इ.स. १६७९ ते १६९० या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मुंबईच्या कारभाराचा डेप्युटी गव्हर्नर आणि सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून काम केलेला सर जॉन चाइल्ड आपल्या अधिकारात स्वत निर्णय घेऊन त्याची तडकाफडकी अंमलबजावणी करण्यात वाकबगार होता. एखादे काम करायचे त्याने मनावर घेतल्यास मग त्यात न्याय-अन्याय किंवा बरे-वाईटपणा याचा तो विचार करीत नसे. धाडसी आणि मतलबी कृत्यांनी त्याने कंपनीस झालेले कर्ज फेडून मोठी किफायत करून दाखवली. कंपनीच्या वखारीतल्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार करायला सुरुवातीला असलेली परवानगी पुढे रद्द करण्यात आली. तरीही अनेक जण खासगी व्यापार करताना आढळल्यावर जॉनने त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावल्यामुळे त्याची मोठी दहशत कर्मचाऱ्यांमध्येही तयार झाली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा