अनेक मोनोसॅकॅराइड्सची साखळी असेल तर त्यास पॉलीसॅकॅराइड्स म्हणजे बहुशर्करा म्हटलं जातं. यकृतात आणि स्नायूंमध्ये साठवलं जाणारं ग्लायकोजन, धान्यांत मुबलक असणारं स्टार्च (पिष्टमय), वनस्पतींत आढळणारा तंतुमय भाग म्हणजे सेल्युलोज, तसेच काही प्राण्यांत आढळणारे कायटिन ही पॉलीसॅकॅराइड्स् कबरेदकांची उदाहरणं आहेत.
बहुशर्करा निसर्गत: अन्नऊर्जा साठवण्यासाठी आणि संरचनेसाठी वापरली जातात. ज्या बहुशर्करा ऊर्जा साठवण्यासाठी वापरल्या जातात, त्यांना संचयी बहुशर्करा म्हणतात. तर ज्या बहुशर्करा आवरण तयार करण्यासाठी किंवा बांधणीसाठी वापरतात, त्यांना संरचनी बहुशर्करा म्हणतात. सेल्युलोज, कायटिन हे संरचनी कबरेदकांचे प्रकार आहेत.
अजून एका प्रकारची बहुशर्करा आहे, जी सूक्ष्मजीवांमध्ये विशेषत: रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांमध्ये आढळते. काही जिवाणू स्वत:भोवती बहुशर्करेचं आवरण तयार करतात. त्यामुळे ते आपल्या प्रतिकारयंत्रणेला ओळखू येत नाहीत. अशा रीतीने बहुशर्करेच्या साहाय्याने जिवाणू स्वत:चा बचाव करू शकतात.       
ग्लायकोजन, स्टार्च (तवकीर) या संचयी बहुशर्करा आहेत. अमायलोज आणि अमायोपेक्टिन यांनी बनलेलं स्टार्च म्हणजे ग्लुकोजची लांबलचक साखळी असते. काही अमायोपेक्टिनचे रेणू तर हजारो ग्लुकोजने बनलेले असतात. मानवामध्ये- प्राण्यांमध्ये शरीरात घेतलेल्या स्टार्चचं अमायलेजच्या साहाय्याने पचन केलं जातं. स्टार्चचे प्रथम माल्टोजमध्ये आणि त्यानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं.
शरीरातील सर्व अवयवांचे, स्नायूंचे, पेशींचे कार्य होण्यासाठी लागणारी ऊर्जा ग्लुकोज देते. शरीराची गरज भागवून राहिलेले ग्लुकोज, ग्लायकोजनच्या स्वरूपात यकृत आणि काही प्रमाणांत स्नायूंमध्ये साठवली जातात आणि जेव्हा ऊर्जेची आवश्यकता असेल तेव्हा वापरले जाते. म्हणजे शरीराला जर अन्नपुरवठा झाला नाही, ग्लुकोजची रक्तातील पातळी कमी झाली तर यकृत ग्लायकोजनचं रूपांतर पुन्हा ग्लुकोजमध्ये करतं. हे रूपांतरित ग्लुकोज रक्तामध्ये येतं आणि रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखलं जातं. ग्लुकोजपासून मिळणारी ऊर्जा शरीराच्या कामासाठी वापरली जाते. म्हणजे शरीरात ग्लायकोजनचा साठा असेपर्यंत आपण काहीही न खाता राहू शकतो.  
चारुशीला जुईकर (मुंबई), मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – वुडहाऊसचं जग
पी. जी. वुडहाऊसचं स्वतंत्र जग आहे. काळ थांबलेला आहे. परिस्थिती बदलत नाही आणि त्या ‘तिथली’ माणसं तर आहे तश्शीच आहेत.
मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या दोन सीमारेषांमध्ये लेखक एक विश्व निर्माण करतो. त्या विश्वात आपल्या मर्जीनं आपण शिरतो. तिथे रमतो, विसावतो आणि बऱ्याचदा नाइलाजाने तिथून बाहेर पडतो. पुस्तकातला हा अवकाश वुडहाऊसने अनेक कादंबऱ्या आणि गोष्टींमध्ये जपला. तो अजून तसाच आहे. पूर्णपणे अबाधित आणि पूर्ण आनंदी.
वुडहाऊसची कोणतीही कादंबरी वा कथा कुठूनही वाचायला सुरुवात करा, मागचे संदर्भ समजले नाहीत तरी लवकरच त्या जगात आपण विरघळून जातो. याला म्हणतात वुडहाऊसची चटक लागणे. आपण वुडहाऊसच्या प्रेमात पडतो. कधी कधी खुदकन हसू. कधी पोट धरून, कधी चेहऱ्यावर नुसती स्मितरेषा. मग वुडहाऊसचं वैशिष्टय़ काय? तर त्याच्या जगातली पात्रं. खरं म्हणजे त्यांचे साचे परिचित होतात. साधारणपणे, नायक मुख्यत: बर्टीवुस्टर, डोक्यानं जरा ढिला. (असं तोच म्हणतो) का तर त्याला प्रेमात पडलेल्या मुलीना नाही म्हणता येत नाही. त्याचा व्हॅले/बटलर नीव्हस् हा मात्र तल्लख डोक्याचा.
कादंबऱ्यामधल्या नायकाचे काका आणि आत्या. खट, कटकटय़ा आणि कजाग. पैकी लॉर्ड एम्सवर्थ हा वेंधळा काका, तर अंकल थ्रीववूड (पुलंच्या काकाजींची आठवण करून देणारा, मिस्कील, समजदार आणि तरुणांच्या बाजूचा) नायकाच्या प्रेमात पडणाऱ्या नायिका साधारणपणे मंद आणि तरीही धूर्त. वुडहाऊसच्या मुली नायकाला लग्नाला मागणी घालायच्या. कारण वाग्दत्त वरांशी त्यांचा वाङ्निश्चय तुटलेला असतो. तोपर्यंत पकडा नायकाचा हात आणि चांगलासा श्रीमंत बापाचा उनाडटप्पू मुलगा सापडला की सोडा!
नायकाचे मित्र बहुतेक वेळा निरुद्योगी नि आळशी. आपापल्या श्रीमंत, म्हाताऱ्या काका-आजोबांच्या मरणाची वाट पाहाणारे. नायकाकडे सदैव उधारी मागणारे.
तिथे ड्रोन्स क्लब (खुशालचेंडू भ्रमरांचा अड्डा, पण मुख्यत: झोपा काढायला) आहे. मार्केट ब्लँडिग हे रमणीय इंग्लिश खेडे आहे. तिथे भुंकून हैराण करणारी कुत्री, द्वाड मुलं आणि छांदिष्ट मालक आहेत. जुनी इजिप्शियन नाणी, डुकरं अशा गोष्टींचा नाद करणारी मंडळी आहेत.
काही ठिकाणी वेश पालटून राहणारे चोर आहेत, नावं बदलून राहणारे मित्र आहेत. सगळं आलबेल.
वुडहाऊसला कारुण्याची झालर लावून कथेच्या अखेरीस डोळ्यातून टिपूस काढणाऱ्या विनोदाचं वावडं आहे. इथे चोर फक्त चोर असतो, लबाड असतो. गांजलेल्या परिस्थितीतला गरिबाचा फेर नसतो. स्त्रिया खाष्टपणा करतात. कारण त्यांच्यावर झालेल्या अन्यायानं त्यांची मानसिकता बदलते असा दावा त्या करीत नाहीत. त्या मूलभूत खाष्ट असतात. सगळी मंडळी आपल्या वर्तमानात पूर्णपणे रममाण झालेली असतात. गतकाळाच्या स्मृतीत अडकून नॉस्टाल्जिक उसासे टाकत नाहीत. त्या काळाबद्दल आपल्यालाही स्मरणरंजन करीत हरवून जावं असं वाटत नाही. कारण तो काळ पुस्तकात जपलाय!
वुडहाऊसची भाषा आणि मांडणीतला लवचीकपणा हे त्याचं मोहक वैशिष्टय़. माणसाचं वर्णन करताना, कुत्र्यांच्या, डुकरांच्या खाष्ट आत्या नि काकूंच्या लकबी मांडताना वुडहाऊस हास्य निर्माण करतो. उदा. गावातल्या चर्च सेवक (विकर)ची पांचवी मुलगी दिसावी तशी ती दिसायची, कारण खरंच ती पाचवी मुलगी होती. तिला दोघांना पुरेल इतकी बुद्धी होती, कारण लग्न झाल्यावर मुलीला डबल बुद्धिमत्ता लागते. तर एका जाडगेल्या लॉर्डचं वर्णन करताना तो म्हणतो, जणू काही त्याला रुंद कपडय़ात ओतलं होतं. अंकल जॉर्जनं ‘दारू’ हे जेवण्यासारखं खाद्य आहे हे कधीच ओळखलं होतं, वैद्यकशास्त्राला नंतर कळलं, माझ्या ड्रॉवरमधून माझे गुलाबी मोजे चिमटीत धरून बाहेर काढले. शाकाहारी माणसाने सॅलडमधली अळी उचलावी तसे.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
shocking video Viral
रीलसाठी ओलांडली मर्यादा! मांजरीला बांधून श्वानापुढे टाकलं अन्… थरकाप उडवणारा VIDEO पाहाच
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त

प्रबोधन पर्व – समाज-परिवर्तनासाठी दबाव आणणाऱ्या संघटना हव्यात
‘‘सत्ता हे समाज-परिवर्तनाचे नुसते प्रभावी साधन नाही तर सर्वात प्रभावी साधन आहे आणि ते जसे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे तसे समाज-परिवर्तन शक्य तो थांबविण्याचेही सर्वात प्रभावी साधन आहे. कारण सत्ता हे साधन आहे. समाज-परिवर्तन करू इच्छिणाऱ्या पक्षाच्या हातात ते समाज-पर्तिनाचे साधन बनते. स्थितिवादी पक्षाच्या हातात, ते समाज आहे तसा टिकविण्याचे साधन बनते. प्रश्न सत्ता कुणाच्या हातात आहे हा असतो. समाजपरिवर्तनाच्या घोषणा करणाऱ्यांच्या हातात सत्ता असली म्हणजे समाज-परिवर्तन होत नाही. कारण घोषणा आणि कृती यांत फार मोठे अंतर असते. सत्तेकडून घडणारी कृती समाज-परिवर्तन घडवते, सत्तेत असणाऱ्यांच्या घोषणा समाज-परिवर्तन घडवीत नाहीत. नेमका या ठिकाणी व्यक्तीच्या प्रामाणिकपणाचा प्रश्न उपस्थित होतो. समाज-परिवर्तनाच्या कार्यक्रमावर श्रद्धा ठेवून निवडून येणारे लोक निवडून आल्यानंतर वेगळ्या भाषेत बोलू लागतात. खरोखरी या श्रद्धा ठेवणाऱ्यांची श्रद्धा प्रामाणिक आहे की शाब्दिक आहे याबद्दल हमी कोम देणार? आणि म्हणून निवडून आलेल्यांची जाहीर मते या संदर्भात गौण ठरतात.’’
‘वाटा : माझ्या-तुझ्या’(१९९३) या पुस्तकात नरहर कुरुंदकर म्हणतात – ‘‘समाज- परिवर्तन भाग पाडणाऱ्या समाजातील बलवान संघटनांचे दडपण समाज-परिवर्तन करण्यासाठी सत्तेला भाग पाडते. अशा बलवान संघटना समाजात असल्या म्हणजे त्या परिवर्तन करू इच्छिणाऱ्यांचे हात बळकट करतात. परिवर्तनावर शाब्दिक श्रद्धा जाहीर करणाऱ्यांना कृती करण्यास भाग पाडतात. विरोधकांनाही या दडपणाशी तडजोड करावी लागते. हे सामाजिक दडपण सद्भाववितरणाच्या कार्यक्रमातून येत नसते, तर ते संघटनेतून येत असते. या संघटना निर्माण न करता केवळ सत्तेत जाऊन समाजपरिवर्तन घडविता येईल ही अपेक्षा फारशी फलदायी ठरणार नाही. समाज-परिवर्तन करू इच्छिणाऱ्यांना तसे दडपण निर्माण करणारी प्रभावी संघटना निर्माण करता आली पाहिजे.. हे संघटनेचे बळ नसले म्हणजे सत्ता हातीच येत नाही आणि योगायोगाने सत्ता हाती आली तर ती अधिक भ्रष्ट राजवटी निर्माण करते..’’

Story img Loader