सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे खाद्य म्हणून होतो.
शहरातले अनेक जण सोयाबडी (सोया नगेट) या उत्पादनालाच सोयाबीन समजतात. सोयाबीनपासून दुधाला पर्याय असे दूध बनवता येते. हे दूध गार किंवा गरम पिता येते. कॉफी, चॉकलेटसाठीही ते अप्रतिम आहे. त्यापासून ताक, दही, लस्सी, योगर्ट, मिल्कशेक, आइस्क्रिम बनवता येते.
सोया दुधापासून बनवलेल्या पनीरला ‘टोफू’ म्हणतात. चायनीज खाद्यात टोफूचा वापर सर्रास केलेला असतो. पनीर घालून केलेले सर्व पदार्थ टोफू वापरून करता येतात. मांसाहारी पदार्थामध्ये टोफू वापरून त्यांना शाकाहारी पर्याय देता येतो. दिल्लीमधली ‘वाह जी वाह’ ही अन्न साखळी टोफूचे विविध पदार्थ पुरवते.
सोयाबीनपासून दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने (उदा. ब्रेड, बिस्किटे) व डाळीचे पदार्थ (उदा. नमकीन) बनवता येते. एवढेच नव्हे, तर आपल्या आहारातले बहुतेक पदार्थ सोया वापरून बनवता येतात. हल्ली अनेक महिला गव्हाचे दळण देताना त्यात तीस टक्के सोयाबीन मिसळतात. सोयाबीनपासून कॉफी, फुटाणे, चकली, शेव, चटणी असे अनेक पदार्थ बनवता येतात.
बचतगटांनी लोणची, पापड या पदार्थाच्या व्यवसायातून बाहेर पडून काही वेगळ्या उत्पादनांचा व्यवसाय करावा, असे वेळोवेळी सुचवले जाते. याबाबतीत त्यांनी सोयाबीनच्या उत्पादनांचा विचार जरूर करावा. आहारतज्ज्ञ मधुमेही, कॅन्सरचे रुग्ण किंबहुना सर्वच कुपोषितांना आहारात सोयाबीनचा समावेश करायला सांगतात. मात्र आहारात समावेश करण्यापूर्वी सोयाबीनवर काही विशेष प्रक्रिया कराव्या लागतात. त्या आपणास माहीत नसतात. त्या माहीत करून घेतल्या पाहिजेत. मग सोयाबीनवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात फार मोठी संधी आहे.
कुतूहल – सोयाबीनचे खाणार..
सोयाबीन हे डाळवर्गीय पीक मूळचे चीन देशातले. चिनी लोक आपल्या रोजच्या आहारात सोयाबीनचा समावेश करतात. महाराष्ट्रात सोयाबीनचे पीक लाखो शेतकरी घेतात. हे पीक दलालांमार्फत तेलगिरण्यांना जाते. तेथे त्यापासून खाद्यतेल व पेंड मिळते. पेंडीचा उपयोग कोंबडय़ांचे खाद्य म्हणून होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-07-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soybean eater