डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टीन एजमध्ये प्रेमात पडणं – आपटणं असतं. अतिशय उत्साह, आनंद, मज्जा हे सगळं असतं. तसंच टोकाचा राग, संताप, आदळ आपट, मत्सर, ईष्र्या या भावना असतात. आणि तिसरीकडे नराश्यही असतं. मुलं या भावनांवर झुलत असतात. सगळ्याच भावना टोकाच्या. कधी मुलांचा राग बघून, तर कधी त्यांची टाइमपास करण्याची ‘विशेष क्षमता’ बघून, अजिबातच गांभीर्य नाही हे बघून पालक चिंतेत पडतात. तोपर्यंत हे मूल कोणत्या तरी विषयामुळे आयुष्याचा गांभीर्याने विचार करायला लागलेलं असतं. पण हे देखील टिकत नाहीच!
एरवी मेंदूच्या प्रत्येक भागाला विशिष्ट कामं नेमून दिलेली असतात. त्याप्रमाणे प्रत्येक अवयव आपलं काम चोख करतो. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करत नाही. दुसऱ्याने जे निर्णय घ्यायचे असतात, ते स्वत:च घेऊन मोकळं होत नाही. पण इथे टीन एजर्स आणि प्रौढ मेंदूची तुलना केली तर मात्र हे घडून येतं.
हे समजलं ते एका प्रयोगातून. अमेरिकेतल्या मॅक्लीन हॉस्पिटलमध्ये न्यूरोसायकोलॉजी आणि कॉग्निटिव्ह न्यूरो इमेजिंगचे डायरेक्टर डेबोरा युग्ल्रेम – टॉड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक संशोधन केलं. टीन एजर्स जे काही निर्णय घेतात, त्यात भावनांची भूमिका कशी असते, हे त्यांना पडताळून बघायचं होतं. या प्रयोगासाठी दहा ते १६ या वयोगटातले काही जण निवडले. आणि काही प्रौढ व्यक्ती निवडल्या. अतिशय गुंतागुंतीच्या भावना दर्शवणारे काही क्लोज-अप फोटो त्यांना दाखवले. यातल्या प्रत्येकाला हे फोटो दाखवले आणि या व्यक्तींच्या चेहऱ्यावरच्या भावना ओळखायला सांगितल्या.
जेव्हा या व्यक्ती उत्तरं देत होत्या, तेव्हा त्यांच्या मेंदूंचं एफएमआरआय पद्धतीने स्कॅनिंग केलं. या स्कॅनिंगमध्ये शास्त्रज्ञांना असं दिसलं की टीन एजर्स निर्णय घेत असतात तेव्हा अमिग्डाला हे केंद्र उद्दीपित होत असतं. तर प्रौढ व्यक्ती निर्णय घेत असते, तेव्हा प्री फ्रंटलचा वापर होत असतो. अमिग्डाला हे भावनांचं केंद्र आहे. तर प्री फ्रंटल कॉर्टेक्स हे अनेक संबंधित गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्याचं केंद्र आहे. दोघांच्या निर्णयात यामुळे फरक पडतो.