मासे पकडण्यासाठी विविध जाळ्यांचा वापर करतात.
१. ट्रॉलजाळे : हे जाळे खास समुद्रातील तळालगतचे मासे पकडण्यासाठी बनवलेले आहे. कवचधारी मासेसुद्धा या जाळ्यात पकडता येतात. ट्रॉल जाळ्याचा आकार नरसाळ्यासारखा असतो. याच्या शेवटच्या भागाला इंग्रजीत कॉडएन्ड म्हणतात. या कॉडमधून जाळ्यात पकडलेले मासे गोळा करतात. मधल्या थरातील किंवा पृष्ठभागावरील मासेही या जाळ्याद्वारे पकडता येतात. ट्रॉलजाळे एक किंवा दोन बोटींच्या सहाय्याने वापरता येते.
२. पर्सनि जाळे : पर्सनि अतिशय विकसित जाळे असून त्याचा वापर थव्यामध्ये राहाणाऱ्या पृष्ठभागावरील मासे पकडण्यासाठी करतात. या जाळ्याच्या मासेमारी करण्याच्या पद्धतीने जगातील बरीचशी मासेमारी केली जाते. पारंपरिक पद्धतीने म्हणजे माशांचे रंग, पोत, उडय़ा मारण्याची पद्धत इत्यादींवरुन पृष्ठभागावरचे माशांचे थवे शोधले जातात. सोनार, इकोसाउंडर, टेलेसाउंडर इत्यादी उपकरणांचा वापर मासे पकडण्यासाठी करतात. मुख्य बोटीवरून एक छोटी बोट पाण्यात सोडतात. ती बोट माशांच्या थव्याला पर्ससारखा आकार तयार होईल असा वेढा देते व जाळ्याचा खालचा दोर ओढून जाळे खालच्या बाजूने बंद करतात. पर्ससारख्या आकारात पृष्ठभागावरील मासे अडकतात. त्यांना मुख्य बोटीवर ओढून घेतात.
३. गिलनेट : गिलनेट हे एक स्थिर स्वरूपाचे जाळे आहे. ते पाण्यात बुडत्या (सिंकर) आणि तरंगत्या (फ्लोट) यांच्या सहाय्याने स्थिर करतात. ते पाण्यात उभ्या भिंतीसारखे बसवतात. या जाळ्याद्वारे मासेमारीसाठी लागणारा खर्च कमी असल्यामुळे छोटय़ा मच्छिमारांमध्ये गिलनेट प्रसिद्ध आहे. हे जाळे पाण्याच्या पृष्ठभागावरील, मध्यभागावरील व तळाजवळील मासे पकडण्यासाठीही वापरतात.
मासेमारीसाठी ही तीनही जाळी मत्स्यव्यवसायात जास्तीतजास्त वापरतात. पावसाळ्यात १० जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत बहुतांश माशांच्या नसíगक प्रजननाची वेळ असते. म्हणून या कालावधीत मासेमारी पूर्णपणे बंद ठेवतात, जेणेकरून भविष्यात माशांचा तुटवडा भासणार नाही.
 विविध संशोधनांद्वारे जाळ्यांची क्षमता, बोटींची क्षमता वाढवून मासेमारी पद्धती अधिकाधिक विकसित होत आहे.

जे देखे रवी.. – चांगुलपणा
देव ही गोष्ट कितीही रहस्यमय असली तरी त्याहून जगात तितकीच रहस्यमय गोष्ट अशी की, माणूस चांगला वागतो. चांगुलपणा राबवण्याचे कारण तरी काय? स्वत:चे बघावे हेच खरे.
त्याविषयी कांट नावाचा तत्त्वज्ञानी म्हणाला होता, आपले चांगले वागणे हा बुद्धीचा प्रांत नव्हे. आपण जर सतत स्वार्थी वागलो तर आणि आपल्यासारखेच जर इतरही तसेच वागू लागले, तर समाज विस्कळीत होईल या उत्स्फूर्त भावनेने मन कचरते आणि शक्यतोवर चांगले वागणे घडते. तो आणखी एक मोठे पाऊल टाकतो आणि म्हणतो, मी चांगला वागलो तर मला स्वर्ग मिळेल असा विचार करणे फोल आहे. अनेक मानवी कल्पनांसारखी स्वर्ग ही एक फक्त कल्पनाच असते असे जाणणे आणि चांगुलपणाचा आपल्यापुरता स्वर्ग इथे निर्माण करणे हेच आपले ईप्सित असले पाहिजे.
 त्याच्या आधीचा स्पिनोझा नावाचा तत्त्वज्ञानी म्हणाला होता- हे विश्व हा एकच पदार्थ आहे. त्याचे तुकडे पाडणे म्हणजे स्वार्थीपणे जगणे आणि हे असे जगणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. स्पिनोझा  होता ज्यू आणि त्याला त्याच्या धर्मबांधवांनी आणि गुरूंनी बहिष्कृत केला होता. कांटचे तेच थोडय़ाफार फरकाने होते. हा कधी कोठल्या प्रार्थना सभेला गेल्याचे किंवा मनोभावे भक्ती केल्याचे दाखले नाहीत.
रसेल नावाच्या संपूर्णपणे निरीश्वरवादी आणि गणिती तत्त्ववेत्त्याने, तर्काने सगळे प्रश्न सुटतात असे माझे म्हणणे नाही, परंतु तर्काच्या पलीकडे काही तरी अद्भुत आहे आणि ते अद्भुत आपले प्रश्न सोडवू शकेल हे मला पटत नाही असे विधान केले खरे आणि शिवाय अशीही कबुली दिली की, सद्गुणांना तर्काच्या निकषांवरून तपासणे अशक्यप्राय आहे. झेनो नावाचा ग्रीक तत्त्वज्ञानी म्हणत असे, जो आपली शारीरिक, मानसिक भूक जाणतो आणि त्या भुका भागवताना निसर्गाचा समतोल न बिघडवता सुखदु:ख, द्वेषाच्या पलीकडे जाऊन स्वानंदी जीवन जगतो तो नीतिमान असतो.
झेनोचे तत्त्वज्ञान Stoicism या नावाने ओळखले जाते आणि या तत्त्वज्ञानावर भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे असे समजले जाते. र३्रू आणि स्थितप्रज्ञ हे शब्द कानाला सारखेच भासतात. एवढेच नव्हे तर ज्याची प्रज्ञा स्थित/स्थिर (Steady) आहे असा जो अर्थ त्या शब्दातून निघतो त्याबद्दल आणि एकूणच ज्ञानेश्वर याबाबतीत काय म्हणतात याबद्दल पुढच्या लेखांमध्ये.
 परंतु तत्पूर्वी याआधीच्या भयानक अवघड प्रश्नांची उत्तरे तर मी दिली नाहीतच, पण तुम्हालाही आणखी गोंधळात पाडले याची कबुली देतो. अर्थात गोंधळ इतरांशी वाटून घेतल्याने तो कमी होतो अशातला भाग नाही..
 हा तत्त्वज्ञानाचा गोंधळ इतर गोंधळापेक्षा जरा सरस असतो एवढेच.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

वॉर अँड पीस – मुखदरुगधी : टाळता येण्यासारखा विकार
मुखदरुगधी हा स्वतंत्र विकार नसून वेगवेगळ्या विकारातील एक लक्षण असते. तोंडाला वास येत आहे असे लक्षात आल्याबरोबर रुग्णाने आपल्या दातांचे आरोग्य, अजीर्ण, अपचन, मलावरोध, कृमी, जंत अशा विकारांचा मागोवा घ्यावयास हवा.
तोंडाला वास येणे हे लक्षण दात खराब असल्यामुळे जर होत असेल तर दात, हिरडय़ा यांची तपासणी योग्य पद्धतीने करून घेणे रुग्णहिताचे आहे. दात, दाढातील फटी पडणे, अन्नाचे कण तिथे राहणे, रात्रौ झोपण्यापूर्वी व जेवणानंतर चुळा खळखळून न भरणे अशी कारणे संभवतात. दातांचे बिघडलेले आरोग्य हेच लक्षण नक्की असल्यास, स्वस्तिक दंतमंजन, मयूर दंतमंजन अशा गेरू, कापूर मिश्रणापासून बनवलेल्या मंजनाचा सकाळी, रात्रौ कटाक्षाने वापर करावा. इरिमेदादि तेलाचे थेंब हिरडय़ांना, दातांना दिवसातून दोन-तीन वेळा लावावे, लाळ गाळावी. रात्रौ न चुकता त्रिफळाचूर्ण घ्यावे. साखर, गूळ असणारे गोड पदार्थ, मिठाई कटाक्षाने टाळावी. प्रत्येक खाण्यापिण्यानंतर खळखळून चुळा भराव्या हे सांगावयास नकोच.
ज्यांच्या दात व हिरडय़ांत काही दोष नाही अशांच्या मुखदरुगधी तक्रारीकरिता, रिकाम्या पोटी पोट तपासून पोटात आवेचे प्रमाण, चिकट मलप्रवृत्ती आहे का, हे बघणे आवश्यक असते. आपण जे खातो-पितो त्याचे व्यवस्थित पचन झाले नाही तर ते अन्न लहान-मोठय़ा आतडय़ात दीर्घकाळ पडून राहून मलप्रवृत्ती  बिघडते. मळाला दरुगधी येते, संडास चिकट होते, पोट साफ होत नाही. काहींच्या मळात मोठे जंत, सुतासारखे बारीक कृमी मिळतात. अ‍ॅमिबायसिस, वारंवार पोट बिघडणे अशी लक्षणे असल्यास कुटजवटी, शमनवटी, आम्लपित्तवटी, कुटजारिष्ट अशी औषधे घ्यावी, तीव्र मलावरोध, कृमीजंत असल्यास आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ आम्लपित्तवटी सकाळ- सायंकाळ, रात्रौ कपिलादिवटी, गंधर्वहरीतकी व जेवणानंतर अभयारिष्ट घ्यावे. कटाक्षाने मेवामिठाई, बेकरी पदार्थ, मांसाहार टाळावा. सुंठमिश्रित गरम पाणी प्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १८ सप्टेंबर
१९१९> राम गणेश गडकरी यांच्या ‘संगीत भावबंधन’चा पहिला प्रयोग ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ या मा. दीनानाथ यांच्या संस्थेने सादर केला. गडकरी यांच्या हयातीत त्यांनी लिहून पूर्ण केलेले हे अखेरचे नाटक . ‘भावबंधन’ लिहिल्यानंतर दीड दिवसांतच गडकरींना मृत्यूने गाठले.  
१९४७ > कवी सुधाकर श्रावणजी गायधनी यांचा जन्म. ‘देवदूत’ हे दीर्घकाव्य आणि ‘कबरीतला समाधिस्थ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित.
१९७४ > कवी, लेखक श्रीकृष्ण शांताराम पोवळे यांचे निधन. ‘नाही, तुला क्षमा नाही’, ‘अंगार’ आणि ‘पंख आहेत पण आकाश नाही’ या कादंबऱ्या,  तीन काव्यसंग्रह, बालसाहित्याची काही पुस्तके त्यांनी लिहिली. ‘विजय’ हे मासिक व ‘अलका’ दिवाळी अंक त्यांनी काढला.
२००४ >  नवकथोत्तर मराठी कथेचा शोध घेण्यासाठी दलित साहित्य आणि स्त्रीसाहित्य यांकडे पाहिले पाहिजे, असा संदेश लिखाणातून देणारे समीक्षक भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन. ‘सहा कथाकार’, ‘दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह’, ‘मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन’, ‘समुद्रकाठची रात्र’ ही पुस्तके फडके यांच्या नावावर आहेत.
– संजय वझरेकर