महाराष्ट्रातील ८२% जमीन कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
वार्षकि सरासरी पाऊस हा त्या त्या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या खरीप पिकास पुरेसा असतो. परंतु पाऊस अनियमितपणे पडत असल्याकारणाने पिकास पाण्याची गरज असेल त्यावेळी तो पडेलच असे नाही. यामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होतो.
शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाण्याची गरज आहे. जर आपण पहिल्या पावसाचे पाणी खाचरामधील किंवा शेतजमिनीच्या दहाव्या भागात खड्डा करून साठवून ठेवले तर ते पाणी उरलेल्या ९०% पिकास देण्यासाठी वापरता येईल. याप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता असेल. म्हणजे ज्यावेळेस पिकाला पाणी देण्याची गरज असेल त्या वेळेस शेतातच पाणी साठविलेले असेल. मग शेतकरी यावर शाश्वत पीक घेऊ शकेल.
अशा प्रकारची पाण्याची साठवण ईशान्य भारतात करतात. त्यास ऑन फार्म रिझव्र्हायर असे म्हणतात.
रब्बी पिकास पाणी कमी लागते. हे पीक जमिनीतील पावसाच्या पाण्याचा ओलावा, हिवाळ्यात पडणारे दवाचे पाणी यावर अवलंबून असते. जर शेवटचा पाऊस हा शेतातच साठवलेला असेल तर ते साठवलेले पाणी रब्बी पीकास उपयुक्त ठरेल.
जमिनीच्या दहाव्या भागात किती पाणी साठवायचे ते त्या त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर व पिकावर अवलंबून राहील.
ज्या जमिनीमधून पाणी जिरून जात असेल त्या ठिकाणी प्लास्टिक अंथरल्यास दहाव्या भागात पाणी साठवले जाईल.
शेतजमिनीचा उतार व शेतातील ओघळी यांचा विचार करता समतल बांधाला समांतर किंवा उताराला आडवी पेरणी व मशागत केल्यास पाण्याचा अपधाव कमी होतो व मातीची धूप कमी होते. या प्रकारे पावसाच्या पाण्याची कार्यक्षमता वाढते व पिकाच्या वाढीस मदत होते.
चेक डॅम किंवा मातीचा बांध घालून वाया जाणारे पाणी अडवून त्यामधून समतल चराने किंवा समतल पाइपने शेतीला पाणी दिल्यास पिकाच्या वाढीस मदत होते.
तसेच प्रवाही सिंचनाने किंवा पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून तुषार सिंचनाने पिकांना पाणी दिल्यास पाण्याची कार्यक्षमता वाढते व नेहमीपेक्षा पाणी कमी लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा