पुरातन काळी इजिप्त देशात रुधिरशास्त्राचा शोध लागला असे मानतात. १६९५ मध्ये सूक्ष्मदर्शी यंत्राखाली रक्त न्याहाळताना अंतोन फोन ल्युवेनहोक यांना लोहित रक्तकणिका या रक्तपेशी दिसल्या; परंतु या पेशींचे कार्य काय, त्यांचे प्रयोजन काय, त्यांचा आरोग्याशी संबंध काय, इत्यादी बाबी तेव्हा ज्ञात नव्हत्या. ल्युवेनहोकच्या मृत्यूनंतर, रुधिरशास्त्राचे जनक विल्यम ह्य़ुसन यांनी लोहित रक्तकणिका याविषयी माहिती प्रसिद्ध केली. या पेशी इतक्या मोठय़ा संख्येने आहेत म्हणजे त्यांचे वादातीत महत्त्व आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१७०० मध्ये गाब्रियाल अन्द्राल या फ्रेंच प्राध्यापकाने आणि विल्यम अ‍ॅडिसन या इंग्लिश डॉक्टरने श्वेत रक्तपेशीची माहिती सर्वप्रथम प्रसिद्ध केली.

१८१८ मध्ये जेम्स ब्लान्डेल याने रक्तपराधनाचा प्रथम प्रयोग केला. आल्फ्रेड डोंने यांनी १८४२ मध्ये रक्तिबबिकांचा शोध लावला आणि या पेशींचा रक्त गोठण्याशी संबंध आहे हेही नमूद केले. जरी या साऱ्या शोधांचे शास्त्रीय महत्त्व होते तरी यांचे मोजमाप आणि त्याचा रोगनिदानाशी संबंध काय, हे कळण्यासाठी आणखी शंभर-दीडशे वष्रे जावी लागली.

पॉल एरलिक Paul Ehrlich या जर्मन शास्त्रज्ञाने रुधिरशास्त्रीय अभ्यासासोबतच प्रतिक्षमताशास्त्र (इम्युनोलॉजी) याही विषयात सखोल संशोधन सुरू केले होते. ‘गरमी किंवा उपदंश’ या गुप्तरोगाचा योग्य आणि अचूक उपचार यांनीच शोधून काढला. एका इंजेक्शनने हा रोग नेस्तनाबूत करून त्यांनी या औषधाला ‘जादूची गोळी’ असे लाडिक नाव दिले. kMagic bulletl  मुळे त्यांना १९०८ साली शरीरक्रिया विज्ञानातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.

पॉल एरलिक यांनी सर्वप्रथम केमोथेरपी ही संज्ञा सर्व जगास देऊन या उपचार पद्धतीची मुहूर्तमेढ रोवली. १८७९ साली यांनी रक्त तपासण्याविषयक पुस्तक लिहिले आणि रक्त-थेंबाची काचपट्टी बनवून रक्तपेशींची मोजदाद करण्याचे तंत्रदेखील जगासमोर आणले. हे तंत्र अगदी आता आतापर्यंत वापरण्यात येत होते. आता मात्र सर्वत्र स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने रक्तघटकांची मोजदाद होते. रक्तपेशींच्या संख्येवरून, आकारा-प्रकारावरून रोगाचा संसर्ग असण्याची शक्यता आणि इतरही आरोग्यविषयक निदान करता येते.

डॉ. नंदिनी नेरुरकर- देशमुख

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

बेंद्रे यांचे साहित्य व  पुरस्कार

द. रा. बेंद्रे यांनी संतवाङ्मयाचाही सखोल अभ्यास केला. ‘गुरू गोविंदसिंग’, ‘कबीर वचनावली’, ‘अरविंदाचे भारतीय नवजन्म’, ‘टागोरांच्या १०१ कविता’- यांचे कन्नडमध्ये त्यांनी अनुवाद केले आहेत. ‘निराभरण सुंदरी’ (१९४०) मध्ये त्यांच्या काही कथा, ललित निबंध व विनोदी गीते आहेत. ‘होस संसारमत्तु’सह दोन नाटके प्रसिद्ध झाली आहेत, तर ‘साहित्य मत्तु विमर्शे’, ‘विचारमंजरी’, ‘काव्योद्योग’, ‘महाराष्ट्र साहित्य’ इ. नऊ समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

‘नाकुतन्ती’ या संग्रहात ४४ कविता आहेत. त्यांपैकी सहा कविता समकालीन लेखकांच्या नातेसंबंधांवर आणि लोकशाहीसंबंधीच्या वास्तविक अभिप्रायावर आधारलेल्या आहेत. बाकीच्या कवितांतून विचार, चिंतन आणि भावना यांची विलक्षण संगती बघायला मिळते. कवीच्या भावधारणेत चार या आकडय़ाला फार महत्त्व आहे. त्याद्वारे प्रतीत होणारे जीवनदर्शन या काव्यसंग्रहातील कवितेतून व्यक्त होते.

बेंद्रे यांची साहित्यसेवा मौलिक स्वरूपाची आहे. लोकपरंपरेचा वापर करून त्यांनी कन्नड भाषेला सामथ्र्य व लवचीकपणा प्राप्त करून दिला. श्रेष्ठ प्रतीच्या भावकविता रूपाने त्यांनी कन्नड काव्य अधिक समृद्ध व संपन्न केलं. त्यांचं, कानडी भाषा व त्याद्वारे होणाऱ्या अभिव्यक्तीवर एवढं प्रभुत्व होतं की, ते अत्यंत जटिल व दुबरेध विचार व कल्पना, सूक्ष्मातिसूक्ष्म गूढ अध्यात्मवादी, भावनिक व मानसिक गुंतागुंतही सहज-सोपेपणाने व्यक्त करतात.

बेंद्रे यांच्या कविता जर्मन, हिंदी, संस्कृत आणि इतर अनेक भारतीय भाषांत अनुवादित झाल्या आहेत. १९४३ मध्ये शिमोगा येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक साहित्यिक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले.

१९५८- साहित्य अकादमी पुरस्कार, १९६६- पासून कर्नाटक राज्याने त्यांना आजन्म निवृत्तिवेतन सुरू केले होते.  १९६८- म्हैसूर विद्यापीठाने व कर्नाटक विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवीने सन्मानित केलं. १९६८- भारत सरकारने ‘पद्मश्री’ प्रदान केली. १९७३- ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मराठी भाषिक पण कन्नड भाषेला आपलं मानून, कन्नड भाषेची सेवा करणारे द. रा. बेंद्रे हे खऱ्या अर्थाने भारतीय एकात्मकतेचे प्रतीक आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com