अठराव्या शतकाच्या मध्यावर इंग्लिश वैद्यकतज्ज्ञ जोसेफ ब्लॅक याने कार्बन डायऑक्साइडचा शोध लावला. जोसेफ ब्लॅकने शोधलेली ही ‘घातक हवा’ प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असे. जोसेफ ब्लॅकचाच विद्यार्थी असणाऱ्या डॅनिएल रुदरफोर्ड याने आपल्या प्रबंधासाठी, अशाच प्रकारच्या इतर घातक हवांचा शोध घेण्याचे ठरवले. यासाठी केलेल्या प्रयोगात रुदरफोर्ड याने एका बंद चंबूत कोळसा जाळला. या ज्वलनानंतर चंबूत निर्माण झालेली ‘घातक हवा’ त्याने अल्कलीत शोषून घेऊन बाहेर काढून टाकली. मात्र त्यानंतर चंबूत मागे राहिलेली हवासुद्धा सजीवांना जगण्यासाठी घातक ठरत असल्याचे त्याला आढळले. नंतरच्या प्रयोगात त्याने बंद चंबूत कोळशाऐवजी फॉस्फरस तसेच गंधक जाळून पाहिले. या ज्वलनानंतरची चंबूतली हवा त्याने चुन्याच्या निवळीतून जाऊ दिली. कोळशाच्या ज्वलनाद्वारे निर्माण झालेली हवा ही चुन्याची निवळी पांढुरकी करते. फॉस्फरस किंवा गंधक जाळल्यानंतरची हवा मात्र चुन्याची निवळी पांढुरकी करीत नव्हती. या ज्वलनात कार्बन डायऑक्साइड निर्माण न झाल्यामुळे निवळी पांढुरकी झाली नाही. ही हवासुद्धा सजीवांसाठी घातक असल्याचे रुदरफोर्डला आढळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा