कुतूहल : कार्यालयाची रचना
कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी विविध प्रकारच्या रचना केलेल्या असतात. साहेब लोक केबिनमध्ये बसतात. त्यांच्या खोलीत मोठे टेबल असते, टेबलामागे फिरती खुर्ची असते, समोर भेटायला येणाऱ्यांसाठी ३-४ खुर्च्या असतात. पण जर ते कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचे असेल तर त्यांना भेटायला येणारी शिष्टमंडळे आकाराने मोठी असतात. त्यामुळे त्यांच्या टेबलासमोर चोवीसएक खुच्र्या ठेवलेल्या असतात. शिवाय टेबलावर दोन-तीन प्रकारचे टेलिफोन असतात, संगणक असतो, कदाचित फॅक्स यंत्रही असते आणि या सगळ्यांच्या वायरी इतस्तत: लोंबकळत असतात. यामुळे समजा उद्याला साहेबांना धावत पळत खोलीबाहेर पडायचे असेल तर कोण अडचणी येतात. या लोंबकळणाऱ्या वायरींना चुकवत चुकवत साहेबांना टेबलाबाहेर येऊन समोरच्या खुच्र्याना वळसा घालत घालत बाहेर पडावे लागते. शिवाय जर खोलीत जाजम असेल आणि ते कोठेतरी वळलेले असेल तर हमखास त्याला अडखळून पडायला होते. हल्ली बऱ्याच कार्यालयांत जपानी पद्धतीच्या क्युबिकल्स बांधलेल्या असतात. म्हणजे त्यात एकच माणूस जेमतेम बसू शकतो. त्यांच्यासमोर एकही खुर्ची नसते. त्याला भेटायला येणाऱ्यांनी अभ्यागत कक्षात बसायचे व कर्मचाऱ्याने तेथे जाऊन पाहुण्यांना भेटायचे, पण या छोटय़ाशा क्युबिकलमधून बाहेर अलगद पडणे फारच कौशल्याचे काम असते. न धडपडता त्यातून बाहेर येण्यासाठी सरावच करायला पाहिजे. अशी ही साहेब लोकांची बसायची केबिन आणि क्युबिकल्सची सोय झाल्यावर आम कर्मचारी लोक एका सभागृहात बसतात. तेथे १०-२० माणसे एकत्र बसतात. ही कार्यालये विभागवार असतात. अकौंट्सचे कार्यालय, पर्चेसचे कार्यालय, मार्केटिंगचे कार्यालय अशी ती विभागवार असते. त्यात दोन-तीन सुपरवायजर बसतात व त्या प्रत्येकाच्या हाताखालचे कर्मचारी एकेका ओळीत स्वतंत्रपणे बसलेले असतात. परत या प्रत्येकाच्या टेबलावर हल्ली एकेक संगणक असतो, शिवाय काहीजणांना टेलिफोन दिलेला असतो. त्यामुळे अशा रचनेतून आपत्काली बाहेर सुखरूपपणे पडणे हे कौशल्याचे काम असते आणि परत त्यासाठी सराव करणे गरजेचे असते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा