टेनसीन हे आवर्तसारणीतील शेवटून दूसरे मूलद्रव्य! असे असले तरी, या ११७ अणुक्रमांक असलेल्या टेनसीनचा शोध मात्र सर्वात शेवटी म्हणजे २०१० साली लागला. या प्रयोगासाठी लागणारे बर्केलिअम-९७ हे मूलद्रव्य अमेरिकेच्या टेनेसी राज्यात असलेल्या ओक रीज नॅशनल प्रयोगशाळेने तयार केले. याशिवाय टेनेसीमधील व्हँडरबिल्ट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा देखील या प्रयोगात महत्त्वाचा वाटा होता. यामुळे टेनेसी राज्याच्या नावावरून २०१६ मध्ये या मूलद्रव्याचे टेनसीन असे नामकरण करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रशियाच्या जे.आय.एन.आर. या प्रयोगशाळेत २००० ते २००४ या वर्षांत अणुक्रमांक ११३ ते ११६ आणि ११८ ही मूलद्रव्ये तयार झाली होती. ११७ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य तयार करण्यासाठी बर्केलिअमची गरज होती. २००४ साली ‘जे.आय.एन.आर.’ने ओक रीज प्रयोगशाळेकडे बर्केलिअमसाठी विचारणा केली. परंतु या वेळेस ओक रीज प्रयोगशाळेत कॅलिफोर्निअम आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या बर्केलिअमचे उत्पादन पूर्णपणे थांबवले होते. एका प्रयोगाला लागणारे बर्केलिअम बनविण्यासाठी ३.५ दशलक्ष डॉलर एवढा खर्च अपेक्षित होता. यामुळे दोन्हीकडील शास्त्रज्ञांचे गट ओक रीजमधील कॅलिफोर्निअमचे उत्पादन सुरू होण्याची वाट पाहात थांबले.

२००८च्या मार्चनंतर ओक रीजने कॅलिफोर्निअमचे उत्पादन पुन्हा सुरू केले. त्याच वर्षी अमेरिकेच्या अणुऊर्जा विभागाकडून प्रयोगासाठी बर्केलिअम वापरण्याची परवानगी मिळाल्यावर कॅलिफोर्निअमपासून बर्केलिअम वेगळे करायच्या कामास सुरुवात झाली. २५० दिवसांनंतर २२ मिलिग्रॅम इतके बर्केलिअम तयार झाले. पुढच्या ९० दिवसांत त्याचे शुद्धीकरण करून ते रशियात पाठविण्यास योग्य स्थितीत आणले. बर्केलिअमचा अर्धायुष्यकाल ३३० दिवसांचा असल्याने ते लगेच रशियाला पोहोचणे आवश्यक होते, परंतु विमानाने पाठविलेल्या बर्केलिअमला योग्य कागदपत्र नसल्याने रशियाच्या कस्टम्सने मॉस्कोमध्ये उतरवून घेण्यास दोनदा नकार दिला. एका आठवडय़ाच्या कालावधीत त्या बर्केलिअमने अटलांटिक महासागर पाचवेळा ओलांडला. सरकारी लाल फितीचा कारभार सर्वत्र सारखाच!

शेवटी रशियात पोहोचल्यावर जून २००९ मध्ये प्रयोगाला सुरुवात झाली आणि जानेवारी २०१० मध्ये शास्त्रज्ञांना टेनसीनचे अस्तित्व आढळले. २९३ आणि २९४ अणुभाराची दोन समस्थानिके आढळली असून त्यांचा अर्धायुष्यकाल फक्त १८ मिलिसेकंद इतकाच आहे. क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन यांच्या गटात असला तरी टेनसीन हा सामान्य तापमानाला बाष्पनशील (volatile) धातुरूपात असावा असा शास्त्रीय अंदाज आहे.

योगेश सोमण

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org