मनमोराचा पिसारा.. मेंदू म्हणजे ग्रंथालय
मित्रा, परवा गप्पा मारता मारता म्हणालास की, तुझ्या काकांची स्मरणशक्ती एखाद्या विश्वकोशासारखी आहे. जुनीपानी, नवी नि आधुनिक माहिती साठवलेलं ते चालतंबोलतं पुस्तक आहेत. तुला त्यांच्या या अफाट क्षमतेविषयी आदर वाटला आणि किंचित हेवाही वाटला, होय ना? आपल्याला दोन गोष्टींचं अफाट कौतुक वाटतं. पहिली गोष्ट कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दुसरी अचाट स्मरणशक्ती. कसं काय जमतं बुवा तुम्हाला? ‘अरे xxx, मला तर  बायकोने सांगितलेल्या चार गोष्टी आठवत नाहीत. घरी गेल्यावर थापाथापी करून वेळ मरून न्यावी लागते आणि काकांना मात्र त्यांच्या लग्नात कोण कोण आलं होतं, याची इत्थंभूत माहिती असते! मित्रा, अचंबित वाटणं सोडणार असशील तर मेंदू आणि स्मरणशक्तीच्या रहस्याबद्दल गमती सांगायच्या आहेत. तुझ्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत, तशा विद्यार्थीवर्गासाठी मोलाच्या आहेत. तेव्हा काळजीपूर्वक वाच.
खरं म्हणजे, सुरुवातीला ‘स्मरणकोश’ हा शब्द वापरलास ना, तो चुकीचा आहे. आपल्या आठवणी किंवा स्मरणात ठेवलेल्या, राहिलेल्या, साठविलेल्या गोष्टी ग्रंथासारख्या नसून, एखाद्या ग्रंथालयाप्रमाणे असतात. ग्रंथालयातला ग्रंथपाल तू मागितलेलं पुस्तक पटवून आणून देताना पाहिलं असशील. उत्तम रीतीने चालविलेल्या ग्रंथालयातल्या आणि तत्पर, सावध (अ‍ॅलर्ट) ग्रंथपालाला हे सहज शक्य होतं. पुस्तकाचं नाव, लेखक किंवा विषय सांगितलं तर पुरतं.. पुस्तक झटकन काऊंटरवर आणून ठेवलं, असं समज. हे कसं काय शक्य होतं? याचा आपल्या स्मरण साठवणीशी काय संबंध?
ग्रंथालयात पुस्तकं साठविण्याची विशिष्ट पद्धत असते. लेखकाचे नाव, विषयाचा प्रकार आणि त्याचे विशिष्ट ‘कोड’ किंवा संकेत असतात. उदा. कादंबऱ्यांचा संकेत क्रमांक ‘८२३’. मग श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी म्हणजे ‘एसएनपी’. कादंबरीचे नाव ‘गारंबीचा बापू’. याचा संकेत ‘जीबी’ ८२३ क्रमांकवाली सगळी पुस्तकं ८ व्या शेल्फमध्ये आहेत. त्या शेल्फवरली पुस्तकं लेखकाच्या इंग्रजी आद्याक्षरानुसार लावलेली आहेत. लेखकाच्या संचातली पुस्तकं, त्यांच्या नावाच्या आद्याक्षराप्रमाणे एकापाठोपाठ लावलेली आहेत. आठव्या शेल्फची जागा दुसऱ्या दालनातल्या तिसऱ्या रांगेत आहे. म्हणजे मित्र, विशिष्ट पुस्तक, ग्रंथालयात कुठे ठेवलेलं आहे, याची इत्थंभूत माहिती चार-पाच अक्षरांत नि आकडय़ांत ठेवलेली असते. पुस्तकं चटकन सापडण्याकरिता त्यांना विशिष्ट संकेत आधी देणं नि त्यानुसार त्यांची मांडणी करणं अत्यावश्यक असतं. ग्रंथपालाला घोकंपट्टी करावी लागत नाही. ते शक्यही नसतं. ग्रंथपाल सजग आणि तत्पर असणे आवश्यक आणि त्यानं पुस्तकात रस घेणंही गरजेचं.
अगदी त्याच पद्धतीने आपण आपल्या स्मरण साठवणीत माहिती ठेवतो. माहितीचं रजिस्ट्रेशन, संकेत देणं हे काम आपला सजग आणि तल्लख मेंदू करतो. त्याला ते बिनबोभाट करू द्यावं. तू उगीच घाई करतोस, आठवते की नाही, याची चिंता करतोस, वाचताना, माहिती गोळा करताना लक्ष देत नाहीस म्हणून विसर पडतो. आता हे तुझ्या दहावी-बारावीतल्याच नाही तर केजीमधल्या मुलांना सांग. समजावून..!
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : मोबाइल फोन आणि आरोग्य
मोबाइल फोन हा आता आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे, पण सततच्या वापराने आणि शहरातील वाढत्या मोबाइल टॉवरमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. काही विशिष्ट शरीर प्रकृतीच्या लोकांना हे मोबाइलचे विकिरण जास्त घातक ठरत आहेत. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांच्या डोक्याची कवटी पातळ असते, त्यातून विकिरण आरपार जाऊ शकतात. महिलांनाही विकिरणांचा धोका अधिक जाणवतो. हार्मोन्स असंतुलित होणे, स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग होणे हे विकार त्यांना होऊ शकतात. डॉ. नेहाकुमार या रेडिएशन मापन आणि त्याची उपकरणे तयार करणाऱ्या कंपनीच्या संचालक तर आहेतच, पण त्यांचा त्या विषयातील अभ्यासही विशेष आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोबाइल फोन आणि मोबाइल टॉवरमधून विद्युत चुंबकीय विकिरणे बाहेर पडतात. हे परिणाम उष्णतेच्या स्वरूपात दिसतात. फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर तो गरम झाल्याचे आपल्या लक्षात येते. काही वेळा उष्णता वाढत नाही, पण परिणाम होतोच, तो शरीरातील पेशी, गुणसूत्रे व डीएनएवर होतो. तो उष्णता वाढण्यापेक्षा अधिक गंभीर असतो. डोकेदुखी, शांत झोप न लागणे, एकाग्रतेचा अभाव, विसराळूपणा, कानाभोवती वाढणारा धनुर्वात व शेवटी त्यामुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. काही लोकांच्यात वंध्यत्व, गर्भपात, अल्झायमर, पाíकन्सन आणि हृदयरोगही होताना दिसतात. हे निष्कर्ष देशी व परदेशी संशोधनावरून काढले आहेत.
यापासून आपला बचाव करण्यासाठी मोबाइलवर कमीत कमी बोलून जास्तीत जास्त एसएमएस पाठवा. शक्य तेथे लँडलाइन वापरा. स्पीकर फोन किंवा कानात मायक्रोफोन घाला, त्यामुळे मोबाइल आपल्यापासून ३० सेंमी तरी दूर राहील. मोबाइल जेव्हा आपण वापरत नसू, तेव्हाही तो आपल्यापासून दूर ठेवा, कारण बंद फोनमधूनही विकिरणे बाहेर पडतात. तो खिशात किंवा उशीखाली ठेवू नका. ज्या मोबाइलची एसएआर (स्पेसिफिक अ‍ॅबसॉफ्र्शन रेट) किंमत कमी तो कमी धोकादायक असतो. मोबाइल टॉवरबाबत भारत सरकारने त्याचे धोके समजल्यावर २००९ साली काही कायदे केले.
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
book review the silk route spy book by author enakshi sengupta
बुकमार्क : गुप्तहेर की देशभक्त?
article about psychological effects of bossy behavior on colleagues
इतिश्री : भावनांची सर्वव्यापी जाणीव
kaho na pyaar hai hritik roshan movie sets guinness world record
हृतिक रोशनच्या पहिल्याच चित्रपटाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये का झाली होती? ‘हे’ आहे कारण…
Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
Russian story books
डॉक्युमेण्ट्रीवाले : धुक्यात हरवलेल्या वाचनाचा शोध…
book The only person you are destined to become is the person you decide to be
क्षमताविकासाचे सूत्र

सफर काल-पर्वाची : चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना
सन यत सेन आणि त्याच्या सहकाऱ्यांना चीनमधून १८९५ साली हद्दपार करण्यात आले. युरोपात राहून ‘तुंग मेंग हुई’ ही गुप्त संघटना त्याने चीनमध्ये तयार केली. १९११ साली क्रांती होऊन मांचू राजवट नष्ट झाल्यावर सन यात सेन परत चीनमध्ये आला. सन आल्यावर त्याने या गुप्त संघटनेची पुनर्घटना करून तिचे नियमित राजकीय पक्षात रूपांतर करून पक्षाचे नाव ‘क्योमिन्तांग’ ठेवले गेले. १९२१ साली कँटन येथे सन यात सेनच्या अध्यक्षतेखाली प्रतिसरकार स्थापन केले गेले. अशा प्रकारे १९१२ साली चीनचे प्रजासत्ताक सरकार तयार होऊन सन यात सेन त्याचा पहिला अध्यक्ष झाला. बरेच राष्ट्रवादी देशभक्त विद्यार्थी या पक्षात सामील झाले. १९२१ सालीच शांघाय शहरात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. अराजकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून चीनला बाहेर काढण्यासाठी रशियाप्रमाणे आपल्या इथेही आमूलाग्र क्रांती होण्याची आवश्यकता काही लोकांना भासू लागली.
अशा वेळी रशियाने पुढे येऊन सन यात सेनच्या पक्षास पाठिंबा देऊन रशियाच्या सल्ल्यानुसार चीनमध्ये क्रांतिकारक सेना तयार केली गेली. त्यासाठी व्हाम्पोआ येथे चांग कैशेकच्या अध्यक्षतेखाली एक लष्करी अकॅडमी स्थापन केली. या अकॅडमीत त्याग, शिस्त, निष्ठा या गुणांच्या वर्धनावर भर दिल्यामुळे राष्ट्रीय क्रांतीसाठी एक अत्यंत समर्थ सेना तयार झाली. क्योमितांग पक्षाचे राजकीय व लष्करी सामथ्र्य वाढत असतानाच त्या पक्षास योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. १९२४ साली सनने पक्षासाठी एक तत्त्वज्ञान तयार केले. हे तत्त्वज्ञान म्हणजे राष्ट्रवाद, लोकशाही व समाजवाद ही त्रिसूत्री होती. १९०५ सालापासून निरनिराळ्या वेळी सन यात सेनने यासंबंधी आपले विचार व्यक्त केले होतेच. १९२५ मध्ये लिव्हरचा कॅन्सर होऊन वयाच्या ६० व्या वर्षी सन यात सेन मृत्यू पावला.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. २८ नोव्हेंबर
१८२०कार्ल मार्क्‍सचे सहकारी फ्रेडरिक एंगल्स यांचा जन्म. जर्मनीत जन्मलेल्या एंगल्स यांनी शास्त्रीय समाजवादाची मांडणी केली.
१८६७ आसाममधील ख्यातनाम कवी चंद्रकुमार आगरवाला यांचा जन्म. ‘प्रतिमा’ व ‘बीण- बरागी’ या त्यांच्या महत्त्वाच्या रचना होत.
१८९० सामाजिक क्रांतीची भूमिका मांडणारे महात्मा जोतिराव फुले यांचे निधन. आपल्या कृतीने, लेखणीने आणि वाणीने महात्मा फुले यांनी जे कार्य केले ते मानवतेच्या इतिहासात अजरामर आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहून त्यांनी पर्यायी संस्कृतीच्या संघर्षांचा वारसा दिला. महात्मा फुले यांच्यावर अंतिम संस्कार करण्यापूर्वी डॉ. विश्राम घोले, भाऊ कोंडाजी पाटील, कृष्णराव भालेकर, पंडित धोंडीराम, यशवंत इत्यादींची भाषणे झाली. भाऊ कोंडाजी पाटील म्हणाले, ‘मित्रहो, आज हजारो वर्षे पीडित असलेल्या आपणा दीन, शूद्रादि,अतिशूद्र बंधूंस मानवी अधिकार मिळावा, यास्तव ज्या परम आणि थोर गृहस्थाने काया-वाचा-मने आदीकरून श्रम केले; ज्याने आपल्या लोकांसाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घातले, त्या गृहस्थाचा सृष्टी नियमाप्रमाणे आज अंत झाला खरा; परंतु त्यांची कीर्तिरूपी ध्वजा फारच फडकली आहे. फुले यांचे चरित्रकार उमेश बगाडे लिहितात- जोतिरावांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रात सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला. हा प्रवाह जाति-वर्गभेद, स्त्री-पुरुषभेद उल्लंघणाऱ्या आत्मप्रत्ययी मानवतेने ओथंबलेला होता.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in