– डॉ. नीलिमा गुंडी

मृत्यू या गूढ, अटळ घटनेचे वर्णन अनेक वाक्प्रचार करतात. कोण, कधी, कोठे मृत्यू पावतो, यासंदर्भानुसार त्यांच्यात वेगळेपणा येतो. बखरीमध्ये आढळणारा एक वाक्प्रचार येथे नोंदवते. तो म्हणजे करवत घेणे. याचा अर्थ आहे, जलसमाधी घेणे. ‘पाणिपतची बखर’मध्ये युद्धानंतरचे हे वर्णन आहे : ‘किती एकांनी राज्यलोभे प्रयागी जाऊन करवत घेतले.’ याचा अर्थ असा की पुढील जन्मी राज्य मिळावे, यासाठी गंगा व यमुना यांच्या प्रवाहाच्या कात्रीमध्ये जलसमाधी घेतली. युद्धाशी संलग्न असा आणखी एक वाक्प्रचार म्हणजे कंठस्नान घालणे. याचा अर्थ आहे शिरच्छेद करणे, शत्रूचे शिर छाटल्यामुळे वाहणाऱ्या रक्ताने त्याला होणारे स्नान म्हणजे कंठस्नान. हा वाक्प्रचार चित्रदर्शी आहे. धारातीर्थी पडणे, हाही युद्धाशी निगडित वाक्प्रचार आहे. शस्त्राची धार हेच जणू पवित्र तीर्थ मानले जाते. त्यामुळे युद्धात आलेला मृत्यू गौरवपात्र ठरतो.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर

जीवनविषयक विशिष्ट तत्त्वज्ञानही वाक्प्रचारांमध्ये कधी उमटते. उदा. आयुष्याची दोरी तुटणे हा वाक्प्रचार माणसाची अगतिकता आणि नियतीची सत्ता सुचवतो. यमलोकीचा रस्ता धरणे, हा वाक्प्रचार समूहमनावरील संकल्पनांचा प्रभाव दाखवतो. यम ही मृत्यूची देवता मानली जाते. पृथ्वी हा मृत्युलोक (येथे प्रत्येकाला मरण अटळ !), त्यामुळे मृत्यूनंतर यम माणसाला दुसऱ्या (काल्पनिक) जगात घेऊन जातो, अशी अनेकांची समजूत असते. पंचत्वात विलीन होणे, हा वाक्प्रचार वैज्ञानिक दृष्टी सुचवतो. पंचमहाभूतांमुळे घडलेला देह मृत्यूनंतर पुन्हा पूर्वस्थितीला जातो, हा त्याचा अर्थ आहे.

कालगतीचा संदर्भ देत येणारा एक वाक्प्रचार म्हणजे घटका भरणे, याचा अर्थ आहे अंतकाळ जवळ येणे. घटिका हे कालमापनाचे जुने परिमाण आहे. संत गाडगेबाबा यांनी अखेरच्या कीर्तनात देवाच्या नावाने प्राण्यांना बळी देण्याच्या प्रथेवर टीका करताना म्हटले आहे, ‘जत्रेला जाताना बैलगाडीच्या मागं बांधलेल्या बकरीला काय माहीत की आता आपली घटका भरली आहे!’

हे विविध वाक्प्रचार काहीवेळा मृत्यूचे वर्णन करताना भाषेतील लालित्य वापरून दु:ख टिपूनसुद्धा घेतात!

nmgundi@gmail.com