पॉलिस्टर तंतूच्या नावावरूनच त्याची रासायनिक रचना समजते. ईस्टर हे संयुग सेंद्रिय आम्ल व अल्कोहोल यांच्या रासायनिक क्रियेमधून तयार होते. अशा ईस्टर संयुगाचे बहुवारिकीकरण केले असता पॉलिस्टर हे बहुवारिक मिळते. आणि अशा बहुवारिकापासून पॉलिस्टर तंतूची निर्मिती होते. परंतु ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कोणतेही सेंद्रिय आम्ल व अल्कोहोल घेऊन पॉलिस्टर तंतू करता येत नाही. त्यासाठी एक विशिष्ट आम्ल आणि एक विशिष्ट अल्कोहोल लागते. आणि त्यांचाच शोध लावायला संशोधकांना १० वर्षांपेक्षा अधिक काळ संशोधन करावे लागले. खरे तर नायलॉन तंतू विकसित करणाऱ्या कॅरोथर्स आणि त्याच्या सहकारी संशोधकांनी सुरुवातीला पॉलिस्टर बहुवारिकांवरच लक्ष केंद्रित केले होते. कॅरोथर्सच्या हे लक्षात आले होते की सेंद्रिय आम्ल (कारबॉक्सिल आम्ल) व अल्कोहोल यांच्या रासायनिक प्रक्रियेने तयार होणाऱ्या ईस्टर या संयुगाचे बहुवारिकीकरण करून त्यापासून तंतू तयार केला जाऊ शकतो. परंतु ज्यापासून चांगल्या प्रतीचा तंतू बनविता येईल असे पॉलिस्टर बहुवारिक शोधून काढण्यात त्यांना यश आले नाही म्हणून त्यांनी पॉलिस्टर तंतूवरील संशोधन थांबविले आणि पॉलीअमाइड बहुवारिकांवर लक्ष केंद्रित केले आणि नायलॉन तंतू विकसित केला. इंग्लंडमधील इम्पिरियल केमिकल कंपनीमध्ये (आय.सी.आय.) काम करणाऱ्या संशोधकांच्या समूहाने, ज्यामध्ये जे. आर. व्हिनफील्ड, जे. टी. डिकसन, डब्ल्यू. के. ब्रिटव्हीस्टल आणि सी. जी. रिट्ची यांचा समावेश होता, १९३९ पासून कॅरोथर्सचे पॉलिस्टरवरील संशोधनाचे काम पुढे चालू केले आणि १९४१ मध्ये पहिला पॉलिस्टर तंतू बनविला. या तंतूचे त्यांनी ‘टेरिलीन’ असे नाव ठेवले. डय़ू. पॉन्ट कंपनीने आय.सी.आय. या कंपनीकडून पॉलिस्टरच्या संशोधनाचे सर्व हक्क विकत घेतले आणि संशोधन पुढे चालू ठेवले. डय़ू पॉन्ट कंपनीने १९४६ मध्ये नवीन पॉलिस्टर तंतू बनविला आणि त्याचे नाव डॅक्रॉन असे ठेवले. टेरिलीन, डेक्रॉन, टेरीन इत्यादी. ही सर्व उत्पादक
चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल – पॉलिस्टर तंतू निर्मिती
पॉलिस्टर तंतूच्या नावावरूनच त्याची रासायनिक रचना समजते. ईस्टर हे संयुग सेंद्रिय आम्ल व अल्कोहोल यांच्या रासायनिक क्रियेमधून तयार होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-04-2015 at 01:01 IST
TOPICSपॉलिस्टर
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The formation of polyester fibers