डॉ. विवेक पाटकर
स्वयंपाकघरातील नित्य वापराची अनेक अत्याधुनिक उपकरणे जसे रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, कॉफी/ चहा तयार करणारे तसेच भांडी धुण्याचे यंत्र इत्यादी उपकरणे आपल्याला फारशी तोशीस न पडता अपेक्षित सेवा वेळेत देतील असे चित्र पुढे येत आहे. मात्र यासाठी माणूस आणि यंत्र यांनी एकमेकांशी जुळवून घेणे क्रमप्राप्त आहे. आपण असे इतर तंत्रज्ञानाबाबत करत आलेलो आहोत; आपण आपली जीवनशैली आणि घरातील जागा यंत्राच्या सुलभ वापरासाठी बदललेल्या आहेत. उदाहरणार्थ, मोटारगाडी घरात ठेवण्यासाठी आपण स्वतंत्र पार्किंगची उभारणी करतो. तसेच यंत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या जोडणीतारा सुरक्षित राहाव्यात आणि दृष्टीस पडू नयेत म्हणून त्यांच्यावर पाइपचे आवरण घालतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याच प्रकारे घरात यंत्रमानवांसाठी महत्त्वाचे बदल करावे लागू शकतील. स्थानबद्ध स्थितीत कार्य करणाऱ्या यंत्रमानवांना सुस्थितीत राखण्यासाठी खास जागा तयार कराव्या लागतील. घरात हालचाल करणाऱ्या यंत्रमानवांच्या वाटेत किमान अडथळे येतील हे बघावे लागेल. ते चाकांनी फिरणार असतील तर घरातील फरशी विशिष्ट तऱ्हेची असावी लागेल. त्याबाबत कदाचित आपल्या आवडीनिवडीला थोडी मुरुड घालणे आवश्यक असेल.

हेही वाचा : कुतूहल : बुद्धिमत्तेची कुरघोडी

दुसऱ्या बाजूने बघता, आवाजाची पट्टी तसेच माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचाली लक्षात घेऊन प्रगत यंत्रमानवाला वावरावे लागेल. उदाहरणार्थ, घरातील लोकांत वादावादी होत असल्यास त्या संवादाचा सूर समजून, त्याने दुसरीकडे जाणे आणि त्या गोष्टींचा त्याच्या स्मृतिमंजूषेत संग्रह न होऊ देणे, यासाठी तरतूद करावी लागेल. घरातील व्यक्ती कुठली जड वस्तू उचलत असेल किंवा हलवत असेल, तर यंत्रमानवाने हातातील काम तूर्त बाजूस ठेवून तत्परतेने तिला त्या कामात मदत करणे अपेक्षित असेल. यंत्रमानवाच्या अशा कृतीस दाद देणे हे आपण कटाक्षाने केल्यास यंत्रमानव त्याची नोंद घेऊन भविष्यात तशी मदतशील कृती करण्यासाठी अधिक सजग राहील.

हेही वाचा : कुतूहल : डेव्हिड हॅन्सन

तसेच घरातील माणसांची मानसिक अवस्था समजून काय करावे किंवा करू नये हे यंत्रमानव ठरवू शकले पाहिजेत. त्याचप्रमाणे यंत्रमानव काही काम करण्यास असमर्थ ठरले तर त्याने आपली अस्वस्थता जाहीर केली पाहिजे. आपण ती समजून त्याला कुठले काम द्यायचे हे ठरवावे लागेल. सूचना स्पष्ट दिल्या जातील, याची काळजी घेणे उपयुक्त ठरेल. थोडक्यात मानव आणि यंत्रमानव यांना एकमेकांशी जुळवून घेऊन आपले सहअस्तित्व दोघांना लाभकारी करावे लागेल.

डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल – office@mavipa.org
संकेतस्थळ – http://www.mavipa.org