डॉ. श्रुती पानसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचन करताना डोळ्यांना जी अक्षरं दिसतात, ती मेंदूतील ‘टेम्पोरल लोब’मध्ये पाठवली जातात. इथे दोन अक्षरांमधला फरक ओळखण्याचं काम चालतं. ‘च’ आणि ‘ज’ यांच्यातला फरक, ‘प’ आणि ‘ष’ यांच्यातला फरक समजला नाही, तर अर्थाचा अनर्थ होतो. शब्दच ओळखला गेला नाही, तर अर्थ लावण्यात चूक होते.

शब्द ऐकू आला किंवा वाचला, की लगेच त्या शब्दाचं एक चित्र मेंदूच्या याच भागात तयार होतं. ‘नदी’ असं ऐकलं किंवा वाचलं, की नदीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. हे काम काही मिलिसेकंदांमध्ये होत असतं; त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही.

ज्या मुलांना वाचन करताना समस्या जाणवतात, त्यांना कदाचित या पहिल्या पायरीवरच अडथळा जाणवत असेल. चित्र उभं राहिलं नाही, तर मुलं वाचू शकणार नाहीत आणि अर्थ लक्षात येणार नाही.

ही गोष्ट लक्षात घेतली, तर ज्या गोष्टी मुलांनी कधी अनुभवल्या नाहीत, चित्रात पाहिल्या नाहीत, त्या नजरेसमोर आणणं मुलांना सुरुवातीला अवघड जातं. उदा. आदिवासी भागातल्या मुलाला मुंबईचं धकाधकीचं जीवन वर्णन करून सांगितलं, तर नजरेसमोर येईल, पण त्यातली दगदग अनुभवावीच लागेल. तर आदिवासी भागात मुंबईतल्या मुलाला सहजपणे डोंगर चढणं, झाडावर चढणं हे जमणार नाही. शिक्षण अनुभवजन्य असावं असं म्हणतात, ते यासाठी!

‘फ्रण्टल लोब’ हा भाग मेंदूच्या डाव्या आणि उजव्या क्षेत्रात विभागून आहे. हालचाल, समस्या सोडवणं, स्मरणशक्ती, योजना आखणं, निर्णय घेणं ही या भागाची मुख्य करय आहेत. फ्रण्टल लोबच्या डाव्या भागात बोलणं, सलग वाचन करणं, व्याकरणाचा उपयोग करणं आणि अर्थ लावणं ही महत्त्वाची कामं होतात.

मेंदूच्या अंतर्भागात टेम्पोरल लोबमध्ये ‘अँग्युलर गायरस’ हा भाग आहे. ऐकण्यातून किंवा वाचनातून मिळालेली माहिती जमवून त्यावर संस्करण करण्याचं काम इथं चालतं.

वाचनाला मदत करणारे हे भाग एकमेकांशी जुळवून घेऊन काम करतात. यातल्या एका भागासाठी काम केलं, तर इतर भागांची क्षमता वाढते असं दिसून आलं आहे. हे वाक्य उलट करायचं, तर एकाही भागासाठी काम केलं नाही, तर संपूर्ण वाचन क्षमतेवरच परिणाम होतो.