‘वार’ म्हणजे गाय/म्हशीच्या गर्भाशयातील वासराच्या किंवा रेडकाच्या संरक्षणासाठी आणि त्याला आहार पुरवण्यासाठी गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव. ही वार (जार) पातळ, चिकट, ताकदवान व पारदर्शक स्नायूंनी बनलेली असते. यामध्ये तीन आवरणे असतात. १२० ते १३४ मांसल गोळ्यांनी ही आवरणे गर्भाशयाला चिकटलेली असतात.
गाय/म्हैस व्यायल्यानंतर वार तीन ते चार तासांत संपूर्णपणे बाहेर पडणे आवश्यक असते. आठ ते नऊ तासांत वार पडली नाही, तर पुढच्या एक-दोन तासांतच (म्हणजे व्यायल्यापासून १० ते ११ तासांतच) निष्णांत पशुवैद्यकाकडून ती काढून घ्यावी लागते. वार हाताने काढल्यास, पोटातून वा इंजेक्शनद्वारे किमान तीन दिवस गर्भाशयातसुद्धा औषधपाणी करणे गरजेचे असते.
वार आपसूक पडल्यास गर्भाशयात गोळ्या बसवून घेणे योग्य नसते. त्याने गर्भाशयाच्या आंतरपडद्याला इजा होते. गायीचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते.
वार न पडता लोंबत असेल, तर कावळा, उंदीर, कुत्रा, मांजर हे प्राणी ती ओढणार नाहीत, याची खबरदारी घेणे महत्त्वाचे असते. लोंबणारी वार पडण्यासाठी तिला कोणतीही जड वस्तू बांधणे अयोग्य आहे. वार अडकू नये म्हणून, गाय विण्यापूर्वी ४५ दिवस तिची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. वारेची योग्य काळजी घेतल्यास, गाय/म्हैस पुढे नियमितपणे माजावर येते व गाभण राहते. या क्रिया त्रासदायक होत नाहीत.
विण्याच्या वेळी गाय/म्हैस अशक्त असेल, त्या निरोगी नसतील, त्यांच्यात कॅल्शियम, िझक, फॉस्फरस या खनिजांची कमतरता असेल तर त्यांच्या गर्भाशयाची हालचाल (आकुंचन/ प्रसरण) कमी प्रमाणात होते व त्यामुळे त्यांच्या गर्भाशयाचे स्नायू जास्त ताणले जातात व विताना त्यांना त्रास होतो. वासरू/ रेडकू बाहेर काढण्यासाठी त्यांच्या गर्भाशयात हात घातला असेल, काही संसर्गजन्य आजारामुळे वार चिकटून बसली असेल, गर्भपात झाला असेल, कासदाह झाला असेल किंवा विण्यापूर्वी अस्वच्छता असेल, तर व्यायल्यानंतर वार अडकू शकते.
कुतूहल – गाय/म्हशीतील वार (जार)
‘वार’ म्हणजे गाय/म्हशीच्या गर्भाशयातील वासराच्या किंवा रेडकाच्या संरक्षणासाठी आणि त्याला आहार पुरवण्यासाठी गर्भाशयात तयार होणारा एक तात्पुरता अवयव. ही वार (जार) पातळ, चिकट, ताकदवान व पारदर्शक स्नायूंनी बनलेली असते. यामध्ये तीन आवरणे असतात. १२० ते १३४ मांसल गोळ्यांनी ही आवरणे गर्भाशयाला चिकटलेली असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Temporary component in cow and female buffalo