गुजरातमधील भावनगर येथील ‘सेन्ट्रल सॉल्ट मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट’ (सीएसएमसीआरआय) ही संस्था सीएसआयआरच्या आधिपत्याखाली येते. भारताच्या मुख्यभूमीवरची समुद्रस्पर्शी नऊ राज्ये, केंद्रशासित प्रदेश, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटांची एकत्रित किनारपट्टी साडेसात हजार किलोमीटर आहे. 

आपल्याला समुद्रातून क्षारांसह अनेक रसायने मिळतात. राजस्थानमधील कच्छचे रण ही २६ हजार चौरस किलोमीटर विस्ताराची विशाल हंगामी पाणथळ जागा आहे. हे क्षेत्र दरवर्षी टनावारी क्षार देते. हिमाचलमधील मंडीसारख्या, भूवेष्टित भागातही सैंधव मिठासारखे क्षार आढळतात. क्षार स्वयंपाकात, अन्न टिकवण्यात, वनस्पतीवाढीसाठी, आद्र्रता घटविण्यासाठी, रासायनिक प्रक्रियांत, उद्योगांत कच्चा माल म्हणून वापरले जातात. एकेकाळी भारतात मोठय़ा प्रमाणात क्षार-खनिजे आयात होत. १९४० मध्ये डॉ. भटनागर यांच्या समितीने संस्था स्थापन करून क्षार-खनिजांचा अभ्यास करण्याचा व आयात घटविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फाळणी झाली. क्षार-खनिजांनी समृद्ध असलेले सिंध-बलुचिस्तान प्रांत पाकिस्तानात गेले. १९४८मध्ये क्षार-खनिजे आणि मोठय़ा प्रमाणात लागणारी रसायने यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी डॉ. माताप्रसाद तज्ज्ञसमिती नेमली गेली. क्षार-खनिज संशोधनाला चालना देणे, आदर्श कारखाना स्थापन करणे, उत्पादनाचा दर्जा व प्रमाण वाढविणे यासाठी संशोधन केंद्रे स्थापन करणे, ही या समितीची उद्दिष्टे होती.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Wildfire at foot of Sula mountain Environmentalists and farmers control on fire
सुळा डोंगर पायथ्याला वणवा; पर्यावरणमित्र, शेतकऱ्यांकडून नियंत्रण
international standard exhibition center in Moshi empire of garbage created along boundary walls on all sides of this center
मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात

तेव्हाच्या सौराष्ट्र राज्य सरकारने प्रकल्पासाठी भावनगरमधील दोन बंगल्यांसह १२५ एकर जमीन प्रायोगिक क्षार-क्षेत्र म्हणून दिली. तिथे सीएसएमसीआरआय साकारली. पं. नेहरूंनी १० एप्रिल, १९५४ला संस्थेचे उद्घाटन केले.

सीएसएमसीआरआयमधील मुख्य प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत- व्युत्क्रमी परासरणाने समुद्रजलापासून गोडे पाणी आणि पिंगट शैवालांपासून उत्प्रेरके मिळवणे, शैवालांपासून मिळविलेली कबरेदके विषाणू-जनुके पेशींत घालून जैवतांत्रिक उत्पादने घेणे, काप्पाफायकस आणि रक्तशैवाल उडदाच्या वाढीसाठी व गुरे-कोंबडय़ांच्या खाद्यनिर्मितीसाठी वापरणे. हवा झीओलाइट पटलातून सोडून नायट्रोजन व ऑक्सिजन वेगळा करून रुग्णांसाठी अल्पमोलात ऑक्सिजन पुरवणे, घाऊक प्रमाणात पीपीई संच-निर्जंतुकीकरण, अरगॉन गॅस-डायल्यूशन किटद्वारे पृथक्करणाने एजी- १०७, एसआर- ८८, पीबी- २०८, सीडी- १११, एमएन- ५५ इत्यादी मूलद्रव्यांचे आयन मिळविणे. साल्वाडोरा पर्सिका रोपांकरवी विषारी आर्सेनिक काढणे, कोविड योद्धय़ांसाठी पाच थरांचे अतिसुरक्षादायी, स्वदेशी, धुऊन पुनर्वापरायोग्य मास्क तयार करणे, कौलेरपा हरितशैवालापासून कर्करोगरोधक औषधे मिळवणे. सॅलिकॉर्निया ब्रॅकिएटा या खारजमिनीत वाढणाऱ्या रोपातल्या जिवाणूपासून अतिनीलकिरणरोधी मेलॅनिन मिळवण्याचे प्रयोगही येथे चालू आहेत.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader