इतिहासकालीन जीव जेव्हा खडकांच्या विविध स्तरांत गाडले जातात तेव्हा कालांतराने त्याचे जीवाश्म बनतात. जीवाच्या शरीरातील सेंद्रिय पदार्थ नष्ट होऊन त्याची जागा असेंद्रिय ‘सिलिका’पदार्थाने घेतली जाते. त्यामुळे जीवाचा आकार जतन केला जातो. प्रथम आपण विविध कालखंडांची ओळख करून घेऊ. कॅम्ब्रिअनपूर्व- ४.५ अब्ज ते ५४ कोटी वर्ष, पेलेओझोईक- ५४ कोटी ते २५ कोटी, मेसोझोईक- २५ कोटी ते ६.५ कोटी आणि सीनोझोईक- ६.५ कोटी ते २० लाख वर्ष असे भौगोलिक वेळ मापनानुसार चार कालखंड पडतात. आपली सूर्यमाला ही साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. बहुतेक प्राणी आणि वनस्पती जीवाश्म हे सहा कोटी ते ५० लाख या कालखंडात सापडतात. परंतु बरघुर्न व जेम्स शॉफ यांना हार्वर्ड विद्यापीठात १९६०साली कॅम्ब्रिअनपूर्व कालखंडातील सूक्ष्मजीवाश्मांचे पुरावे मिळाले.

पृथ्वीवर कार्बन डाय ऑक्साइडयुक्त वातावरणात बदल होऊन ते प्राणवायूयुक्त होत होते त्या काळात अतिशय प्राथमिक अवस्थेत जीवनिर्मितीला लागणाऱ्या रसायनांची संरचना घडत असल्याचे पुरावे मिळाले. ऑस्ट्रेलिया येथील बिटार स्प्रिंग या झऱ्याच्या चिखलात सूक्ष्मजीवांच्या ३० जातींचे सूक्ष्मजीवाश्म आढळून आले आहेत. काही बुरशी आणि नील हरीत (ब्ल्यु ग्रीन)शैवाल यांचे जीवाश्म तर ९० कोटी वर्षांपूर्वीचे असल्याचे आढळून आले आहेत. अतिशय प्राथमिक अवस्थेत असलेल्या जीवांचे अतिपुरातन असे जीवाश्म कॅनडा येथील आँटॅरिओच्या ‘लेक सुपीरियर’च्या किनाऱ्यावर गनफ्लिट लोह रूपामध्ये तयार झाल्याचे पुरावे १.८ ते २.१ अब्ज वर्ष पुरातन असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतातील कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील संदुरु गावात दोन अब्ज वर्षांपूर्वीच्या सूक्ष्मजीवांचे उत्खनन करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियात स्ट्रोमॅटोलिथिक लाईम स्टोनमध्ये २.८ अब्ज वर्षांपूर्वीचे सूक्ष्मजीवाश्म सापडले आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलियात पश्चिम वारावूना खडकांच्या समूहात आढळून आलेले सूक्ष्मजीवाश्म तर ३.५ अब्ज वर्ष पुरातन असल्याचे सिद्ध झाले आहे.

History of Geography earth Italian scientist Torcelli Blaise Pascal Florine Perrier
भूगोलाचा इतिहास: अदृश्य थरांचा शोध
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
ganesh puja in other countries
भारताप्रमाणेच थायलंडमध्येही साजरी केली जाते गणेश चतुर्थी; कोणकोणत्या देशात केली जाते बाप्पाची पूजा?
Wolves terrorize villages in Bahraich district of Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात ‘हायब्रीड’ लांडगे बनलेत नरभक्षक! कारणे काय? बळी किती? बंदोबस्त कधी?
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
Surya Nakshatra Gochar 2024 | sun transit in Purva Phalguni nakshatra
Surya Nakshatra Gochar 2024 : ३० ऑगस्टपासून ‘या’ तीन राशींचे चमकतील नशीब; सूर्यदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी
Water lily, Characteristics of Water lily,
निसर्गलिपी : पाणलिलींचे प्रकार आणि वैशिष्ट्ये

या पुराव्यांवरून आपल्याला असे म्हणता येईल की, जीवाचे अस्तित्व सध्याच्या संशोधनानुसार तरी ३.५ अब्ज वर्ष पुरातन आहे. हे अतिशय प्राथमिक अवस्थेतील जीव आपले पूर्वज होते असे म्हणायला हरकत नाही. ज्या सेंद्रिय परमाणूपासून जीवाच्या पेशीची बांधणी झाली त्याची निर्मिती नैसर्गिकरीत्याच भौतिक आणि रासायनिक अभिक्रियांमधून झाली आणि जीवाचे पहिले पाऊल पृथ्वीवर पडले.

– डॉ.रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org