सरहद गांधी, फ्रंटियर गांधी, फक्र-ए-अफगान, प्राइड ऑफ अफगान, बादशहा खान, बच्चा खान, किंग ऑफ चीफ्स् वगैरे साऱ्या आदरणीय उपाध्या लोकांनी एकाच व्यक्तीला लावलेल्या आहेत. ती व्यक्ती आहे अब्दुल गफार खान. स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष, संयुक्त भारताचे स्वप्न बाळगणारे, अब्दुल गफार खान हे एके काळी वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वाधिक प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. गांधीवादी तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या या सरहद गांधींनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यांच्याविरुद्ध निष्ठापूर्वक भाग घेऊन अिहसात्मक मार्गाने लढा दिला. अब्दुल गफार खान हे पश्तुन ऊर्फ पठाण समाजातील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्दुल यांचा जन्म पेशावरच्या जवळ उतमानझाई येथील १८९० सालचा. वडील बरामखान मोठे जमीनदार. शांत स्वभावाचे ईश्वरचिंतनात मग्न. आजोबा, पणजोबा मात्र कायम ब्रिटिश सरकारविरोधात लोकांना जागृत करून ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध काही तरी घातक कारवाया करणारे! अब्दुल यांच्या वडिलांनी मुलाच्या आणि इतर आप्तांच्या इच्छेविरुद्ध त्यांना पेशावरच्या एडवर्ड मिशन स्कूलमध्ये घातले. तिथले शिक्षण झाल्यावर पुढे अलिगढच्या संस्थेत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. समाजसेवा, देशभक्तीकडे उपजत कल असलेल्या अब्दुलनी ते केवळ वीस वर्षांचे असताना आपल्या गावातल्या मशिदीतच शाळा सुरू केली. मागासलेल्या पठाण समाजाला सुशिक्षित करणे हेच आपले जीवितकार्य ठरवून अब्दुल खाननी ब्रिटिशराज काळातला वायव्य सरहद प्रांत आणि उत्तर िहदुस्थानात शैक्षणिक सुविधा कशा आहेत याचा अभ्यास करण्यासाठी त्या प्रदेशातल्या अनेक गावागावांतून प्रवास करून पाहणी केली.

आजोबा, पणजोबांपासून चालत आलेला ब्रिटिशद्वेष अब्दुल खान यांच्यातही उपजत आलेला होताच. त्यातच त्यांच्या परिसरात राहणारे तुरांगझाईचे हाजीसाहेब या ब्रिटिशद्वेष्टा आणि स्वातंत्र्य चळवळीशी संबंध असलेल्या पठाण नेत्याशी संबंध आल्यावर अब्दुल गफार खान भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाकडे आकर्षति झाले. याच काळात अब्दुल गफार खाननी आपल्या मशिदीतल्या शाळेव्यतिरिक्त पेशावर जवळच्या गावांमध्ये दोन शाळाही सुरू केल्या.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarhad gandhi bacha khan afghan political leader
Show comments