सामान्य कृत्रिम बुद्धिमत्ता उत्तर काढून थांबते, पण पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता (एक्सप्लनेबल आर्टीफिशिअल इंटीलिजन्स – एक्सएआय) त्याच्या पुढे जाऊन ते उत्तर कसे प्राप्त झाले याची प्रक्रिया सादर करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी सोबतच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन अतिरिक्त भाग असतात. एक भाग आपल्या कृतीचे किंवा निर्णय प्रक्रियेचे आंतरिक स्पष्टीकरण तयार करणे असा असतो. दुसरा भाग स्पष्टीकरण वापरकर्त्याला समजेल अशा स्वरूपात देणे असा असतो.

आंतरिक स्पष्टीकरण तयार करण्यासाठी चार प्रमुख प्रक्रिया केल्या जातात. माहितीची वैशिष्ट्ये शोधणे, विश्लेषण करणारी प्रारूपे निर्माण करणे, अनुरूप उदाहरणे तयार करणे आणि या सर्व प्रक्रियेला दृश्य रूपांतरीत करणे, या त्या चार प्रक्रिया होत.

Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल

वापरकर्त्याशी संवाद साधून स्पष्टीकरण देणाऱ्या भागात तीन प्रक्रिया हाती घेतल्या जातात. त्या आहेत : आपल्या प्रक्रियेची वैशिष्ट्ये सांगणे, विश्लेषण करण्यासाठी वापरलेल्या प्रारूपांची माहिती देणे आणि उदाहरणे देऊन आपल्या उत्तराची फोड करणे. हा संपूर्ण भाग सर्वात कठीण आहे. संवादात वापरकर्ता काय विचारेल आणि त्याचे समाधान करणारे उत्तर फार वेळ न घेता देणे याचे नियोजन अपेक्षित असते, जे अनिश्चिततेने भरलेले असते. त्यासाठी सखोल प्रशिक्षण यंत्राला देणे आणि अनुभवातून त्याला ते विकसित करता येईल अशी व्यवस्था करावी लागते. पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणालीला आपली विश्वासाहर्ता स्थापन करावी लागते.

हेही वाचा >>> कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेतील कळीची आव्हाने

या संदर्भात व्यावसायिक वापरकर्ता, सामान्य रस असलेला वापरकर्ता आणि तज्ज्ञ वापरकर्ता असे वापरकर्त्यांचे तीन गट केले जातात. तज्ज्ञ वापरकर्त्यांचे प्रणाली तपासणीस (ऑडिटर), तज्ज्ञ सल्लागार, आणि वकिली पेशातील व्यक्ती, असे तीन उपगट केले जातात. या प्रत्येक गटाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. तरी, या सर्वांना पाहिजे त्या रूपात आणि अपेक्षित वैधता असलेले स्पष्टीकरण देणे आवश्यक असते. न्यायालयीन कामात पुरावा म्हणून प्रणालीचा सल्ला वापरायचा असल्यास पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीला अतिशय काळजी बाळगावी लागते. या संदर्भात प्रणालीचा पारदर्शीपणा आखण्यास मार्गदर्शन करणारे ‘‘ IEEE P7001ll हे प्रमाण (स्टँडर्ड) अलीकडेच अस्तित्वात आले आहे.

माहितीचा अधिकार आता नागरिकांना मिळाला आहे, तसाच ‘स्पष्टीकरणाचा अधिकार’ मिळावा ही भविष्यातील मागणी असेल जेव्हा अनेक निर्णय आणि कृती यंत्राकडून केल्या जातील. पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता त्या दिशेचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

डॉ विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ई-मेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader