नायट्रोजन डाय ऑक्साइड लालसर तपकिरी रंगाचा, पाण्यात काही प्रमाणात विरघळणारा वायू आहे. तापमान जास्त असताना झालेले वादळ आणि मातीतील सूक्ष्म जिवाणू तसेच जीवाश्म इंधन वापरणारी औष्णिक विद्युत केंद्रे आणि वाहनांमधून या वायूचे हवेत उत्सर्जन होते. या वायूमुळे डोकेदुखी, श्वासनलिकेचा व फुप्फुसाचा दाह इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात. हा वायू आम्लवर्षां, जमिनीलगतचा ओझोन, प्रकाशरासायनिक धुरके (फोटोकेमिकल स्मॉग) अशा पर्यावरणास हानीकारक गोष्टींच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो.
हवेतील या वायूचे मोजमापन करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे –
१. सुधारित जेकब आणि होशर पद्धती : एक लिटर/मिनिट या वेगाने हाय व्हॉल्युम सॅम्पलरला जोडलेल्या इिम्पजरमधल्या ऊध्र्वपतित पाण्यात बनवलेल्या सोडियम हायड्रॉक्साइड- सोडियम आस्रेनाइटच्या (३० मिलिलिटर) द्रावणात हा वायू शोषून घेतला जातो. यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड, सल्फानिलामाइड आणि एन- (१-नॅप्थाइल) इथिलीनडायअमाइन डायहायड्रोक्लोराइड घालून गुलाबी रंगाचे अॅझो रंजक संयुग तयार करण्यात येते. या संयुगाच्या रंगाची शोषकता ५४० नॅनोमीटर तरंगलांबीवर पंक्तिअनुदीप्तिमापीच्या साहाय्याने मोजण्यात येते. अंशशोधन वक्राच्या साहाय्याने नमुन्याच्या शोषकतेवरून त्यातील नायट्रोजन डाय ऑक्साइडचे प्रमाण मोजता येते. या प्रमाणाला हवेच्या आकारमानाने भागून हवेतील नायट्रोजन डाय ऑक्साइडचे प्रमाण मायक्रोग्रॅम/मी ३ मध्ये नोंदविण्यात येते.
२. रासायनिक दीप्ती पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणात अमोनिया परिवर्तक आणि नायट्रिक ऑक्साइड-नायट्रोजन डायऑक्साइड- नायट्रोजन ऑक्साइड मोजमापक वापरले जाते. हवेतील अमोनिया नायट्रिक ऑक्साइडमध्ये परावíतत केला जातो.
नालकुंतल झडपेद्वारे हवा सरळ अभिक्रिया कक्षात अथवा आधी मॉलिब्डेनम परिवर्तक आणि त्यानंतर मोजमापकात जाते. अभिक्रिया कक्षात नायट्रिक ऑक्साइड व ओझोन यांच्यातील रासायनिक दीप्ती अभिक्रिया होते. यातून उत्तेजित अवस्थेतील नायट्रोजन डायऑक्साइड तयार होतो. मूळ ऊर्जा पातळी अवस्थेत परत येताना उत्सर्जति केलेली ऊर्जा नायट्रिक ऑक्साइडच्या संहतीच्या प्रमाणात असते व प्रकाशविद्युत गुणक नलिकेच्या साहाय्याने मोजली जाते. नायट्रोजन डाय ऑक्साइडचे हवेतील प्रमाण नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणातून नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वजा करून मिळवण्यात येते.
राष्ट्रीय परिसर वायू गुणवत्ता मानकांनुसार औद्योगिक, रहिवासी, ग्रामीण आणि इतर क्षेत्रांत तसेच संवेदनशील पारिस्थितिक क्षेत्रात २४ तासांसाठीचे या वायूचे मानक ८० मायक्रोग्रॅम/मी ३ तर वार्षकि मानक अनुक्रमे ४० व ३० मायक्रोग्रॅम/मी३ आहे.
– मिहिर हेर्लेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वि. स. खांडेकर- साहित्य
१९३५ मध्ये खांडेकरांच्या साहित्यिक जीवनात अनपेक्षित परिवर्तन घडले. विनायक कर्नाटकी आणि बाबुराव पेंटर यांनी सुरू केलेल्या ‘हंस पिक्चर्स’ या संस्थेसाठी चित्रपटकथा लिहून द्यायला खांडेकरांनी सुरुवात केली. शिरोडे येथील अध्यापन व्यवसाय सोडून खांडेकर लेखनासाठी कोल्हापूरला आले आणि स्थायिक झाले. मास्टर विनायकांच्या ‘छाया’चे कथा, संवाद खांडेकरांनी लिहिले. १९३६ मध्ये मुंबईत ‘छाया’ चित्रपट प्रदर्शित झाला. विलक्षण लोकप्रियता त्यांना मिळाली. लेखक-पटकथा लेखक म्हणून खांडेकरांचे चित्रपटसृष्टीत एका नव्या क्षेत्रात नाव झालं. त्यानंतर ‘ज्वाला’, ‘देवता’, ‘अमृत’, ‘माझं बाळ’- ‘सरकारी पाहुणे’ अशा अनेक चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या. ‘छाया’च्या पटकथालेखनासाठी त्यांना गोहर सुवर्णपदकही मिळाली.
१५ कादंबऱ्या, ३० कथासंग्रह, ६ रूपक कथासंग्रह, १४ समीक्षा ग्रंथ, ११ लघुनिबंधसंग्रह, कुमार कथा, संपादनकार्य, विनोदी लेख, नाटक, नाटय़छटा, कविता, लघुकथा, चित्रपटकथा तसंच ‘एका पानाची कहाणी’ हे आत्मचरित्र असं विपुल लेखन खांडेकरांनी केलं आहे.
१९३० मध्ये प्रकाशित झालेली खांडेकरांची पहिली कादंबरी ‘हृदयाची हाक’ आणि ‘कांचनमृग’ (१९३१) या कादंबऱ्यांनी त्यांना अपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. ‘जीवनासाठी कला’ या सिद्धांतावर ते विश्वास ठेवणारे होते. त्यांच्या प्रतिभेला मानवाच्या मनाचे पूर्णपणे आकलन झालेले होते. मानवी जीवनाचा विकास हा भोगवाद्यांच्या विजयात नसून हेतूवाद्यांच्या पराजयात आहे. त्याचे प्रतिबिंब साहित्यात पडायलाच हवे, अशी खांडेकरांची लेखक म्हणून भूमिका होती. एक साहित्यिक म्हणून त्यांचे हे तत्त्वज्ञान त्यांच्या कथा, कादंबऱ्यांमधून कलापूर्ण दृष्टीने आविष्कृत होताना दिसते.
१९३० मधील ‘हृदयाची हाक’ या पहिल्या कादंबरी लेखनानंतर त्यांच्या ‘कांचनमृग’, ‘उल्का’, ‘दोन ध्रुव’, ‘पांढरे ढग’, ‘तिसरी भूक’, ‘अमृतवेल’, ‘हिरवा चाफा’, ‘क्रौंचवध’ व ‘ययाति’ असा कादंबरी लेखनाचा प्रवास झपाटय़ाने सुरूच राहिला. कादंबरी लेखन हेच त्यांनी प्रमुख मानले.
खांडेकरांच्या काव्यात्मवृत्तीची साक्ष ‘उल्का’ कादंबरीत मिळते. यातील तीन पात्रांच्या सात कविता त्यांच्या कविमनाची आर्तता दर्शवितात.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com