ऑपरेशन थिएटर हा रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचा भाग. हा संपूर्ण भाग जंतूविरहित असला पाहिजे व तो तसा ठेवण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेतली जाते. ऑपरेशन करताना कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते. वातानुकूलनाने हल्ली हे शक्य होते. थिएटर आकाराने मोठे असल्याने काम करणाऱ्या व्यक्तींना हालचाली नीट व मोकळेपणाने करता येतात. एकमेकांना धक्का लागत नाही. तसेच हवाही खेळती राहते. नेहमीपेक्षा आतील हवेचा दाब थोडा जास्त ठेवला जातो. थिएटरला दोन दारे असतात. एक हात धुण्याच्या जागेकडे जाण्यासाठी व दुसरे र्निजतुकीकरण केलेल्या भागासाठी. ही दारे दोन्ही बाजूंना उघडणारी व वजनाने हलकी असतात. आतील हवा एका तासात २५ वेळा बदलली जाते. परिणामी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. आतील तापमान १८ ते २४ अंश सेल्सियस व आद्र्रता ५० ते ५५ टक्के असते. म्हणजे आतील व्यक्तींना काम करायला सुखकारक वाटते. ऑपरेशन टेबल प्रवेशद्वारापासून लांब व डोक्याची बाजू र्निजतुकीकरण केलेल्या बाजूकडे असते. थिएटरमधील सर्व लाद्या प्रत्येक ऑपरेशननंतर डिर्टजट वापरून धुतल्या जातात. र्निजतुकीकरण करण्यासाठी २ टक्के फेनॉल वापरले जाते. िभती, टेबल, इंस्ट्रमेंट, ट्रॉली, स्टुले ही अशीच स्वच्छ केली जातात. ऑपरेशन करणारी सर्व टीम प्रत्येक ऑपरेशननंतर कपडे बदलून दुसरे र्निजतुकीकरण केलेले कपडे घालतात. हल्ली काही ऑर्थोपिडीक सर्जन व त्यांची टीम अंतराळवीराप्रमाणे र्निजतुकीकरण केलेले स्पेस सूट घालून ऑपरेशन करतात. म्हणजे श्वासोच्छ्वासाची हवा रुग्णाच्या जखमेवर जात नाही व जंतुसंसर्ग टाळता येतो. या पोशाखात बसवलेल्या पंख्यामुळे हवा सूटमध्ये फिरत राहून वापरलेली हवा लांब फेकली जाते. या सूटमुळे सर्जननापण जास्त मोकळेपणा मिळतो. ऑपरेशनसाठी लागणारे सर्व सुती कपडे, गॉज, बँडेज इ. गोष्टींचे ऑटोक्लेव्ह करून र्निजतुकीकरण केले जाते. ऑटोक्लेव्ह प्रेशर कूकरसारखे असते. वरील सर्व गोष्टी सर्व बाजूंनी भोके असलेल्या स्टेनलेस स्टीलच्या ड्रममध्ये भरून उच्च तापमान व उच्च दाबाखाली र्निजतुक केल्या जातात.
डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा