तसे आपल्या हिरोच्या प्रेमात पडत नाहीत तरी आपणच त्या स्पायचं हे मिशन यशस्वी व्हावं अशी मनोमन इच्छा धरतो. डॉग्ज ऑफ वॉर कादंबरीमधले ‘भाडोत्री सैनिक’ दुसऱ्या देशावर हल्ला करताना दाखवले. प्रत्यक्षात अशी रक्तरंजित क्रांती घडलीदेखील. वदंता अशी आहे की, म्हणे पुढल्या काळात भाडोत्री सैनिकांसाठी ‘डॉग्ज ऑफ वॉर’ संदर्भग्रंथच ठरलं! त्यांनी हेरकथा लिहिण्याचे संकेत पहिल्या कांदबरीतच मोडले. ‘द गॉल’ या फ्रेंच अध्यक्षाच्या खुनाच्या प्रयत्नावर बेतलेल्या या कादंबरीत अखेर गॉल मरत नाहीत, हे वाचकाला ऑलरेडी ठाऊक असते. तरीही हातात धरलेले पुस्तक सोडवत नाही. ‘ओडेसा फाइल’ वाचून आणखी एका छुप्या नाझी लष्करी अधिकाऱ्याचा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे  शोध घेतला गेला. फोर्सिथ यांनी इतिहासाचं चित्रण केलं; तसा इतिहास घडवलाही!
फोर्सिथ आता ७५ च्या पुढे आहेत. ते स्वत: वय चोरून १९व्या वर्षी फायटर पायलट  झाले. प्रत्यक्ष युद्धभूमीवरून त्यांनी रिपोर्टिग केलंय. पत्रकारिता नसानसांत भिनलीय आणि कथाकथनात केवळ ‘मास्टरी’ आहे असं वाटतं. जीवन म्हणजे फोर्सिथ यांच्या पुढच्या पुस्तकाची वाट पाहणे.. वाचल्या आहेस ना या कादंबऱ्या?

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !

इतिहासात आज दिनांक.. – १६ नोव्हेंबर
१६३२ स्वीडनचे सामथ्र्यशाली सम्राट गुस्तावस द्वितीय अ‍ॅडॉल्फस यांना वयाच्या ३८ व्या वर्षी युद्धभूमीवर वीरमरण. १६११ मध्ये राजेपदावर आल्यावर त्यांच्या लक्षात आले, की आपल्या देशात खूपच अनागोंदी माजली आहे. लष्कराची पुनर्रचना केली. प्रशासनाचे सुशासनात रूपांतर केले. डेन्मार्कशी शांततेचा करार केला. ख्रिस्तियन चौथाने स्वीडनवर  केलेले आक्रमण संपुष्टात आणले. १६१३-१७ या दरम्यान त्यांनी रशियाचा पराभव केला. फिनलंड व लिव्होनियाचा भाग मिळविला. पोलंडबरोबर १६१७ मध्ये स्टोलबोव्हा येथे, १६२९ मध्ये अल्टमार्कचा तह केला. पवित्र रोमन साम्राज्याचा जो संघर्ष (१६१८-४८ )चालू होता त्यात गुस्तावस द्वितीय यांच्या भूमिकेला महत्त्व आले. १६३०  मध्ये १५ हजार सैन्य घेऊन त्यांनी पोमेरिनियाची सरहद्द ओलांडली. स्टेटिनो जिंकले. १६३२ मध्ये त्यांनी बव्हेरियावर हल्ला केला. ऑगस्बर्ग व म्युनिच ताब्यात घेतले. याच दरम्यान लाईपझिग जवळ झालेल्या लढाईत त्यांनी विजय मिळविला. परंतु ते मारले गेले.  
१८५२ स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांचा कंपनीसरकारतर्फे सत्कार करण्यात येऊन मेजर कँडी यांच्या हस्ते मानाची शालजोडी देण्यात आली.
१९९६ कोकण रेल्वेच्या रत्नागिरी-मुंबई मार्गाचा शुभारंभ झाला आणि रेल्वेच्या इतिहासातील नवा अध्याय सुरू झाला.
 डॉ. गणेश राऊत  – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची –इजिप्तचा सुधारक राजा ऑमेनहॉटेप
इजिप्तमध्ये निरनिराळ्या घराण्यांची राजकीय कारकीर्द इ.स. पूर्व ३१०० ते इ.स. पूर्व ३० अशी झाली. या काळात निरनिराळ्या ३३ राजवंशांनी इजिप्तवर राज्य केले. त्यापैकी अठराव्या राजवंशाची कारकीर्द इ.स. पूर्व १५५० ते इ.स. पूर्व १२९२ अशी झाली. राजघराण्यातील ऑमेनहॉटेप चवथा या फेरोचा कार्यकाळ इ.स. पूर्व १३५२ ते इ.स. पूर्व १३४४ असा होता. ऑमेनहॉटेप-४ हा शरीराने दुर्बल पण मनाने अतिशय भक्कम होता. त्याने सामाजिक व धार्मिक सुधारणांकडे अधिक लक्ष घातले. त्याने फिलॉसॉफी आणि थिऑलॉजी याच्यामध्ये स्वत:ला झोकून दिले. त्याने स्वत:च्या कल्पनेप्रमाणे नव्या धर्माची स्थापना केली आणि त्याचा प्रचारही केला. त्याने सामाजिक व धार्मिक क्रांती केली. श्रीमंत वर्ग, पुजारी व धार्मिक संस्था सत्तेचे केंद्र बनू पाहात होते. त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले.
ऑमेनहॉटेपने अनेक देव व त्यांचे पुजारी यांना मोडीत काढले. अ‍ॅटॉन (सूर्यदेव) हा एकच देव स्वीकारला आणि स्वत:ला त्या देवाचे प्रेषित म्हणून घोषित केले. त्याने स्वत:चे नाव अ‍ॅमेनहॉटेप बदलून ‘अखनेतन’ (अ‍ॅटॉनचा भक्त) सूर्याच्या किरणांमध्ये जीवन जगविण्याची ताकद असून, तो किरणांच्या रूपाने जगात सर्वत्र उपस्थित असतो. त्याने लक्झर व कर्नाक येथे पूर्वीच्या अमून देवाचे मंदिर होते, तिथे अ‍ॅटानचे देऊळ बांधले. ही देवळे अजूनही अस्तित्वात आहेत. थिब्स् येथील अमून देवाच्या देवळातील पुजाऱ्यांचा या नवीन देवाला विरोध असल्याने ऑमेनहॉटेपने तेथल्या पुजाऱ्यांना काढून टाकले. सर्व देवळातील व थडग्यातील अमून हे नाव काढून टाकले. आतापर्यंतच्या फॅरोंना देव म्हणजे आपल्या रथासमोर सर्वाना वाकायला लावणारा, शत्रूवर विजय मिळवून देणारा अशा कल्पना होत्या. अखनेतनने देवांमध्ये सर्वाचे पितृत्व बघितले. त्याने सत्यावर भर ठेवला. त्याच्या या साधेपणाचा कलांमधला परिणाम म्हणजे भडकपणा जाऊन सौंदर्य व साधेपणा आला.
सुनीत पोतनीस  -sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader