मेघदूत प्रकल्पांतर्गत बारामती तालुक्यातील तरडोली, लोणीभापकर, सिद्धेश्वर निंबोडी, शिर्सुफळ, मोराळवाडी मुर्टी, मोरगाव, सुपे, वाकी, ढाकळे येथील तळ्यांमधील जलपर्णी काढणे व तलावांची खोली वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र गेल्या अनेक दशकांमध्ये साठलेला गाळ काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात काम करावे लागेल, हे लक्षात आले. जेसीबीच्या साहाय्याने तलावाच्या पाणी साठवण क्षेत्रामध्ये वाढलेल्या गारवेलसारख्या वनस्पतीचे मुळासहित निर्मूलन करण्यात आले. पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी जेसीबी व ट्रॉलीच्या साहाय्याने तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले.
या गाळामध्ये सेंद्रिय घटकांचे प्रमाण भरपूर असल्याने शेतीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून शेती उत्पादन वाढते. गाळ उपसल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढते. परिणामी, आसपासच्या परिसरातील विहिरींची पाझर क्षमता व पाण्याची पातळी वाढते. वर्षांतून दोन वेळा पीक उत्पादन घेता येते. शेती, मत्स्यशेती यांसाठी तसेच पशूंना पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होते. जमिनीची धूप कमी होते. गारवेल वनस्पतीच्या निर्मूलनामुळे तलावाच्या पाण्यात गारवेलीपासून पसरणाऱ्या विषारी द्रव्यांवर नियंत्रण राहते. पाण्याचे प्रदूषण होत नाही. त्यामुळे स्थलांतरित पशुपक्षी, वन्यप्राणी यांचे प्रमाणही वाढते.
फोरमने तलाव संवर्धनाबाबत इतरांनाही मार्गदर्शक ठरतील अशा सूचना केल्या आहेत. गावामधील गाळ वाहून आणणाऱ्या ओढय़ावरील बांधाची उंची पाच फुटांपर्यंत वाढविल्यास तलावामध्ये साचणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी होते. डोंगररांगा व माळरानातून येणारे पावसाचे स्रोत नाला बंडिंगसारख्या उपाययोजना करून अडविल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. फोडण्यात आलेल्या तलावांच्या संरक्षक भिंती व सांडव्यांची उंची वाढविल्यास तलावांची पाणी साठवण क्षमता वाढते.
फोरमने प्रकल्प मेघदूतसाठी केलेल्या कामाचा आणि खर्चाचा ताळेबंदही मांडला आहे. यानुसार एक घनमीटर माती तलावामधून काढली तर १००० लिटर पाणीसाठा वाढतो. एक ट्रेलर माती तलावामधून काढली तर सुमारे ८१०० लिटर पाणीसाठा वाढतो. एक एकर जमिनीमध्ये तलावातील पाच गुंठे जागेतील माती भरल्यास अंदाजे ४०,००० रुपये खर्च येतो. अशाच प्रकारचे काम करण्यासाठी हा ताळेबंद इतरांना निश्चितपणे दिशादर्शक ठरू शकतो.
कुतूहल – प्रकल्प मेघदूत २
मेघदूत प्रकल्पांतर्गत बारामती तालुक्यातील तरडोली, लोणीभापकर, सिद्धेश्वर निंबोडी, शिर्सुफळ, मोराळवाडी मुर्टी, मोरगाव, सुपे, वाकी, ढाकळे येथील तळ्यांमधील जलपर्णी काढणे व तलावांची खोली वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र गेल्या अनेक दशकांमध्ये साठलेला गाळ काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात काम करावे लागेल, हे लक्षात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project meghdoot