– डॉ. निधी पटवर्धन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘आला आला रुखवत, त्यात होती बुगडी
विहीणी विहीणी घालतात मांडवात फुगडी’
या उखाण्यातील रुखवत शब्द फारसी ‘रुषमत्’वरून आला आहे, हे कोशात पाहिले तेव्हा गंमत वाटली. लग्नविधीत नवऱ्या मुलास द्यावयाचे भोजन वगैरे पदार्थ आणि मानसन्मान म्हणजे रुखवत. फारसी रु’षमत म्हणजे देणगी!
मराठीत कितीतरी फारसी शब्द येतात आणि उपसर्गाने तयार होणारे बरेच फारसी-अरबी शब्द आपण वापरतो. मागच्या भागात आपण काही उदाहरणे पाहिली. या भागात आणखी काही उदाहरणे पाहू- फारसी ‘रोज’ या उपसर्गावरून रोजकीर्द म्हणजे दिनचर्या, रोजगार म्हणजे धंदा, रोजगुदस्त म्हणजे कालचा दिवस आणि रोजा म्हणजे मुसलमानांचा उपवासाचा दिवस असे मराठी पर्याय उपलब्ध आहेत. ‘बिन’ म्हणजे शिवाय, खेरिज, वाचून. उदा. बिनदिक्कत, ‘बे’ म्हणजे सुद्धा विना, शिवाय. याचे सामासिक शब्द पुष्कळ आहेत.
जसे बेअब्रू, बेइज्जत, बेईमान, बेकायदा, बेगुमान, बेडर, बेढब, बेपर्वा, बेशरम, बेशिस्त. अजून एक ‘शिवाय’ अर्थाचा उपसर्ग म्हणजे ‘बेला’. त्याची उदाहरणे म्हणजे बेलाशक, बेलाकसूर. ‘ला’ उपसर्गाचे लाइलाज, लाजवाब असे शब्द आपण ऐकले आहेत. ‘ला’ उपसर्गाची लावारिस, लाचार ही उदाहरणे आपण उपयोजितो. ‘हर’ म्हणजे प्रत्येक. हररोज, हरसाल, हरहुन्नरी, हरकाम्या ही त्याची उदाहरणे. ‘दर’ या उपसर्गाचा अर्थ ‘प्रत्येक’ हा आहे. दररोज, दरमहा, दरमजल, दरसाल, दरशेकडा, दरमुक्काम हे शब्द आपल्याकडे आलेले आहेत पण मराठीमध्ये दरदिवस, दररात्री, दरमाणसी, दरदिवशी असे प्रयोग आढळतात. ‘ना’ हा अभावदर्शक आहे. नाउमेद, नापसंत, नादार नाखूश, नाराज, नाचक्की हे शब्द आपण वापरतो. ‘सर’ या उपसर्गाचा अर्थ आहे मुख्य. उदा. सरकार, सरहद्द, सरदार, सरमोकादम, सरनौबत, सरसुभा, सरपंच, सरकारकारकून. सरपेच यापासून मराठी ‘शिरपेच’ झाले आहे. सरजोर वरून ‘शिरजोर’ झाले आहे. आता आजच्या लेखातील शेवटचा उपसर्ग म्हणजे ‘हम’. हम म्हणजे समान/ पूर्ण/ सर्व. उदाहरण द्यायचे तर हमरस्ता, हमरंग, हमजात. एकूणच मराठी शब्दसंग्रहात फारसी उपसर्गानी शब्दसंग्रह वाढविला आहे.
nidheepatwardhan@gmail.com