विविध रोगांचे विषाणू आणि बुरशी यांच्यामुळे पिकांना धोका असतो, असा समज आहे. परंतु जंगलातील झाडाझुडपांना प्रतिकूल परिस्थितीत मात करण्यास सूक्ष्मजीव साहाय्यभूत ठरतात, असे अमेरिकेतील पेन स्टेटमधील विषाणूतज्ज्ञांना आढळले आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे मोकळी जागा झपाटय़ाने कमी होत चालली आहे. बदलत्या वातावरणाचादेखील अन्नउत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. यातून असंतोष माजून यादवी होऊ शकते. हे टाळण्यासाठी पुरेसे अन्न पिकवावे लागणार आहे. दुष्काळासारखी नसíगक आपत्ती वाढत असताना अन्नपुरवठय़ासंबंधी गंभीर प्रश्नचिन्हे निर्माण होत आहेत.
अशा वेळी, शास्त्रज्ञांनी एक दिलासादायक बाब हुडकून काढली आहे. वनस्पती आणि विषाणूंतील सहकार्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थितीत तग धरून राहण्यास विविध पिकांना मदत होत असते. या संशोधकांनी चार विविध प्रकारचे विषाणू आणि भात, टोमॅटो, बीट अशा नाना पिकांच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगात प्रस्तुत बाब स्पष्ट झाली. हे जीवाणू कडक उष्म्यात झाडांना तग धरण्यास साह्य़भूत ठरतात. पिके आणि सूक्ष्मजीव एकत्र असले तर ते कोस्टारिकासारख्या ज्वालामुखीने तापलेल्या जमिनीतसुद्धा ५०अंश सेल्सियसपर्यंत जगू शकतात. त्यांना जर वेगळे केले तर मात्र दोन्ही जीव या उष्ण वातावरणात टिकाव धरू शकत नाहीत. विषाणू वेगळे केलेली पिके मलूल होतात व त्यांना विषाणूंचा पुरवठा करताच ते पुन्हा प्रफुल्लित होतात. याचा अर्थ, उष्ण तापमानाला टिकाव धरण्यासाठी पिकांना विषाणूंची गरज लागते. हे नेमके कसे घडते, हे शोधून काढणे, ही संशोधनाची पुढची पायरी आहे.
आतापावेतो, या संशोधकांनी सात हजार विविध जातींच्या वनस्पतींवर पिकांमध्ये साधारणत: आढळणाऱ्या विषाणूंचा मारा करून सर्वेक्षण केले आहे. मनुष्य आणि प्राण्यांना रोग बाधीत करणारे सूक्ष्मजीव वनस्पतींशी मात्र चांगलेच सूत जमवतात. हे विषाणू एका पिकातून बियांद्वारे दुसऱ्या पिढीत प्रवेश करताना आढळले आहेत.
विशेषत: हे उपकारक जीवाणू, बुरशी, सूक्ष्मजीवाणू वन्य वनस्पती सृष्टीत मोठय़ा प्रमाणात आढळतात. त्यामुळे एकाच ठिकाणच्या दुष्काळग्रस्त प्रदेशात जंगलातील झाडे बहरलेली दिसतात, तर सपाट जमिनीवरील पिके मलूल झालेली आढळतात.
-जोसेफ तुस्कानो , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल – वनस्पतींच्या मदतीला सूक्ष्मजीव
विविध रोगांचे विषाणू आणि बुरशी यांच्यामुळे पिकांना धोका असतो, असा समज आहे. परंतु जंगलातील झाडाझुडपांना प्रतिकूल परिस्थितीत मात करण्यास सूक्ष्मजीव साहाय्यभूत ठरतात, असे अमेरिकेतील पेन स्टेटमधील विषाणूतज्ज्ञांना आढळले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोकळी जागा झपाटय़ाने कमी होत चालली आहे. बदलत्या वातावरणाचादेखील …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-10-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plants with the help of microorganisms