ऑपरेशन थिएटरमध्ये विविध व्याधींचे रुग्ण येत असल्याने थिएटरचे र्निजतुकीकरण वारंवार करावे लागते. र्निजतुकीकरणाच्या विविध पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे धुरीकरणाची. ही पद्धत जुनी असली तरी अजूनही अस्तित्वात आहे आणि तशी ती परिणामकारकही आहे. १००० घनफूट क्षेत्रफळासाठी ५०० मिलिलिटर ४०% फॉर्मल्डिहाइड एक लिटर पाण्यात मिसळावे. प्रथम थिएटरची दारे-खिडक्या बंद करावीत, पंखे-वातानुकूलन बंद करावे. मग हे मिश्रण हॉट फ्लेटवर उकळायला ठेवावे. त्याचे संपूर्ण बाष्पीभवन होईपर्यंत हॉट फ्लेट चालू ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडावर मास्क बांधून व बरोबर ३०० मिलिलिटर अमोनिया घेऊन आत शिरायचे व अमोनिया तसाच २ ते ३ तास ठेवायचा. त्यामुळे फॉर्मल्डिहाइड न्यूट्रलाइज्ड होईल. नंतर थिएटरचा वापर सुरू करायचा. आठवडय़ातून एकदा तरी असे धुरीकरण करायचे. दुसरी पद्धत आहे, बासिलोसीड पद्धत. बासिलोसीड हे एक स्पेशल जीवाणूनाशक, विषाणूनाशक, कवकनाशक आहे. याचा उपयोग फरशा, लाद्या यासाठी करतात. बासिलोसीडचे फायदे असे आहेत. १) ३० ते ६० मिनिटांत र्निजतुकीकरण होते. २) कार्बालिक अॅसिड किंवा डिर्टजटची आवश्यकता पडत नाही. ३) फॉर्मल्डिहाइडच्या धुरीकरणाची आवश्यकता पडत नाही. ४) २४ तास ऑपरेशन थिएटर बंद ठेवावे लागत नाही. तिसरी पद्धत आहे अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशनची. रोज १२ ते १६ तास हे रेडिएशन करावे लागते. ऑपरेशन अगोदर ते २ तास बंद करायचे असते. चौथी पद्धत आहे उच्च वारंवारतेच्या ध्वनी लहरींची. काही उपकरणे नीट उकळवता येत नाहीत. अशी उपकरणे या पद्धतीने जंतुविरहीत करता येतात. एक लाख हर्टझ वा त्यापेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीलहरी द्रावातून पाठवतात. त्या वेळी द्रावात बुडबुडे निर्माण होतात व ते फुटतात. त्यामुळे ऋण दाब निर्माण होऊन ही उपकरणे स्वच्छ होतात. लहान आणि सूक्ष्म उपकरणे, ज्यात बिजागरे किंवा दाते असतात अशा उपकरणांसाठी ही पद्धत उपयोगाची आहे. ह्य़ा निरनिराळया पद्धतीने र्निजतुकीकरण करून रुग्णांची सुरक्षितता जपली जाते.
ल्ल डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org
कुतूहल : ऑपरेशन थिएटरचे र्निजतुकीकरण
ऑपरेशन थिएटरमध्ये विविध व्याधींचे रुग्ण येत असल्याने थिएटरचे र्निजतुकीकरण वारंवार करावे लागते. र्निजतुकीकरणाच्या विविध पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे धुरीकरणाची. ही पद्धत जुनी असली तरी अजूनही अस्तित्वात आहे आणि तशी ती परिणामकारकही आहे. १००० घनफूट क्षेत्रफळासाठी ५०० मिलिलिटर ४०% फॉर्मल्डिहाइड एक लिटर पाण्यात मिसळावे. प्रथम थिएटरची दारे-खिडक्या बंद
आणखी वाचा
First published on: 07-12-2012 at 06:00 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet kutuhal