मुंबईत राणीच्या बागेतील वनस्पती उद्यानामध्ये ८५३ प्रजातींची अमाप वनसंपदा आहे. काल-आज-उद्या असे मजेशीर नाव असलेल्या झुडपावर तीन दिवसांमध्ये तीन रंग बदलणारी फुले उमलतात. येथील जांभळ्या फुलांच्या लसूण वेलीची पाने चुरल्यावर लसणाचा वास येतो. वॉकिंग आयरिस नावाची ‘चालणारी’ वनस्पती इथे आहे.

‘वीर जिजामाता उद्यान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणीच्या बागेत १५५ वृक्ष-प्रजाती विदेशी आहेत. ब्रह्मदेशातील प्राइड ऑफ बर्मा या जगातील सर्वात सुंदर फुले अशी उपाधी मिरवणारा उर्वशी वृक्ष राणीच्या बागेत आहे. याशिवाय ८०६ सें.मी. इतका अवाढव्य बुंधा असलेला, दीर्घायुषी आफ्रिकन बाओबाब; कर्करोग व एड्स या रोगांवर मात करता येईल, असे गुणधर्म असलेला एकुलता एक ऑस्ट्रेलियन चेस्टनट वृक्ष; मुंबईत इतरत्र कुठेही न आढळणारा मादागास्करचा गम कोपाल वृक्ष ज्याच्या मुळापासून धूप मिळतो; बोट खुपसता येईल इतकी नरम साल असलेला, ११६ वष्रे जुना ऑस्ट्रेलियन वंशाचा काजुपुट; अशी अजून किती तरी विदेशी वृक्षांची उदाहरणे देता येतील.

51 Shakti Peethas
देवीची ५१ शक्तिपीठे कोणती आणि ती कशी निर्माण झाली? भारतासह ‘या’ देशांमध्येही आहेत शक्तिपीठांची स्थाने
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
‘Forest Bathing’ म्हणजे काय? कॅन्सरवर मात करण्यासाठी राजकुमारी केट याचा उपयोग कसा करत आहे?
uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
Loksatta kutuhal Black rock caves
कुतूहल: काळ्या कातळातील लेणी

वीर जिजामाता उद्यानात १३१ देशी वृक्षांच्या प्रजाती आहेत. उदा. कृष्णवडाच्या द्रोणासारख्या पानांचा उपयोग करून बाळकृष्ण गौळणींच्या मडक्यांमधील दही-ताक मटकावत असे अशी दंतकथा आहे. खरं तर पानांमध्ये असाधारण बदल झालेला हा आपला सुपरिचित वडच आहे. उद्यानातील मुंबई सुगरण हा वृक्ष फक्त मुंबईतच, तोदेखील वीर जिजामाता उद्यानात आढळतो. मुंबईमध्ये फारशा न आढळणाऱ्या मरोडफली वृक्षाचे लाकूड वाळवीरोधक आहे.

या शिवाय मुंबईत दुर्मीळ असलेला औषधी अंकोल; महाराष्ट्राचा राज्यवृक्ष तामण; उंचच उंच करवटी; उत्तम प्रतीची मिर्झापूर लाख व मकेसर तेल देणारा कुसुम; पांढरा साग अशी उपाधी मिरवणारा, दशमुळातील एक असलेला शिवण, हत्ती व गेंडे यांना ज्याची फळे प्रिय आहेत असा काझीरंगाच्या जंगलात आढळणारा मोठा करमळ, अर्जुनारिष्ट या हृदयरोगावरील औषधामुळे ख्यातनाम असलेला, पांढऱ्या सालीचा अर्जुन, अशा अनेक वैशिष्टय़पूर्ण देशी वृक्षांची राणीच्या बागेत दाटी आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले हे वनस्पती उद्यान तेथील रुंद पदपथांच्या जाळ्यामुळे तिथे दररोज भेट देणाऱ्या जवळपास ८००० पर्यटकांची गर्दी सहज सामावून घेते. त्यामुळेच जिजामाता उद्यान हे सर्व थरांतील मुंबईकरांसाठी नेहमीच विसाव्याचे स्थान राहिले आहे.

शुभदा निखार्गे

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

केमाल पाशाच अतातुर्कका?

‘अतातुर्क’ म्हणजे तुर्की राष्ट्रपिता असा आदराचा किताब तुर्की जनतेने दिलेले गाजी मुस्तफा पाशा हे तुर्कस्तानच्या प्रजासत्ताकाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष. इस्लामी कायदे कालबा’ा ठरवून धर्मनिरपेक्ष राज्यप्रशासन आणणारे, स्त्रियांच्या विकासासाठी कठोर कायदे करणारे प्रशासक अशीही मुस्तफा पाशांची ओळख आहे. शाळेत असताना मुस्तफाची गणितातही कमालीची गती आणि बुद्धीमत्ता पाहून त्याच्या शिक्षकांनी त्याचे टोपणनाव ‘कमाल’ ठेवले. पुढे कमाल पाशा, केमाल पाशा झाला.

प्राथमिक शिक्षण सनिकी शाळेत झाल्यावर मुस्तफा केमालने इस्तंबूल येथील वॉर अकॅडमीत उच्च लष्करी शिक्षण घेतल्यावर ते ओटोमन लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्या काळात त्यांचा संबंध वतन या क्रांतीकारी संघटनेशी आला. पुढे केमालचा संबंध अन्वरपाशा, तलतपाशा आणि जमालपाशा या ‘यंग टर्कस’ या संघटनेच्या नेत्यांशी येऊन ते कमिटी ऑफ युनियन अँड प्रोग्रेस या राजकीय गटात सामील झाले. या गटाने सुरू केलेल्या चळवळीमुळे सुलतान अब्दुल हमीदने इस्तंबूल आणि बाकी तुर्कस्तानात १९०८ साली संविधानात्मक शासनाची मागणी मान्य केली. अन्वर पाशा याच्या नेतृत्वाखाली इस्तंबूल मध्ये संविधानात्मक सरकार आले पण केमाल पाशा लष्करी अधिकारी म्हणूनच राहिले. केमाल आणि अन्वरमध्ये वैचारिक मतभेद होते. अन्वरला तुर्कस्तानात कट्टर इस्लामी राज्यव्यवस्था आणायची होती आणि त्यासाठी लष्करालाही त्यात सहभागी करायचे होते. त्यासाठी त्याने लष्कराचे आधुनिकीकरण व संघटनाचे काम जर्मन लष्करी अधिकाऱ्याकडे सोपविले. पहिल्या महायुद्धात ओटोमन सरकार जर्मनी, आस्ट्रीया युतीबरोबर होते. या युद्धात सपाटून मार खाल्यावर अन्वर पाशाच्या सरकारने राजीनामा दिल्यावर ऑक्टोबर १ रोजी केमालपाशांनी इस्तंबूल येथे तुर्की प्रजासत्ताक स्थापन केले आणि त्याची राजधानी अंकारा येथे नेली. १९२३ ते १९३८ या काळात केमाल पाशा या प्रजासत्ताकाचे अध्यक्ष होते. तुर्की जनतेत त्यांनी आमूलाग्र सामाजिक सुधारणा करून आरोग्य, शिक्षण, शेती आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या. नोव्हेंबर १९३८ मध्ये केमाल पाशांचा इस्तंबूल येथे मृत्यू झाला. आता इस्तंबूल विमानतळासही ‘अतातुर्क एअरपोर्ट’ असे नाव आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader