विकसनशील देशातल्या जनतेच्या आहारात प्रथिनांची कमतरता असते. हिरव्या पानांमध्ये त्यांच्या शुष्कभाराच्या २५ ते ४० टक्के प्रथिने असतात, ती पाण्यात पूर्णपणे विरघळतात आणि त्यांची पाच्यता बियांमधील प्रथिनांपेक्षा अधिक असते. पानांमधील प्रथिने शुद्ध करून त्यांपासून मानवी अन्न तयार करता येते हे प्रथम इंग्लंडमधील काही संशोधकांनी दाखवून दिले आणि पुढे १९७० च्या दशकात भारतातही या विषयावर बरेच काम करण्यात आले. आपल्या शेतीतून आपण जेव्हा फळे, धान्ये किंवा कंदांचे उत्पन्न घेतो, त्या वेळी त्या वनस्पतींची पाने वायाच जातात. त्यामुळे केळी, हळद, टॅपिओका, कोबीवर्गीय भाज्या, गाजर, मुळा, गवार, भेंडी आदी पिकांच्या पानांपासून आणि त्याचप्रमाणे विविध चारापिकांच्या पानांमधूनही प्रथिने मिळविण्याचे प्रयत्न झाले.
जर पानांचा रस काढून तो चुलीवर तापवला तर दूध फाटण्यासारखी प्रक्रिया होऊन या रसातल्या प्रथिनांचा साका पाण्यापासून वेगळा होतो. असा रस फडक्यातून गाळल्यास दह्यातल्या चक्क्याप्रमाणे हा प्रथिनांचा साका वेगळा काढता येतो. पानांपासून प्रथिने मिळविण्याची ही पद्धती इतकी सोपी आणि स्वस्त होती की वर दिल्याप्रमाणे वाया जाणाऱ्या पानांपासून प्रथिने काढण्याचा व्यवसाय ग्रामीण पातळीवर कुटिरोद्योगाच्या रूपाने सुरू करता येईल असा प्रचारही त्या वेळी करण्यात आला होता, पण आहारशास्त्रज्ञांनी मात्र ही प्रथिने नाकारली. याचे कारण असे होते की आपल्या पानांचे वनस्पतिभक्षकांपासून आणि बुरशीजन्य रोगांपासून रक्षण करण्यासाठी सर्व वनस्पतींच्या पानांमध्ये टॅनिन वर्गातील रसायने सामावलेली असतात. वर दिलेल्या सोप्या पद्धतीने पानांमधून प्रथिने काढल्यास त्यांची या टॅनिनवर्गीय पदार्थाबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन त्यांपासून मानवाला पचविता येणार नाहीत अशी संयुगे बनतात आणि त्यामुळे ती प्रथिने खाण्यास अपात्र ठरतात.
ही पोषणविरोधी टॅनिनद्रव्ये वगळून शुद्ध स्वरूपात प्रथिने काढता येतात, पण अशा प्रक्रियेचा खर्च फार असल्याने या शुद्ध प्रथिनांची किंमत फारच वाढते. त्यामानाने सोयाबिनच्या पेंडीतले प्रथिन स्वस्त पडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई२२  ऋऋ्रूी@ें५्रस्र्ंे४ेुं्र.१ॠ

जे देखे रवी..      यंत्रे आणि किमयागार संगणक
एकोणीसशे एकोणसाठमधली माझ्या आयुष्यातली एक गोष्ट आहे. आमच्या शिक्षकतज्ज्ञाने एक मोठी आधुनिक नळी आयात केली होती. ती पोटात खूपसून आत काय चालते हे कळत असे. हा शिक्षक मोठा बेरकी होता. त्याने ही नळी पोटात घातली आणि मी आणि माझ्याबरोबरच्या पाच विद्यार्थ्यांना त्यातून बघू दिले. अट एकच होती, काय दिसते त्याबद्दल एका चिठ्ठीवर लिहावयाचे. मग नळी काढण्यात आली आणि चिठ्ठय़ा उघडण्यात आल्या. तेव्हा आत काय होते ह्याबद्दल पाच निरनिराळी मते दिसली. मला दिसलेला रंग हिरवा होता, तर कोणाला लाल रंग दिसला होता. याचे कारण नळीची कल्पना उत्तम होती, परंतु त्यातली भिंगे सदोष होती हे एक आणि दुसरे कारण असे की जे दिसते ते निरनिराळ्या लोकांना निरनिराळे दिसते.
 संगणकांनी हा जमाना संपवला. विशिष्ट रंगातून निघणारे तरंग माणसानेच तयार केलेल्या कोष्टकाप्रमाणे एकदा का संगणकाच्या अंतरंगात बसवले की मग साक्षीदाराचे कामच मुळी संपते. माणूस नावाच्या हुशार प्राण्याने स्वत:च्या पक्षपातावर स्वत:हून मात करून दाखवली. परंतु या प्रक्रियेत माणूस दुबळाही झाला.
माणसांची ज्ञानेंद्रिये डोळे, नाक, कान खरेतर संगणकाइतकीच तीव्र असतात. परंतु रुग्णाला तपासताना त्या रुग्णाने केलेल्या तक्रारीप्रमाणे आणि केलेल्या वर्णनाप्रमाणे एक ग्रह तयार होतो, मग त्या रुग्णाला तपासताना तो ग्रह बाजूला ठेवून स्टेथोस्कोप बॅटरी किंवा इतर उपकरणे वापरायची असतात. मग त्यात जे कळते त्यावरून आणि आधीच्या तयार झालेल्या मताचे मिश्रण आपल्या मेंदू नावाच्या संगणकात घालून एक तात्पुरते निदान करावयाचे असते. आणि जर अडचण असेल तर यंत्राचा वापर करायचा असतो.  संगणक असेल तर फारच उत्तम, पण हल्ली कोणाला वेळच उरलेला नाही. आणि डॉक्टरांपेक्षा यंत्रांवर विश्वास वाढला आहे.
डॉक्टरांनाच नव्हे तर रुग्णांनाही हल्ली घाई झालेली असते. काही वर्षांपूर्वी हौस म्हणून मी एका ग्रामीण रुग्णालयात महिन्यातून पंधरा दिवस काम केले तेव्हा असे लक्षात आले की इथे महिन्याला जवळ जवळ शंभर डोक्याचे सी.टी. स्कॅन होतात. मी आश्चर्यचकित झालो. डोके दुखते म्हणून येतात, तपासून घेतात, पण समाधान होत नाही म्हणून सी. टी. स्कॅनचा हट्ट धरतात. उद्या काही खरेच डोक्यात निघाले तर आफत व्हायची, म्हणून डॉक्टरही हो म्हणतात. सी.टी. स्कॅन यंत्रात केलेल्या गुंतवणुकीचा मोबदला नाहीतरी निघायला हवा असा सुज्ञ (!) विचारही त्यात असतोच.
रविन मायदेव थत्ते  १’३ँं३३ी@ॠें्र’.ूे

वॉर अँड पीस                                                       ताप भाग ३
२) सर्दी, पडसे, कफाचा ताप – तापाची साथ असणे. गार हवा, पावसात भिजणे. अवेळी थंड शिळे पदार्थ खाणे, एकूण रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, कुंद हवा, राहण्याच्या आसपासची ओली जागा. भूक मंदावणे इ. कारणांमुळे सर्दी, पडसे, भूक मंदावणे, घसा व अंग दुखणे, घाम न येणे, थंडी वाजणे, गळून जाणे,तापाचे मान कमी असणे अशी लक्षणे असतात. अशा तापाकरिता त्रिभुवनकीर्ति सर्वाच्याच वापरात आहे. ताप असल्यास लक्ष्मीनारायण तीन, ज्वरांकुश सहा दोन वेळा पुरेशी आहेत. कफ, सर्दी खूप असल्यास, दमा गोळी, लवंगादि गुग्गुळ ही जादा औषधे घ्यावी. पुदीना, आले, लसूण, ओली हळद, तुळशीची पाने व मिरी अशी चटणी वापरावी .मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्या.
३) पित्ताधिक्य, उष्णता, गोवर, कांजिण्याचा ताप- आंबट, तिखट, खारट, उष्ण पदार्थाचे सेवन, उष्ण पदार्थ मद्यपान, तंबाखू यांचे अतिरेकी सेवन, जागरण, उशिरा जेवण, खूप कमी जेवण या नेहमीच्या सवयी असणे. पोषणाचे मानाने अधिक श्रम. खूप उन्हात हिंडणे, उष्ण भट्टीजवळ काम करणे, गोवर कांजिण्या साथ असणे इ. कारणांमुळे हातापायाची, डोळ्यांची, सर्वागाची आग होणे, ताप तीव्र असणे, चक्कर येणे, अंगावर लाल गांधी वा पुरळ उठणे, झोप न येणे, तापात बरळणे अशी लक्षणे असतात.
अशा पित्तप्रधान ज्वरात चंद्रकला एक, लघुसूतशेखर दोन या हिशोबात तासातासाने पाच-सहा वेळा औषध द्यावे. पूर्ण विश्रांती घ्यावी. काळ्या मनुका धुवून बी काढून खाव्या. गरज पडली तर मौक्तीक भस्म घ्यावे. झोपेकरिता निद्राकर वटी रात्री ६  घ्याव्या.
४) मुदतीचा ताप – भूक मंदावणे, ताप येण्याची नेहमीची कारणे पुन: पुन्हा घडणे. दूषित पाणी व दूध. मुदतीच्या तापाची साथ असणे इ. कारणांमुळे पोटाला फुगवटा येणे, जिभेच्या बाजूवर चट्टे येणे. सतत ताप, चढ उतार असणे, थकवा येणे, चेहऱ्यावर काही काळ तेज असणे, अशी लक्षणे असतात. करंजेल तेलाची पिचकारी, अष्टमांश उकळलेले पाणी नियमितपणे द्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ७ मार्च
१८९६ > मराठय़ांच्या इतिहासाचे आद्य चिकित्सक टीकाकार नीलकंठ जनार्दन कीर्तने यांचे निधन. ‘ग्रँट डफ कृत मराठय़ांच्या बखरीवर टीका’ या निबंधातून त्यांनी या लिखाणावर प्रथम आक्षेप घेतला. त्यांनी सुधारणावादी लिखाण केले व ‘शिवाजी महारांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र’ अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केले.
१९१८> लोकप्रिय कथाकादंबऱ्यांची ६० हून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या स्नेहलता दसनूरकर यांचा जन्म. त्यांनी काही बालकादंबऱ्याही लिहिल्या होत्या.  
१९९२ > चरित्रकादंबरीला रंजक वळणे देऊन लोकप्रियतेची शिखरे गाठणारे रणजित रामचंद्र देसाई यांचे निधन. थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर बेतलेली ‘स्वामी’, छत्रपती शिवरायांवर ‘श्रीमान योगी’, ‘राधेय’ (कर्ण), तसेच ‘पावनखिंड’,‘राजा रविवर्मा’,  आदी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांना ‘गरुडझेप’, ‘रामशास्त्री’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘कांचनमृग’ ही त्यांची नाटके गाजली. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘सवाल माझा ऐका’ या चित्रपटांसाठी त्यांनी पटकथालेखन केले होते.
२००० > कथा-कादंबरी- नाटककरा प्रभाकर वसंत तामणे यांचे निधन. त्यांच्या तीन कादंबऱ्या व कथांचे तीन संग्रह निघाले आहेत.
संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tree fibre proteins can be separate from its leafs
Show comments