बाष्प, डिझेल आणि विद्युत या तीन प्रकारच्या रेल्वेइंजिनांचा वापर प्रवासी आणि मालगाडी गाडी ओढण्यासाठी भारतात झालेला आढळतो. बाष्प इंजिनांचा वापर जवळपास संपला असून आता ८५% माल आणि प्रवासी वाहतूक विद्युत इंजिनांच्या गाडीने केली जाते. भारतातील इंजिनांची खानेसुमारी तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे.
काही इंजिनांना ‘अजित’, ‘गजराज’, ‘सम्राट’ अशी नावे दिली असली, तरी विविध इंजिनांच्या मालिकांसाठी तीन अक्षरांनी सुरुवात होणारी संज्ञा भारतीय रेल्वे आता वापरते आणि त्यापुढे मालिका क्रमांक असतो. पहिले अक्षर गेज, दुसरे अक्षर उर्जास्रोत आणि तिसरे अक्षर कार्य दाखवतात. प्रत्येक इंजिनाचा विशिष्ट ओळख क्रमांक वेगळा दिला असतो. इंजिनांवरील ओळखपाटीत दर्शवलेली त्यासाठीची इंग्रजीमधील निर्धारित अक्षरे :
– ब्रॉड गेजसाठी ह, मीटर गेजसाठी , आणि नॅरो गेजसाठी
– डिझेलसाठी ऊ, डायरेक्ट विद्युत प्रवाहासाठी उ, अल्टरनेट विद्युत प्रवाहासाठी अ आणि मिश्र विद्युत प्रवाहासाठी उअ
– मालगाडीसाठी प्रवासी गाडीसाठी ढ, संमिश्र वापरासाठी ट, शंटिंगसाठी र, आणि विद्युत उपनगरीय गाडीसाठी व.
उदाहरणार्थ, ऊॅ 1 म्हणजे पहिल्या मालिकेतील, मीटर गेजसाठी डिझेलचे मालगाडी ओढणारे इंजिन. तर हअढ 5 म्हणजे पाचव्या मालिकेतील ब्रॉड गेजसाठी अल्टरनेट विद्युत प्रवाहावरचे प्रवासीगाडी ओढणारे इंजिन.
हल्ली भारतातील ब्रॉड गेजवरील प्रवासी गाडी ओढणाऱ्या निवडक इंजिनांची कार्यक्षमता तक्ता क्र. २ मध्ये दिली आहे. मात्र सध्या १५० किमी/तास ही वेगमर्यादा भारतीय रेल्वे मंडळाने ठरवलेली आहे. सध्या भारतात मालगाडीसाठी सर्वोच्च शक्तीचे वापरात असलेले विद्युत इंजिन ६,३५० अश्वशक्तीचे आहे (हअॅ 9 मालिकेतील).
इंजिनाची प्रत्यक्षात मिळणारी शक्ती त्याच्या सक्रिय वाहक चाकांच्या जोडय़ा, त्यांच्यावर पडणारे वजन आणि लोहमार्गाचे घर्षण यांच्यावर अवलंबून असते. वजनाची आणि वेगाची मर्यादा हे मार्गाची चढण आणि वक्रता लक्षात घेऊन गणित सूत्रांनी ठरवले जाते.
– डॉ. विवेक पाटकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वेगळं आयुष्य जगणाऱ्या अमृताजी
चार वर्षांची असताना अमृताचा साखरपुडा आणि सोळा-सतरा वर्षांची असताना प्रीतमसिंग यांच्याशी विवाह झाला. पती-पत्नी दोघांचीही व्यक्तिमत्त्वं अगदी वेगळी. मनं कधी जुळलीच नाहीत आणि अखेर कुठलीही तक्रार न करता कायद्याचा आधार न घेता, दोघांनी दूर व्हायचं ठरवलं. दोन्ही मुलांच्या अडीअडचणीच्या वेळी ते एकमेकांशी मदत घ्यायचे. असे हे वैवाहिक जीवन. वडिलांच्या मृत्यूनंतर तर त्या अधिकच एकटय़ा पडल्या. खूप काही जगावेगळ्या अपेक्षा आयुष्याकडून त्यांच्या नव्हत्या, पण बालपणापासूनच कुठलीही गोष्ट सहज, सरळमार्गी होऊ नये हे अमृताजींचं प्राक्तन होतं.
साहीर लुधियानवी या कवींवर मन:पूत प्रेम करणाऱ्या अमृताजींना हेही प्रेम लाभलं नाही. न विसरता येणारं हे दु:ख उघडपणे त्यांनी आयुष्यभर कुरवाळलं, नंतर पुढे शेवटपर्यंत त्या प्रसिद्ध चित्रकार इमरोजसह राहिल्या. मळलेल्या रूढ वाटेने न जाता, असं वेगळं आयुष्य जगणाऱ्या अमृताजींना भरपूर किंमत यासाठी मोजावी लागली. प्रामाणिकपणा, हिंमत, बोलण्यातील स्पष्टपणा या बळावरच हे आगळं आयुष्य त्या शेवटपर्यंत जगल्या. ही जगण्याची मोकळीक त्यांनी स्वत:च घेतली. इमरोजला लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात, आज १५ ऑगस्ट. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन.. जर कोणी माणूस, कुठल्या दिवसाचं चिन्ह बनू शकत असेल तर तू माझा १५ ऑगस्ट आहेस.. माझ्या अस्तित्वाच्या आणि माझ्या मनाच्या अवस्थेचा स्वातंत्र्य दिवस!..
वयाच्या सोळाव्या वर्षांपासून अमृताजी कविता लिहू लागल्या. १९४७ मध्ये फाळणी झाली आणि लाहोरहून त्या निर्वासित म्हणून निर्धन अवस्थेत भारतात आल्या. प्रथम डेहराडूनला नंतर दिल्लीत आल्या. आल्या आल्या त्या दिल्ली नभोवाणीवर उर्दू कार्यक्रमाच्या निवेदक म्हणून काम करू लागल्या. अशा या सगळ्या परिस्थितीत त्यांना दिलासा होता तो कवितेचा. बागकाम, नृत्य, सतारवादनाची त्यांना आवड होती. अमृताजींना ज्योतिषाचाही नाद होता. ओशो, रजनीश आणि जे. कृष्णमूर्तीच्या अपारंपरिक विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com