अॅबे नोले हा फ्रेंच संशोधक १७४८ साली द्रवांच्या गुणधर्मावर प्रयोग करत होता. त्याच्या मते, ‘द्रवाचे उकळणे म्हणजे, त्या द्रवात विरघळलेली हवा बाहेर येणे.’ आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याला विरघळलेली हवा पूर्णपणे काढून टाकलेले अल्कोहोल उकळवून पाहायचे होते. त्यासाठी त्याने एका भांडय़ात हवारहित अल्कोहोल साठवले होते. त्या काळच्या प्रचलित पद्धतीनुसार, डुकराच्या मूत्राशयाचे पटल बांधून त्याने या भांडय़ाचे तोंड बंद केले. त्यानंतर त्यातील द्रवाचा हवेशी संबंध येऊ नये म्हणून भांडे पाण्याखाली बुडवून ठेवले. काही वेळाने त्याला अनपेक्षित असे घडलेले दिसले. अल्कोहोलच्या भांडय़ात पटलातून बाहेरचे पाणी शिरले होते आणि तेही इतक्या प्रमाणात की त्या पाण्याचा पटलावर मोठा ताण येऊन पटल बाहेरच्या बाजूला फुगले होते. नोलेने या घटनेची नोंद आपल्या द्रवांच्या उकळण्यावरील प्रयोगांच्या अहवालात एक छोटे टिपण म्हणून केली. नोलेसाठी तो विषय तिथेच थांबला. परंतु या घटनेने भौतिकशास्त्राबरोबरच जीवशास्त्रामधील एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा