बडोद्याचे महाराज सयाजीराव तृतीय यांनी आपल्या कारकीर्दीत बडोदा राज्य वैभवसंपन्न केले, त्याचप्रमाणे आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मदाने, कारंजी, रुंद रस्ते तयार करून बडोदा शहर सुशोभित केले. त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये ‘लक्ष्मीविलास पॅलेस’ या राजवाडय़ाच्या वास्तूचा सर्वात वरचा क्रमांक लागतो.
७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेला या राजवाडय़ात राज्यकर्त्यांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना होता. सयाजीरावांनी मेजर माँट या ब्रिटिश इंजिनीअरकडून या वास्तूचा आराखडा तयार करून घेतला. १८९० साली बांधून पूर्ण झालेल्या लक्ष्मीविलास पॅलेससाठी सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा दगड आणला होता. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद बांधकाम असलेल्या या राजवाडय़ाच्या मनोऱ्याची उंची आहे २०४ फूट. राजदरबाराच्या मुख्य दिवाणखान्याचे आकारमान आहे ९४ फूट लांब, ५४ फूट रुंद व २२ फूट उंच. खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा दरबार हॉलमध्ये बसविण्यासाठी व्हेनिसचेच बारा कारागीर अठरा महिने काम करीत होते. या दरबार हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलीची याने बनविलेले संगमरवरी पुतळे असून राजघराण्यातील स्त्रियांना बसण्यासाठी हॉलच्या पहिल्या मजल्यावर गॅलऱ्या आहेत.
राजवाडय़ातील संपूर्ण फíनचर फ्रान्समध्ये तयार केलेले असून दक्षिणेकडील भागात महाराजांचे निवासस्थान आहे. विशेष म्हणजे त्या काळात तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी विजेवर चालणाऱ्या लिफ्टची सोय होती.
‘लक्ष्मीविलास’च्या परिसरात असलेल्या मोतीबाग पॅलेस आणि फतेहसिंग म्युझियम या भव्य इमारतींमध्ये शस्त्रागार आणि महान चित्रकार राजा रविवर्मा यांनी चितारलेली तलचित्रे आहेत. राजवाडय़ाभोवतीच्या परिसरात असलेली उद्याने, हिरवळीची कुरणे आणि कारंजी विल्यम गोल्डिरग या ब्रिटिश उद्यानतज्ज्ञाने तयार केली आहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
बडोद्याचा ‘लक्ष्मीविलास पॅलेस’
बडोद्याचे महाराज सयाजीराव तृतीय यांनी आपल्या कारकीर्दीत बडोदा राज्य वैभवसंपन्न केले, त्याचप्रमाणे आकर्षक भव्य इमारती, उद्याने, हिरवळीची मदाने...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2015 at 12:29 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samnstanikanchi bakhar laxmi vilas palace vadodara