उमाशंकर जोशी यांनी काव्य, कथा, कादंबरी, नाटक, काव्यनाटक, निबंध, समीक्षा, अनुवाद इ. विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले आहे. त्यांच्या ‘निशिथ’ (१९३९) या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.  ‘विश्वशांती’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९३१ मध्ये प्रकाशित झाला. ५०० ओळींची ही कविता महायुद्धाच्या कालखंडावर लिहिली आहे. शांतीची स्थापना केवळ अहिंसा, प्रेम याद्वारेच होऊ शकते हेच या कवितेतून मांडलं आहे. यानंतर १९३४ मध्ये ‘गंगोत्री’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या संग्रहाला गुजरातचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार ‘रंजीतराम सुवर्णचंद्रक’ प्राप्त झाला. खरं तर त्यांच्या जवळजवळ सर्वच काव्यसंग्रहांना पुरस्कार मिळाले आहेत.

‘निशिथ’ हा पुरस्कारप्राप्त, सर्वश्रेष्ठ काव्यसंग्रह १९३९ मध्ये प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ११६ कविता आहेत. संस्कृत नाटक छंदापासून गुजरातीतील आधुनिक छंदापर्यंतचे प्रयोग सहजशैलीत यात केले आहेत. कवितांच्या विषयातही वैविध्य आहे. उमाशंकर यांचा आदर्शवाद त्यांच्या ‘विराट प्रणय’ आणि ‘सीमादान पत्थर’ या कवितांतून प्रकट झाला आहे. तर वास्तवाची जाण ‘लोकल मॅन’, ‘सद्गत मोटाभाई’, ‘आत्माना खँडेर’ या कवितांतून व्यक्त झालेली दिसते. महायुद्धाच्या काळातील संघर्ष, ताणतणावांचं चित्रण यातून येणं स्वाभाविक होतं. अवतीभवतीच्या परिस्थितीचे पडसाद संवेदनशील कवी मनावर होणं स्वाभाविकच आहे. ‘आत्माना खँडेर’ या त्यांच्या कवितेत विश्वविजयाची इच्छा मनात धरलेल्या एका तरुणाला समाजातील ही पडझड असह्य़ होते. या दु:खी मनाचे वर्णन करताना ते म्हणतात-

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pune samyukta Maharashtra movement
त्यागी लोकप्रतिनिधी आणि पदनिष्ठ राजकारणी
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Assembly Election 2024 Achalpur Constituency Bachu Kadu Mahavikas Aghadi and Mahayuti print politics news
लक्षवेधी लढत: अचलपूर : बच्चू कडूंसमोर चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान
Aishwarya Narkar On Zee Marathi Awards
“दोन्ही वर्षी पुरस्कार मिळाला नाही, थोडं हिरमुसल्यासारखं…”, ऐश्वर्या नारकरांनी हुकलेल्या अवॉर्डवर मांडलं मत, म्हणाल्या…
article about unopposed election before 98 years In kasba constituency
कसब्या’ची ९८ वर्षांपूर्वीची बिनविरोध निवडणूक…
Two prestigious awards for GP Parsik Bank
जीपी पारसिक बँकेला दोन प्रतिष्ठित पुरस्कार

‘‘असुख नहीं दहते मुझे, जितने कि वितथ सौख्य चुभते

नहीं रूचते सुख, जैसे रूचते समझ मे उतरे दु:ख’’..

१९४४ मध्ये प्रकाशित झालेला ‘प्राचीना’ आणि १९६५ मध्ये प्रकाशित झालेला ‘महाप्रस्थान’ हे दोन्ही कवितासंग्रह वेगळ्या शैलीतील आहेत.ज्या सहजतेने उमाशंकर यांनी काव्य, गतिकाव्य लिहिली त्याच सहजतेने त्यांनी शोकगीते, चतुर्दशपदे, गरबागीतेही लिहिली. १९४० मध्ये त्यांची ‘पारकाँ जव्याँ’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.अनेकविध साहित्यप्रकारात लेखन करणारे उमाशंकर म्हणतात- कवी म्हणून विकास व्हायला हवा असेल, तर समाजात मिसळून स्वत:ला समृद्ध करीत रहायला हवं, या गोष्टीवर माझा पूर्ण विष्टद्धr(२२४)वास आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

लांबी आणि क्षेत्रफळ मापनाची एकके

आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये लांबी / क्षेत्रफळ मोजण्याची वेळ अनेकदा येते. प्लॉट अथवा   ऋ’ं३ चे क्षेत्र अचूक मोजणे खूप आवश्यक असते, अन्यथा मोठी फसवणूक होण्याची शक्यता असते. बांधकाम किंवा रंगकामानंतरचे क्षेत्रफळही नेमके मोजणे गरजेचे असते. आपल्या देशाने १९५६ मध्ये दशमान पद्धत स्वीकारलेली असली तरी प्रत्यक्ष व्यवहारात इतरही एकके वापरली जातात. उदा. से.मी.ऐवजी इंच किंवा मीटरऐवजी फूट वापरले जाते, मात्र खरेदी-विक्री व्यवहारांची सरकारदरबारी नोंद करताना ती सरकारी नियमांनुसार दिलेल्या एककांमध्ये करावी लागते.

मुंबई, पुणे आणि इतर मोठय़ा शहरात प्लॉटचे क्षेत्रफळ चौ.फूटमध्ये सांगितले जात असले तरी नाशिक किंवा अन्य छोटय़ा शहरात त्यासाठी चौ. यार्ड किंवा वार या एककांचा वापर होतो. १ यार्ड = ०.९ मी. तर १ चौ. यार्ड = १ वार = ९ चौ.फूट =०.८ चौ. मी. शेतजमिनीच्यासाठी हेक्टर, गुंठा, एकर यांचा वापर होतो. १ हेक्टर = १०,००० चौ. मी. तर १ एकर = ४० गुंठे = ०.४ हेक्टर = ४०४७ चौ. मी. बांधकाम, प्लास्टर किंवा रंगकाम यांचे क्षेत्रफळ ब्रासमध्ये सांगितले जाते. (याचा पितळ धातूशी मात्र काही संबंध नाही!) १ ब्रास = १० फूट गुणिले १० फूट = १०० चौ.फूट एवढे क्षेत्र.

शहरांच्या विकास-नियमावलीत चटईक्षेत्र निर्देशांकाचा (Floor space index  –FSI)  उल्लेख असतो. वेगवेगळ्या शहरात हा निर्देशांक वेगवेगळा असतो. अनेकदा एकाच गावातही वेगवेगळ्या भागांत तो वेगळा असू शकतो. उदा. एकाच गावात, नवीन विकसित झालेल्या भागापेक्षा गावठाण भागात तो (सामान्यपणे) अधिक असतो.

समजा, एखाद्या भागात हा निर्देशांक १ आहे. म्हणजे त्या भागात २००० चौ.फूट क्षेत्रफळाचा प्लॉट असल्यास त्यावर तेवढे म्हणजे २००० चौ.फूट बांधकाम करता येते. मुंबई शहर अनेक बेटांवर मिळून वसलेले आहे. त्यामुळे या शहराच्या ‘आडव्या’ वाढीवर नसíगकरीत्या बंधने आलेली आहेत. त्यामुळे या शहराची वाढ प्रचंड प्रमाणावर ‘उभी’ झालेली दिसते. म्हणजेच अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. अशा भागात हा निर्देशांक १ पेक्षा अधिक आहे.

– डॉ. गिरीश पिंपळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org