१७६० पानिपतच्या लढाईअगोदर झालेल्या मोठय़ा चकमकीत बळवंतराव मेहंदळे मारले गेले. या दिवशी नजीबखानाने अब्दालीच्या हुकुमाविरुद्ध मराठय़ांवर अकस्मात हल्ला केला. मराठे तोफांची रचना करीत असतानाच नजीबखानाने सुरुवातीला मराठय़ांना खंदकापर्यंत मागे रेटले. मराठे प्रतिकार करू लागले. इब्राहीमखान व  मेहंदळे यांनी तीन हजारावर रोहिले मारले. शत्रूपक्षाकडून अकस्मात आलेल्या गोळीने बळवंतरावांचा वेध घेतला.
१७८२ म्हैसूरच्या हैदरअलींचा मृत्यू झाला. १७२२ मध्ये कर्नाटकात गरीब घराण्यात जन्मलेले हैदर अंगभूत हुशारीमुळे प्यादापासून सुरुवात करून फर्जी झाले. रियासतकार लिहितात. ‘राज्याच्या क्षितिजावर चमकणाऱ्या या बहाद्दराने अल्प  हैदरअली पराक्रमी होता, महत्त्वाकांक्षी होता, उत्तम सेनानायक होता, कर्तबगार होता, दूरदर्शी होता; परंतु .. कपटविद्या व कावेबाजपणा यांत तो तरबेज असून कृतघ्नपणातही निष्णात होता. .. १७६१ च्या पानिपतच्या युद्धांत मराठय़ांचा पराभव झाल्याने ते नि:सत्त्व व बलहीन झाले आहेत या संधीचा फायदा घेऊन हैदरने  म्हैसूरचा राजा चिक्क कृष्णराज व त्याचे प्रधान नंजराज व खंडेराव यांस कैद करून सर्व सत्ता हाती घेतली. शिरें, होसकोटें, बाळापूर प्रांत ताब्यात घेतले.
१९८८ सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. महासत्तेच्या विसर्जनाची गती अधिकच वाढली.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा