जगात वनस्पतिभक्षक कीटकांच्या सुमारे एक लक्ष जाती आहेत, पण पिकाच्या एका जातीवर आपल्याला फक्त चार ते पाच जातींचेच किडे आढळतात. शिवाय प्रत्येक पिकावर आढळणारे किडे पिकाच्या जातीनुसार भिन्न असतात. म्हणजेच कपाशीवरचे किडे सोयाबीनवर किंवा टमाटोवरील किडे सूर्यफुलावर आढळत नाहीत. या निरीक्षणाला तर्कशास्त्राची जोड दिली तर त्यातून आपण तीन निष्कर्ष काढू शकतो. एक निष्कर्ष असा, की प्रत्येक वनस्पतीमध्ये वनस्पतिभक्षक कीटकांपासून आपले रक्षण करणारी रसायने निसर्गतच निर्माण केली जातात. दुसरा निष्कर्ष असा की कीटकांच्या काही जातींमध्ये ती रसायने पचविण्याची क्षमता उत्क्रांतीच्या रेटय़ामुळे निर्माण झाली आहे, आणि तिसरा निष्कर्ष असा, की पिकाच्या प्रत्येक जातीतली नसíगक कीटकनाशके जातिपरत्वे भिन्न असतात. या निष्कर्षांचा उपयोग करून आपण आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी वनस्पतिजन्य नसíगक कीटकनाशके निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ मोहरीच्या बियांचे पीठ पाण्यात कालवून ते पिकांवर फवारल्यास ते मोहरी आणि मोहरीवर्गीय इतर काही पिके (उदा. मुळा, कोबी इ.) सोडून इतर पिकांचे कीटकांपासून रक्षण करू शकते. तंबाखूची पाने, पायरेथ्रमची फुले, निंबोळीच्या बिया, वेखंड इत्यादींचे अर्क फार पूर्वीपासून कीटकनाशके म्हणून वापरले जात होतेच, पण मानवी अन्न म्हणून आपण वापरत असलेल्या मोहरी, मिरची, लसूण, मिरी यांसारख्या पदार्थाचे अर्क कीटकनाशके म्हणून वापरल्यास आज आपण वापरत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांपासून मानवी स्वास्थ्याला जो धोका निर्माण होतो तो निश्चितच टळेल. या नैसर्गिक अर्काचा एक वाईट गुणधर्म असा आहे, की त्यांचे बाह्य वातावरणात त्वरित विघटन होते, आणि त्यामुळे ते थोडय़ाथोडय़ा कालांतराने पुनपुन्हा फवारावे लागतात. पण रसायनशास्त्राज्ञांनी या विषयावर थोडे संशोधन केले तर या नैसर्गिक पदार्थापासून मानवाला अपायकारक नाहीत पण बाह्य वातावरणात अधिक काळ टिकून राहतील अशी कीटकनाशके बनविणे अवघड नाही. उदा. पायरेथ्रीन या वनस्पतिजन्य कीटकनाशकाचे मूळ स्वरूप रासायनिक प्रक्रियेद्वारे बदलून त्यापासून निर्मिलेली अनेक कीटकनाशके सध्या सिंथेटिक पायरेथ्रॉइड या नावाखाली बाजारात उपलब्ध आहेत.
– डॉ. आनंद कर्वे (पुणे)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई २२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस                                               
आव-आमांश-जुलाब भाग -१
जगभर विविध देशांत मानवाच्या आरोग्य-अनारोग्य समस्यांकरिता विविध वैद्यक प्रणाली, गेली काहीशे वर्षे आपापल्या परीने काम करीत आहेत. जगभर या विविध पॅथींना दन रोगांच्या ‘आव व मधुमेह’- समस्यांचा ‘हल’ करण्याकरिता खूप खटाटोप, संशोधन, नवनवीन औषधे असे सातत्याने प्रयत्न करावे लागत आहेत. चारही वेद हे भारतीय संस्कृतीचे प्राचीनत्वाचे चार स्तंभ मानले जातात. त्यातील ‘अथर्ववेद’ या ग्रंथात किमान तीन हजार वर्षांपूर्वी आमांश, आव, चिकट मलप्रवृत्ती याकरिता ‘कुडा’ या वनस्पतीचा विशेषत्वाने विचार केला गेला. आमांश किंवा आव हा रोग तेव्हापासून आजपर्यंत कोणालाही सर्वार्थाने हद्दपार करता आलेला नाही, पण अथर्ववेदात सांगितलेले कुडा हे औषध मात्र जगभर वेगवेगळय़ा स्वरूपात, त्यातील कुर्चिन या द्रव्यामुळे वापरले जाते. सर्वसामान्य माणसाला आव, आमांश हा विकार एकदा जडला की तो कायमस्वरूपाचा बरा होतोच अशी खात्री नाही.
आव म्हणजे चिकट मलप्रवृत्ती. या विकाराने पिडलेले रोगी शहरी जीवनात मोठय़ा संख्येने आढळतात, तसेच ग्रामीण भागातही यांची संख्या नगण्य नाही. हा रोग कधीच पूर्णपणे बरा होत नाही अशी बहुतांशी डॉक्टर, वैद्य, रुग्णांची खात्री झालेली असते. आयुर्वेदीय उपचार जर प्रामाणिकपणे केले गेले व रुग्णाने पथ्यपाणी पाळले तर या रोगावर निश्चितपणे मात करता येते असे मला प्रामाणिकपणे वाटते. आयुर्वेदीय चिकित्सा ही रुग्णाच्या पोटातील पाचक अग्नीच्या बलाला धरून केलेली असते. रुग्णाची कडक पथ्य पाळण्याची तयारी व वैद्यांची कडक पथ्य व नेमके औषध देण्याची तयारी मात्र हवी. यश तुमच्यासमोर हात जोडून उभे असते.
आधुनिक वैद्यकीय तत्त्वज्ञानाप्रमाणे या रोगाचे मूळ अमिबा-अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म कृमी, अन्न किंवा पाण्याच्या मार्गाने पोटात जातात हे असते. आयुर्वेदीय तत्त्वज्ञानाप्रमाणे मलप्रवृत्तीचा चिकटपणा, खराब पाणी व खाण्यापिण्यातील चुकीचे पदार्थ ही ढोबळ कारणे असतात.  
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
flamingos and over 50 migratory Birds arrive at Suryachiwadi Lake
साताऱ्यातील जलाशयात ‘परदेशी पाहुणे’ दाखल; रोहित, पट्टेरी राजहंससह ५० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
butterfly
बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू
Air in Borivali , Byculla Air , Navinagar , Shivajinagar,
बोरिवली आणि भायखळ्यातील हवा सुधारली, निर्बंध उठवण्याची शक्यता, नेव्हीनगर आणि शिवाजीनगरवर लक्ष
centre prohibits veterinary use of nimesulide drug for vulture conservation
प्राण्यांसाठी निमसुलाइड औषध वापरण्यावर देशात बंदी; केंद्र सरकारचा गिधाडांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
iit bombay researchers discover bacteria that prevent growth of pollutants in agricultural soil
शेत जमिनीतील वाढते प्रदूषक रोखणाऱ्या जीवाणूंचा शोध; आयआयटी मुंबईतील संशोधकांमुळे जमीन होणार सुपीक
Vidarbha cotton tur soybean farmers
लोकजागर : कापूस, तूर आणि सोयाबीन…!

जे देखे रवी..      
९. साताऱ्यातला सरदार
१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी शाळेत गोड गोळ्या वाटल्या होत्या त्याची आठवण आहे. त्या १५ ऑगस्टला माझ्या वडिलांनी रुग्णालयाच्या आवारात तिरंगा फडकावला, पण त्या आधी काही आठवडे मित्रांच्या मदतीने रुग्णालयाच्याच आवारात एका बाजूला तिरंगा बांधून तो जमिनीत रोवून उभा करताना आम्ही मुले पकडलो गेलो होतो तेव्हा बऱ्यापैकी चोप मिळाल्याचे आठवते. स्वातंत्र्यानंतरच्या महिन्याभरातच वडिलांची बदली साताऱ्यातल्या जिल्हास्तरीय मोठय़ा रुग्णालयात झाली. मालेगावच्या मानाने त्या काळातही मी एवढा लहान असून सातारा कमी बकाल, ही जाणीव स्पष्ट आठवते. बंगला प्रचंड होता. मागेच मक्याचे शेत होते. त्याच मक्याची भाकरी आई करीत असे. साताऱ्यात मी पहिल्यांदा क्लब नावाची गोष्ट पाहिली. टेनिस, बॅडमिंटन, बिलियर्ड्स या खेळाची ओळख इथलीच. क्लबमध्ये दारूचा बार होता. क्लबचे सदस्य जिल्हास्तरीय अधिकारी, आजूबाजूचे राजे-रजवाडे, सरदार आणि तुरळक फिरतीवर असलेले इंग्रज अधिकारी वगैरे. एकदा इतर लोकांच्या भरीला दाद देत माझ्या वडिलांनी एक पेग मारला व ते आईने बघितले आणि ती बिथरली आणि रुसली. आई-वडिलांना असे वाटते की, लहान मुले बिनडोक असतात, पण ते काही खरे नसते. त्यांना सगळे समजते. पुढे या फंदात माझे वडील अनेक वर्षे पडले नाहीत. एकदा एक मोठी अवाढव्य गाडी क्लबात शिरली. त्याचे दार उघडण्यात आले आणि बघता बघता दारूच्या बाटल्या आत ठेवण्यात येऊ लागल्या. गाडीचा मालक एक रुबाबदार माणूस होता आणि त्याची बायको शेजारी उभी राहून रडत रडत ‘नको नको’ म्हणत गयावया करीत होती. पुढे कळले की, हा कोठल्या तरी संस्थानाचा सरदार होता. इतिहासाचा विचका करीत इंग्रजांनी आपल्याला बिनधास्त राज्य करता यावे म्हणून सगळ्या तत्कालीन शूरवीर, राजे-राजवाडय़ांना दारूची सवय लावली आणि त्यांची वाट लावली, अशी कथा रचण्यात आली; पण हे अगदीच विपर्यस्त होते. २०० हाकारे लावून जंगलात कोठेतरी जनावरांची स्वत:ला सुरक्षित ठेवीत शिकार करण्यापलीकडे आणि परत राजवाडय़ात गेल्यावर मौजमजा करण्यापलीकडे यांची मजल कधी जातच नसे आणि हे जवळजवळ सर्व भारतात चालू होते. आपला देश किडला होता आणि आपणच इंग्रजांसाठी जाजमे अंथरली, हेच सत्य आहे. इंग्रजांनी आपल्याला लुटले, हे खरेच; पण त्यांच्यामुळेच आपली आधुनिकतेशी ओळख झाली, हेही तेवढेच खरे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. भारतात जुलूम सर्वात कमी झाला. इतर देशांत इंग्रजांनी अमानुष कत्तली केल्याचे दाखले आहेत. आपल्या इथे एक-दोनच झाल्या. एक पुरातन मृत संस्कृती आणि एक नव्याने होऊ घातलेली संस्कृती यांची इथे भेट झाली, असे एका इंग्रजाने म्हटल्याचे आठवते.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
१० जानेवारी
१८९६ >  लेखणी आणि वाणीवर प्रभुत्त्व असलेले स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसचे अभ्यासू नेते नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म. त्यांचे साहित्य ‘समग्र काका’ या नावाने २२ खंडांत प्रसिद्ध झाले आहे. अर्थशास्त्रज्ञ म्हणून विशेष लौकिक असलेल्या काकासाहेबांचे हिंदीवरही प्रभुत्व होते. ‘महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभे’ची स्थापना करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सातारा येथे १९६२ साली भरलेल्या ४४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद काकासाहेबांनी भूषविले होते.
१९०१ >  ख्यातनाम इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांचा जन्म. त्यांनी २० हजार पोथ्या तसेच नाणी, चित्रे, ताम्रपट आदी गोळा करून त्यांचा अभ्यास केला व ४०० हून अधिक लेख व ५० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘मूर्तिविज्ञान’, ‘महाराष्ट्राची चार दैवते’ व ‘मराठय़ांचा इतिहास’ (खंड १ -३) आजही उपलब्ध आहेत.
१९६० >  खगोलतज्ज्ञ, ज्योर्तिगणितज्ञ व हवामान शास्त्रविषयक लेखक त्र्यंबक गोविंद ढवळे यांचे निधन. ‘विश्वाची रचना आणि उत्क्रांती’, ‘नक्षत्रदर्शन’, ‘सूर्यकुलाच्या परिसरात’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
– संजय वझरेकर

Story img Loader