कोणत्याही गोष्टीला एक इतिहास असतो, मग ती गोष्ट विज्ञानाशी संबंधित का असेना!  एस. आय. एकक पद्धतीसुद्धा याला अपवाद नाही. दैनंदिन व्यवहारात आणि विज्ञानात आपण अनेक प्रकारचं मोजमापन करतो. हे मोजमापन करण्यासाठी दोन मूलभूत गोष्टींची गरज असते. एक म्हणजे मोजमापनाचं मूल्य किंवा किंमत आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकक. उदाहरणार्थ, दोन गावांमधलं अंतर ४० किलोमीटर आहे, असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ४० हे मूल्य असतं आणि किलोमीटर हे अंतराचं एकक असतं.

भौतिक राशी वेगवेगळ्या प्रकारच्या एककांमध्ये मोजल्या जातात. आता अंतराचंच उदाहरण घ्यायचं तर अंतर मोजण्यासाठी मिलिमीटर, सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर, इंच, फूट अशी प्रमाणित एककं आणि वीत, हात, वार अशीही एककं वापरली जातात.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
artificial intelligence to develop ability to create substances with specific qualities
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतून हव्या त्या गुणधर्मांचा पदार्थ

मोजमापनामध्ये जगभरातून एकात्मिता आणि सुसूत्रता यावी यासाठी कोणतीही भौतिक एककं ही लांबी, वस्तुमान आणि काळ अशा मूलभूत भौतिक राशींच्या एककांनी बनावीत. हा जर्मन वैज्ञानिक कार्ल फ्रेडरिक गाउस यांचा आग्रह होता. त्यांनी १८३० सालीच ही कल्पना मांडली होती.

फ्रेंच अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस या संस्थेत अ‍ॅन्तोनी लॅव्हाझिये, लॅपलास, लिजांड्रे यांसारख्या संशोधकांचा समावेश असलेल्या समितीने मेट्रिक मापन पद्धतीचा विकास केला. ३० मार्च १७९१ या दिवसापासून ही मापन पद्धती वापरण्यास सुरुवात झाली.

एस. आय. एकक पद्धती ही मेट्रिक पद्धतीचीच सुधारित आवृत्ती म्हणता येईल. एस. आय. म्हणजे ‘सिस्टीम इंटरनॅशनल’. ही पद्धती १९४८ साली सुचवण्यात आली. आणि त्यानंतर एका तपाने म्हणजे १९६० सालापासून जगभरात वापरण्यास सुरुवात झाली.

एस. आय. पद्धतीमध्ये सात भौतिक राशींची एकके मूलभूत मानली जातात. यामध्ये लांबी, वस्तुमान, काळ, तापमान, विद्युतधारा, एखाद्या पदार्थाचे मूल्य आणि प्रकाशाची तीव्रता ह्य़ा राशी मूलभूत मानल्या जातात आणि या राशींची अनुक्रमे मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्व्हिन, अ‍ॅम्पिअर, मोल आणि कॅण्डेला ही एकके मूलभूत एकके म्हणून मानली जातात. सात मूलभूत राशी आणि त्यांच्या एककांपासूनच इतर सर्व भौतिक राशी आणि त्यांची एकके मिळवली जातात.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गणदेवताकारांची खंत..

ताराशंकर बन्द्योपाध्याय यांनी १९६६ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात, भारताच्या सद्यस्थितीविषयी थोडी खंतही मुखर झाली होती. पुरस्काराचं ‘अखिल भारतीय’ स्वरूप अधोरेखित करून  ते म्हणतात :

ज्या भारतीय संस्कृतीने महाकवी वाल्मीकी, व्यास यांनी लिहिलेल्या रामायण आणि महाभारताला, महाकवी कालिदास आणि महाकवी रवींद्रनाथ यांच्या काव्याला सुरक्षित ठेवलं आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आधुनिकतम बिंदूवर तुम्ही मला आणून उभं केलं आहे.. ..  हा सन्मान समग्र रूपानं भारतीय संस्कृतीचाच सन्मान आहे.

संस्कृती एखाद्या झाडासारखी आहे. तिचा जन्म मातीच्या उदरातील अंधकारात होतो. तो तिचा प्रारंभ आहे, पण तिला जायचं दुसरीकडेच आहे. अंधारलोकात, चिखलात जन्म घेऊन, त्यातच विकसित होऊन तिचा आकाशाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. त्या वृक्षाच्या पर्णपथावरून तिचा प्रवास होत होत फुलं उमलल्यावरच तो संपूर्ण होतो. मानवी जीवनदेखील त्याप्रमाणेच एक पूर्णत्वास पोहोचण्याचा प्रवास करीत आहे. त्याचा प्रारंभ जैव जीवनाची प्रवृत्ती, कामना आणि त्याची पूर्तता यातच आहे. भावात्मक जीवनाच्या या भारतीय पद्धतीलाच मी भारतीय संस्कृती म्हणतो.

आज आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत. पारतंत्र्याची वेदना आज नाही, पण स्वातंत्र्य मिळूनही एकतेची बळकटी आज लुप्त झालेली आहे. भौगोलिक दृष्टीने देशाने आज कितीही प्रगती केलेली असली तरी आजच्या जीवनातील अखिल भारतीय एकतेचा पुष्पहार तुटून त्याची फुलं विखुरण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून राष्ट्रीय एकता राखण्यासाठी मी माझ्या मनातील विचार उच्चरवाने तुम्हाला ऐकवतो आहे.

आमच्या प्रचलित शिक्षणव्यवस्थेच्या, संस्कृती आणि समाजाच्या परिघाबाहेर अंधूक प्रकाशात जो वृद्ध, सनातन, गंभीर भारत प्रतीक्षा करतोय त्याच्याशी असलेला आपला सांस्कृतिक तसेच सामाजिक संपर्क तुटलाय. अशा परिस्थितीत समाधान तिथेच कुठे तरी आहे. जर देशात प्रेम, विश्वासाचं वातावरण तयार केलं, तर आमची संस्कृती वाचू शकेल. जर जीवनातील वास्तव आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आमच्या संस्कृतीरूपी सागराला पुन्हा भरती येईल आणि त्या दिवशी भारतात कोणत्याही भाषेत लिहिलेलं साहित्य लगेच ‘अखिल भारतीय’  समजलं जाईल.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com