डॉ. रॉबर्ट कॉक हे १८६२ मध्ये जर्मनीतील गॉटींजेन महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होते. तेथे त्यांच्यावर हेन्ले या प्राध्यापकाचा प्रभाव पडला. हेन्ले यांनी १८४० मध्ये परोपजीवी जंतूंमुळे रोग होतात, असे एका प्रबंधात मांडलं होतं. वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेत असताना संसर्गजन्य रोग या विषयाबद्दल रॉबर्ट कॉक यांना विशेष आवड निर्माण झाली.
१८६० मध्ये वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. अँथ्रॅक्सच्या संशोधनातल्या अनुभवावरून कॉक यांनी विशिष्ट जंतूंमुळे विशिष्ट रोग होतो, ही कल्पना मांडली खरी; परंतु हे सिद्ध करण्यासाठी तो विशिष्ट जंतू शुद्ध स्वरूपात कसा वाढवावा, हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान होते. एखाद्या जिवाणूचा एखाद्या आजाराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, तो जिवाणू शुद्ध स्वरूपात असणं आवश्यक आहे; हे रॉबर्ट कॉक यांच्या लक्षात आलं.
तपासणीसाठी घेण्यात आलेल्या रक्त-लघवी-जुलाब इत्यादी कोणत्याही नमुन्यांमध्ये अनंत प्रकारचे जिवाणू असतात. त्यातील प्रत्येक जिवाणूची एकेक पेशी घनपृष्ठभागावर वेगळी करता आली; तर या एकेक पेशीच्या पेशीविभाजनातून आपल्याला केवळ एकाच प्रकारच्या पेशींची वसाहत (ू’ल्ल८) मिळू शकते; असा रॉबर्ट कॉक यांचा तर्क होता आणि तो खराही ठरला. पेशींची वसाहत वाढवण्यासाठी आवश्यक असलेले नेमके पोषक अन्नघटक आणि अगार-अगार ही पावडर वापरून यांनी प्रयोगशाळेत कृत्रिम घन माध्यम तयार केलं. हे माध्यम पेट्रिडिशमधे (विशिष्ट झाकण असलेली बशी) ओतून त्यावर जिवाणू विभक्त केले.
या तंत्रामुळे १८८२ ते १९०० या काळात युरोपमध्ये प्रादुर्भाव असलेल्या अनेक रोगांचे जिवाणू शुद्ध स्वरूपात मिळवणे शक्य झाले. या रोगांमध्ये सिफिलिस, गनोरिया, टायफस, डिसेंट्री, टय़ूबरक्युलॉसिस अशा रोगांचा समावेश होता. म्हणूनच रॉबर्ट कॉक यांना ‘प्युअर कल्चर तंत्रज्ञानाचे उद्गाते’ म्हणून ओळखलं जातं.
एखादा जिवाणू विशिष्ट रोगासाठी कारणीभूत आहे का, हे ठरविण्यासाठी रॉबर्ट कॉक यांनी काही गृहीतकं निश्चित केली; त्यांना कॉक-हेन्ले गृहीतकं म्हणतात. ती आजही मार्गदर्शक आहेत.
१९०५ साली त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
अनेक देशांनीही त्यांच्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले.
–डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
‘साहित्य हे जीवनाला समजून घेण्याचं माध्यम’
शिवराम कारंत यांना अनेक सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत- १९५९ कर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार, १९८५ साहित्य अकादमी फेलोशिप, १९७३ संगीत नाटक अकादमी फेलोशिप, पंप पुरस्कार, १९९० मध्ये तुलसी सन्मान, दादाभाई नौरोजी पुरस्कार, यक्षगानसारख्या लोकनृत्यातील योगदानाबद्दल स्वीडीश अॅकॅडमी पुरस्कार, मैसूर येथील ३७ व्या कर्नाटक साहित्य परिषदेचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवले. २०११ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, स्पेशल ज्युरी अॅवार्ड, स्पेशल लेखक अॅवार्ड, नॅशनल फिल्म अॅवार्ड आणि म्हैसूर, कर्नाटक विद्यापीठांनी डी.लीट् ने सन्मानित केलं आहे. ‘पद्मविभूषण’ने भारत सरकारने त्यांना सन्मानित केले होतं पण आणीबाणी विषयी नापसंती दर्शवत त्यांनी हा सन्मान नाकारला.
अशा या तत्त्वनिष्ठ शिवराम कारंत यांनी १९७७ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात आपलं लेखनाविषयीचे मनोगत व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, ‘‘मी माझं अधिकतर लेखन कन्नड भाषेत केलेलं आहे. कन्नड भाषा ही मला माझ्या कुटुंबाकडून आणि आजूबाजूच्या वातावरणातून सहजपणे प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणतीच अडचण आली नाही. तुला सगळ्याप्रमाणेच मी देखील माझे विचार आणि भावना आपल्या मातृभाषेत, माझ्याभोवती असलेल्या, लोकांसमोर सहजपणे व्यक्त करू लागलो. मी माझ्या अनुभवावर गंभीरपणे विचार करीत असे आणि कदाचित असं करण्यामुळे माझ्या पूर्वीच्या मतांना धक्के बसत होते. आपल्या जिज्ञासा पूर्तीसाठी हळूहळू पूर्ण कर्नाटक पायाखाली घातल्यामुळे माझी दृष्टी विशाल झाली. या प्रचितीमुळेच मला प्रत्येक गोष्ट सुख दु:खाच्या कसोटीवर मोजून- मापून घेण्याची सवय लागली. अनेक दु:ख ही परंपरेचा अंधपणे स्वीकार केल्यामुळे जी विसंगती निर्माण होते, त्यातून जन्म घेतात. अंधपरंपरेने स्थापित केलेल्या कठोर नैतिक मान्यताच अनुसरण केल्यानं माणूस जितका असहाय होतो, तितकाच तो पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी भावुकपणे, स्वीकारण्यानेही होतो. या सगळ्या गोष्टींनी माझ्या मनात संभ्रम निर्माण केला. त्यामुळे आत्मचिंतन करणं ही माझी गरज बनली. शेवटी मला माझी स्वत:ची शैली विकसित करावी लागली. मी लेखक आहे म्हणजे इतर कुणापेक्षा श्रेष्ठ आहे, ही भावनाही चुकीची असल्याचं माझ्या लक्षात आलं. खऱ्या अनुभूतीच्या आधारानेच आपले लेखन करीन असा मी विचार केला. अशा अनुभवांची अभिव्यक्ती जनसामान्यांच्या पातळीवर जाऊन करणं हे माझे उत्तरदायित्व मानलं, साहित्य हे जीवनाला समजून घेण्याच माध्यम आहे हे मला जाणवलं.’’
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com