मातीचा सामू म्हणजे जमिनीचे आम्ल आणि विम्ल (अल्कली) गुण निर्देशित करणारे परिमाण मूल्य. या मूल्यामुळे मातीतील हायड्रोजन आयनाच्या प्रमाणाचे निर्देशन होते. हे मूल्य एक ते १४ या अंक मोजपट्टीत दर्शविले जाते. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. सातच्या खाली असणारे िबदू आम्लता दर्शवितात, तर सातच्या वरील िबदू हे अल्कली (विम्लता) दर्शवितात. मातीच्या बाबतीत मात्र ६.५ ते ७.५ या दरम्यान असणाऱ्या सामूची जमीन उदासीन मानली जाते. मातीचा सामू ६.५ च्या खाली असेल तर जमीन आम्लीय व ७.५ च्या वर असेल तर जमीन विम्लधारी असे मानले जाते.
अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर सामूचा प्रभाव मोलाचा ठरतो. सामू ५.५ ते ८.५ च्या दरम्यान असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगला राहातो. ५.५ पेक्षा कमी सामू असल्यास जमिनीत जास्त आम्ल असते. अशावेळी जमिनीतून पिकांना कॅल्शियम, मॉलिब्डेनम, स्फुरद, गंधक व नत्राची उपलब्धता कमी राहाते. तसेच लोह, एल्युमिनीयम, मँगेनीज, तांबे व जस्त यांचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते. लोह, मँगेनीज व एल्युमिनियमचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो. स्फुरद मात्र स्थिर स्वरूपात जाऊन त्याची उपलब्धता कमी होते. सामू ८.५ पेक्षा जास्त असल्यास सोडियमचे क्षार वाढतात. जमिनीतून पाण्याचा निचरा बरोबर नसेल, तर अशावेळी जमिनी चोपण होतात. म्हणजेच पिक लागवडीस अयोग्य ठरतात. अशा जमिनीत लोह, जस्त, तांबे, मॅंगेनीज यांची उपलब्धता कमी होते. बोरॉनचे प्रमाण वाढते व ते पिकास हानीकारक ठरू शकते. अशा जमिनीचा सामू कमी करण्यासाठी प्रथम निचरा सुधारावा लागतो. त्यामुळे क्षार कमी होतात. तसेच जिप्सम, सेंद्रिय खत, गंधक इत्यादींचा वापर करून जमिनीची सुधारणा होऊ शकते. ज्या जमिनीचा सामू आम्लता दर्शवितो, अशा जमिनीस मात्र चुनखडी देऊन आम्लता कमी करता येते. त्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा सामू किती आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे आणि तो आवाक्यात ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणेही आवश्यक आह
– डॉ. विठ्ठल चापके
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा