भारतात आलेल्या स्थलांतरितांचा मागोवा घेताना वर्ष कधी सरले ते लक्षातही आलं नाही! ‘जे आले ते रमले’ या सदराला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला. धन्यवाद! सदरातील लेख वाचताना ‘रमलेल्या’ वाचकांच्या काही निवडक, प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथे देत आहे.

मकरंद भागवत, मेलबोर्न- परकीयांच्या योगदानाबद्दल दुर्लक्षित माहिती या सदरातून मिळाली. विजया देव, पुणे- अ‍ॅन फेल्डहाऊस वरील लेख उद्बोधक वाटला. विक्रांत चौधरी, हेलसिंकी फिनलँड- अत्यंत दुर्मीळ माहिती मिळते. रामप्रसाद कान्हेरे, रत्नागिरी- लेखांची भाषा सोपी आणि माहिती दुर्मीळ. चंद्रकांत कावतकर, अंधेरी- परकीयांच्या योगदानाबद्दल दुर्लक्षित माहिती सोप्या आणि कमी शब्दात मांडण्याची हातोटी उत्तम. अशोक पाटील, लंडन- एल्फिन्स्टनबद्दलचे लेख आवडले. नारायण श्रीमतवार, किनवट, नांदेड- ख्रिस्तॉफ हेमेनडार्फविषयी माहिती उद्बोधक. सुधीर वैद्य, नागपूर- सर्वच लेख उत्सुकता वाढवतात. भास्कर खरे, ठाणे- सुबक, सोपे लिखाण. प्रा. हंसराज जाधव, पठण- सूफी संतांवरील लेख अप्रतिम. सुहास राजेदरकर, अंधेरी- उत्तम विषय, उत्तम लिखाण. निशाद मुल्ला- सुफींवरील लेख उत्तम. वसंत धुपकर, पुणे- अमीर खुस्रोविषयी लेख आवडले. सुरेश कदम, गुडगांव- अनागरिक धम्मपालबद्दलही लेख लिहावा. आनंद मयेकर, ठाणे- अत्यंत मौल्यवान माहिती आपण देत आहात. राजाभाऊ वाघमारे, डोंबिवली- अ‍ॅन फेल्डहाऊसवरील लेख फारच छान वाटला. अभिजित लोंढे- या विषयावर पुस्तक लिहावे.

शरद उपासनी- रणजीतसिंगाच्या सन्यातल्या फ्रेंच सेनानींचा सहभाग चकित करणारा आहे. प्राची देशमुख, वांद्रे- बाबरी मशिदीबद्दल माहिती लिहावी. डॉ. श्रीपाद पाठक, ठाणे- भोपाळ संस्थानातील फ्रेंच बोरबॉन सेनानीबद्दलची माहिती नावीन्यपूर्ण वाटली. जयेश निमसे- ब्रिटिश गणितज्ञ जíव्हसचे मोलाचे योगदान भावले. नीलिमा अकोलकर, सॅन फ्रॅन्सिस्को- कुषाण राजा कनिष्क याविषयीचे लेख उद्बोधक आहेत. किरण राजूरकर, पनवेल- सोपी भाषा आणि दुर्मीळ माहितीमुळे लेखमाला वाचनीय झाली. महादेव टिकेकर, मडगाव गोवा- डॉ. श्वार्ट्झ यांच्या तंजावरातील कार्याबद्दल माहिती चांगली होती.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader