भारतीय ज्ञानपीठाचा १९७८ चा साहित्य पुरस्कार, नवकवितेचे जनक, आधुनिक हिंदी साहित्यातील प्रगतशील लेखक  सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन ऊर्फ ‘अज्ञेय’ यांना ‘कितनी नावों में कितनी बार’ या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. हा कवितासंग्रह १९६२ ते १९७१ च्या दरम्यान प्रकाशित भारतीय भाषांमधील सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘अज्ञेय’ यांचा जन्म ७ मार्च १९११ रोजी उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यतील कुशीनगर या गावी झाला. त्यांचे वडील संस्कृत विद्वान पंडित होते.  १९२५ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पंजाब युनिव्हसिर्टीतून बाहेरून दिली. त्यानंतर मद्रासला इंटपर्यंत शिक्षण झाल्यावर ते लाहोरला आले आणि १९२९ मध्ये बी.एस्सी. झाले. इंग्रजी विषय घेऊन ते एम.ए. करीत होते. या सुमारास ते भगतसिंग यांच्या क्रांतिकारी दलाचे सदस्य झाले आणि भूमिगत कार्यात सहभागी असलेल्या अज्ञेय यांना १९३० मध्ये अटक झाली. तेव्हा एक महिना लाहोरमध्ये आणि १९३० ते १९३३ सुमारे साडेतीन वर्षे दिल्ली आणि पंजाबच्या तुरुंगात होते. नंतर दोन महिने किल्ल्यात आणि दोन वर्षे घरातच पण नजरकैदेत होते. याच काळात त्यांनी शेखर एक जीवनी या त्रिधारा कादंबरीचे लेखन केले. तुरुंगातील वास्तव्यातील ही निर्मिती असून यापैकी सुरुवातीला दोन भागच प्रकाशित झाले. १९३६ मध्ये काही काळासाठी आगरा येथील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘सैनिक’च्या संपादक मंडळावर होते. १९४७ मध्ये हिंदीतील आधुनिक साहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘प्रतीक’ मासिकाचे ते संपादक झाले. १९५१ मध्ये ‘वाक्’ या इंग्रजी नियतकालिकाचेही ते संपादक होते. एक कुशल संपादक म्हणूनही त्यांचे स्थान मोठे आहे.  १९६५ ते १९६८ या काळात ते ‘दिनमान’ साप्ताहिक वार्तापत्राचे संपादक होते. मग त्यांनी कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात भारतीय साहित्य आणि संस्कृती यांच्या अध्ययनासंदर्भात मार्गदर्शन केले.  १९७१ मध्ये जोधपूर विश्वविद्यालयाच्या तुलनात्मक साहित्याच्या आचार्य पीठावर त्यांना घेण्यात आले. १९७७ मध्ये जर्मनीहून परत आल्यावर अज्ञेयांनी ‘दैनिक नवभारत टाइम्स’चे संपादकपद स्वीकारले. एकूणच अज्ञेय यांचा संपर्क वृत्तपत्रांशी, संपादन कार्याशी मोठय़ा प्रमाणात आला.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

विष्यंदता 

घरी गोड पदार्थ करताना साखरेचा किंवा गुळाचा पाक करायचा असला की पाकाचा चिकटपणा तपासताना, आई हाताचा अंगठा व त्याच्या शेजारच्या बोटात पाक धरते आणि त्याचा चिकटपणा तपासते. गुलाबजामुनसाठी एकतारी, लाडूसाठी दोनतारी, चिक्कीसाठी गोळीबंद अशी तिची पाकाची चाचणी घेण्याची पद्धत असते. कधीकधी पाण्याने भरलेल्या वाटीत पाकाचा थेंब टाकून ही चाचणी केली जाते. स्वयंपाकघरातील पाकाच्या या चाचण्या म्हणजेच पाकाची विष्यंदता  मोजण्याच्या घरगुती पद्धती आहेत.

द्रवपदार्थ किती प्रवाही आहे, हे त्याच्या विष्यंदतेवर अवलंबून असते. विष्यंदता व प्रवाहीपणा एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात बदलतात. म्हणजेच विष्यंदता वाढली, तर प्रवाहीपणा कमी होतो किंवा प्रवाहीपणा कमी झाला, तर विष्यंदता वाढलेली असते. विष्यंदता जितकी जास्त तितका प्रवाहीपणा कमी.

द्रवातील द्राव्याचे प्रमाण वाढवले तर विष्यंदता घटते. यालाच आपण बोलीभाषेत द्रवपदार्थ पातळ किंवा घट्ट आहे, असे म्हणतो. द्रवपदार्थ घट्ट आहे म्हणजे त्याची विष्यंदता जास्त आहे. द्रवपदार्थ पातळ आहे म्हणजे त्याची विष्यंदता कमी आहे.

एखाद्या नळीतून द्रवपदार्थ वाहत असेल तर नळीच्या आतील पृष्ठभागालगतचा द्रव कमी गतीने वाहतो, तर नळीच्या केंद्रभागी असलेला द्रव तुलनेने अधिक गतीने वाहतो. वाहताना त्याच्या रेणूंचे थर एकमेकांवर घसरत घसरत पुढे जातात. घसरताना त्या थरांमध्ये किती प्रमाणात घर्षण होते व एक थर दुसऱ्या थराच्या तुलनेत ठरावीक वेळेत किती अंतर पुढे जातो, यावर विष्यंदतेची मात्रा ठरते. द्रवाच्या रेणूंच्या थरातील हे घर्षण म्हणजेच विष्यंदता. रेणूंच्या थरातील परस्परांचे घर्षण जितके जास्त तितकी विष्यंदता जास्त.

द्रवाच्या रेणूबंधांची रचना, द्रवात द्राव्याचे प्रमाण, द्रवाचे तापमान यांसारख्या विविध घटकांवर द्रवाची विष्यंदता अवलंबून असते. बल लावल्यामुळे किंवा दाबातील फरकामुळेदेखील द्रवपदार्थ प्रवाही होतात.   साधारणपणे विष्यंदता तापमानानुसार बदलते. तापमान वाढले की विष्यंदता कमी होते. हिवाळ्यात गोठणारे तूप, खोबरेल तेल, रस्त्यावर किंवा गच्चीवर डांबर पसरविताना ते गरम करावे लागते. ही तापमान आणि विष्यंदतेचा संबंध दाखवणारी काही नेहमीच्या व्यवहारातली उदाहरणे.

– प्रा. लुम्बिनी जोशी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org